आज माझ्या youtube channel चे १००० Subscriber झाले. त्याबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, अभ्यासक, नातेवाईक मित्र-मैत्रिणींचे त्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो.
सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, इतिहास, तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर मला अभ्यासांती,
अनुभवांती किंवा इतरांशी चर्चा करून जे माहित झाले आहे, ते माझ्या आजूबाजूच्या लोकांना सांगण्याची जी माझी स्वाभाविक प्रवृत्ती आहे (आपल्या प्रत्येकाचीच ती असते) त्यानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी करीत आहे. माझ्या blog ला ( http://drrahulrajani.com )सुद्धा आपण भरभरून प्रतिसाद देत आहात. आतापर्यंत २००००+ viewer झालेत. ‘जे जे आपणाशी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’ या हेतूने हे सर्व चाललंय. ग्रामीण, आदिवासी, शहरी अशा सर्व भागातील विद्यार्थ्यांना माझ्या या श्रमाचा काहीएक लाभ होत आहे, ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे.
येत्या १० मे, २०२१ रोजी माझ्या youtube channel सुरू करायला १ वर्ष पूर्ण होईल. या प्रवासात अनेक गोष्टी, तंत्रे, कौशल्ये आत्मसात करता आली. प्रत्येक क्षणाला नवनवीन कल्पना मनात घोंगावत असतात. अनेक माणसे जोडता आली. दररोज कुणी ना कुणी अनोळखी व्यक्तीचा फोन येतो व ती व्यक्ती कायमची जोडली जाते. अनेकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.
आपल्यापैकी अनेकांच्या माझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत, मला ठाऊक आहे. पण माझी सहाय्यक प्राध्यापक पदाची नोकरी, त्या संबंधीत इतर सर्व कामे व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून मी हा चॅनेल चालवत आहे. त्यामुळे आपल्या सर्व अपेक्षा एकदम पूर्ण करू शकत नाही, पण हळूहळू पूर्ण करत राहील. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर या कामांमध्ये मदतीसाठी एक-दोन सहकारी (Assistant)
ठेवण्याचा मानस आहे. असो.
आतापर्यंत माझ्यावर जे प्रेम केले, तसेच कायम ठेवा, हीच अपेक्षा!
पुनश्च एकदा धन्यवाद!
आपलाच,
राहुल पाटील
माझ्या चॅनेलची लिंक- https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw