ही माझी आवडती गझल आहे. तिचा मराठीत अर्थ मी ChatGPTला विचारून मिळवलेला आहे. अतिशय खोल अर्थ या गझलचा आहे. अर्थानंतर गुलाम अली, आशा भोसले व तान्या वेल्स यांच्या आवाजात त्यांनी गायलेल्या या गझलच्या तीन तीन व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्हालाही नक्की आवडेल.
हैरतों के सिलसिले सोज़-ए-निहाँ तक आ गए हम तो दिल तक चाहते थे तुम तो जाँ तक आ गए
निबंध किंवा वक्तृत्त्व स्पर्धेसाठीचे १०० विषय
ज्यांनी ‘१२th फेल‘ हा चित्रपट बघितला असेल त्यांनी त्या चित्रपटातील एक प्रसंग आठवा. ज्यात मनोज कुमार शर्मा याला एक आयएएस ऑफिसर ‘मनोज कुमार शर्मा‘ या विषयावर निबंध लिहायला सांगतो. पण तो दिलेल्या वेळेत पुरेसे लिहू शकत नाही. त्यावरून ‘तू ये नही कर सकता‘ असे तो आयएएस ऑफिसर त्याला सांगतो. सांगायचे तात्पर्य आपल्याला जर एखाद्या विषयावर निबंध किंवा २००-४०० शब्दांमध्ये अभ्यासपूर्ण Read More
विद्यार्थिधर्म म्हणजे काय?
मित्रांनो,
मी बीए (विद्यापीठात प्रथम क्रमांक- सुवर्णपदक), एम.ए. (विद्यापीठात प्रथम क्रमांक-सुवर्णपदक), नेट, नेट-जेआरएफ, पीएचडी, योग्य मार्गाने साहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवणे, NSS-District level best programme officer award (पालघर जिल्हा), दोन पुस्तकांचे संपादन, प्रसिद्ध ब्लॉगर, युट्युबर हे सर्व यश ग्रामीण भागात शिक्षण व आदिवासी भागात नोकरी करत
Read Moreलोकशाहीपुढील आव्हाने
औरंगजेब याचे स्टेट्स ठेवणे चुकीचेच होते. पण असे केल्याने कुणाचाही अपमान होत नाही. मात्र इथे खालील घटना घडताना कुणाच्याही भावना दुखावल्या जात नाहीत, कुणाचाही अपमान होत नाही. उदा.
● गांधीजींच्या स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेवर गोळीबार
Read Moreशिक्षणातून माझी झालेली वैचारिक जडणघडण
माझे एम.ए. नेट, पीएचडी मराठी विषयात झालेले आहे. पण बीएला द्वितीय तसेच तृतीय वर्षाला इतिहास व राज्यशास्त्र हे विषय मी घेतलेले होते. हे माझ्या अतिशय आवडीचे विषय असल्याने मला यांच्यात खूप चांगले गुण मिळाले होते. याचा मला माझ्या पुढच्या वाटचालीत तसेच मानवजातीच्या
Read Moreबाबासाहेबांनी लंडनहून रमाईला लिहिलेले पत्र…
रमा !
कशी आहेस रमा तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील
मराठी व इंग्रजीत Course outcomes : FYBA Marathi Syllabus- As per New Education Policy
As per New Education Policy
FYBA
शिकण्याचे परिणाम :
- अभ्यासकांना मराठी साहित्याच्या प्रेरणा व प्रवृत्तींचा अभ्यास करून एकूण मराठी वाङ्याच्या इतिहासाच्या स्वरूपाचे आकलन होईल. त्याचबरोबर त्यांना भाषेच्या शास्त्रीय स्वरूपाचा परिचय होईल.
- साहित्याच्या माध्यमातून समाज व संस्कृतीचा परिचय घडेल व साहित्याच्या सांस्कृतिक संदर्भाची जाण निर्माण होईल.
- वेगवेगळ्या वाङ्यप्रकारांतील व कालखंडातील महत्त्वाच्या साहित्यकृतींचा परिचय होऊन साहित्यविषयक अभिरुची व संवेदनक्षमता निर्माण होईल. तसेच त्यांच्यामध्ये साहित्यकलेचा आस्वाद व समीक्षा करण्याची क्षमता निर्माण होईल.
- विद्यार्थ्यांना विविध भाषिक कौशल्यांचा परिचय होऊन त्यांच्या उपयोजनाची क्षमता वाढेल.
- विद्यार्थी मराठी भाषा, तिचा वापर व आधुनिक तंत्रज्ञान यांच्यात समन्वय निर्माण करू शकतील.
- विद्यार्थी श्रवण, भाषण, लेखन व वाचन या भाषिक कोशल्यांवर प्रभुत्व मिळवू शकतील.
सत्र १
Name of the course: नाटक या साहित्य प्रकाराचा अभ्यास (major mandatory) (सविस्तर वाचा…)
‘वोल्गा ते गंगा’मध्ये चित्रित आदिम काळातील स्त्रीजीवन
‘वोल्गा ते गंगा’मध्ये चित्रित आदिम काळातील स्त्रीजीवन
राहुल सांकृत्यायन हे विसाव्या शतकातील एक महान अभ्यासक, थोर विद्वान होते. म्हणून त्यांना ‘महापंडित’ असे म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात संशोधन व अभ्यासासाठी नेपाळ, भूतान, श्रीलंका, रशिया, जर्मनी, इंग्लंड अशा विविध देशांना भेटी देऊन विस्मृतीत गेलेली असंख्य ग्रंथसंपदा शोधून काढली. मानवी इतिहास, वेद, बौद्ध वाङ्मय, मार्क्सवादी साहित्य यांचा अतिशय सूक्ष्म असा अभ्यास त्यांनी केलेला होता. त्यांनी अतिशय मौलिक अशी विपुल ग्रंथरचना केलेली आहे. त्यांनी अनुवादित व संपादित केलेल्या आणि स्वतः लिहिलेल्या ग्रंथांची एकूण संख्या सुमारे १२५ इतकी असून या ग्रंथांची पृष्ठसंख्या सुमारे ४४००० इतकी आहे. त्यांना इंग्रजी, फ्रेंच, रशियन, जर्मनी, चिनी, पर्शियन, अरबी, तिबेटी, हिंदी, बंगाली, गुजराती, मराठी, तमिळ, कानडी इतक्या भाषा Read More
1960 से 1975 इस काल के मराठी और हिंदी ग्रामीण उपन्यासों में पाकिस्तान निर्मिती की घटनाएँ और परिणाम : एक अध्ययन
1960 से 1975 इस काल के मराठी और हिंदी ग्रामीण उपन्यासों में
पाकिस्तान निर्मिती की घटनाएँ और परिणाम : एक अध्ययन
प्रस्तावना:
साहित्य को सामाजिक जीवन का दर्पण कहा जाता है। हर एक काल के महान साहित्यकृतीओ मे समसामयिक घटनाओं, विचारधारा, जनता के मन पर इसके प्रभाव को काल्पनिक पात्रों और घटनाओं के माध्यम से वास्तविक रूप में चित्रित किया जाता है। साहित्य में उस समय के समाज का दर्शन होता है। इसलिए साहित्य को सामाजिक जीवन के अध्ययन करने का एक महत्वपूर्ण साधन माना जाता है।
भारत के इतिहास में पाकिस्तान की निर्मिती एक महत्वपूर्ण राजनीतिक घटना है। इसका भारत के सामाजिक, राजनीतिक और सांस्कृतिक जीवन पर तात्कालिक और दूरगामी परिणाम हुआ हैं। 1945 के आसपास, पाकिस्तान बनाने का विचार गति पकड़ रहा था। अंग्रेजों ने इन विचारों को खाद देने का काम किया। मुस्लिम लीग मुसलमानों का प्रतिनिधित्व करने वाली पार्टी थी। इस पार्टी ने स्वतंत्र पाकिस्तान के निर्माण की पुरजोर वकालत करनी शुरू कर दी। इस मुद्दे पर मोहम्मद अली जिन्ना का नेतृत्व आगे Read More
गरिबांची मुलं प्राध्यापक कशी बनतील?
गरिबांची मुलं प्राध्यापक व्हायला हवीत. निवड प्रक्रियेतील डोनेशन स्वरूपातला भ्रष्टाचार थांबायला हवा. आज ९९% संस्थाचालक ४०-५० लाख रुपये डोनेशन घेत आहेत. गरिबांची मुले एवढे पैसे देऊच
Read Moreविठ्ठलाशी संवाद -आषाढीच्या निमित्ताने…
बा विठ्ठला,
तू वेदांमध्ये नाहीस, उपनिषदांमध्ये नाहीस, रामायण महाभारतामध्ये नाहीस. तू कुठलाही पुराणांमध्ये नाहीस. पण तू इथल्या मातीत रुजलेला आहेस! इथल्या मेघांमधून वर्षत आहेस! इथल्या फुलांमध्ये तुझाच सुगंध दरवळत असतो आणि इथल्या संगीतातून, तालासुरातून,
अलीकडच्या काळातील काही कथासंग्रह
१) ‘ट्रोलधाड’ हा वर्षा किडे-कुळकर्णी यांचा तिसरा कथासंग्रह आहे. ‘गुंतता हृदय हे’ व ‘झिरो मॅरेज’ या कथासंग्रहांनाही अखिल भारतीय स्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
ट्रोलधाड – दत्तात्रय सांडू प्रतिष्ठान चेंबूर, मुंबई,
मुलाखत लेखन – श्री. रवी बुधर यांची यांची मुलाखत (विषय : आदिवासी समाज, संस्कृती : परिचय’)
मित्रांनो, आज आपण आदिवासी समाज, त्यांची संस्कृती, शिक्षण, अर्थव्यवस्था अशा विषयांवर चर्चा करणार आहोत आणि या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत प्रसिद्ध कवी श्री. रवी बुधर सर हे आहेत. मी सर्वप्रथम रवी बुधर सरांचे मनःपूर्वक स्वागत करतो. तसेच सुरुवातीला त्यांचा परिचय करून देतो.
रवी बुधर सर हे ग्रामीण कवी व अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ते प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असून सध्या प्राथमिक व माध्यमिक शाळा चौक, ता. जव्हार, जि. पालघर येथे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.
ते अ.भा.मराठी साहित्य परिषद पुणे यांच्या जव्हार तालुका शाखेचे सचिव आहेत.
मराठी विभाग – जव्हार महाविद्यालय – विविध उपक्रमांची यादी – २०१७-१८ ते २०२३-२४
गोखले एज्युकेशन सोसायटीचे
कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,
जव्हार, जि. पालघर – ४०१ ६०३
मराठी विभाग
विविध उपक्रमांची यादी
‘सर ए राह’ अतिशय सुंदर पाकिस्तानी स्त्रीवादी मालिका
‘सर-ए-राह’ ही एक पाकिस्तानी मालिका आहे. इतकी छान मालिका मी अलीकडच्या काळात भारतात नाही बघितली. या मालिकेचे एकूण ६ एपिसोड आहेत. पाकिस्तानमधील पुरुषप्रधान संस्कृती, मानसिकता या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या चार तरुण मुली/
Read Moreमीही सुवर्णपदक परत करणार होतो!
मी बीए व एम.ए.ला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (जळगाव) प्रथम आलेलो असल्याने मला दोनदा सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच मी २००७ साली एम.ए. झाल्या झाल्या नेट परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. पुढच्याच वर्षी नेट-जेआरएफ पण उत्तीर्ण झालो. तरीही मुलाखतींना जायचो तेव्हा भरमसाठ डोनेशनची मागणी व्हायची. चार-साडेचार वर्ष झाले तरी मला नोकरी मिळत नव्हती. ज्या महाविद्यालयात मराठीची एक जागा
Read Moreनव मानवसमाज निर्माण होण्यासाठी उपाय
नवा मानव समाज निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न
- आज आपण मानव म्हणून २१व्या शतकामध्ये वावरत आहोत. हजारो वर्षांचा अनुभव आज आपल्या गाठीशी आहे. तेव्हा आपण आता धर्म व इतर पारंपारिक व्यवस्था सोडून निखळ मानवी व्यवस्थेकडे जायला हवे. कारण धर्म, प्रथा, परंपरा, श्रद्धा यांच्या मर्यादा विज्ञानामुळे आता आपल्याला माहित झालेल्या आहेत.
- होमो सेपियन्सना आपल्या बुद्धिमत्तेने धर्माची निवड करण्याचा आधिकार असायला हवा.
- Man is a rational animal. जगातील सर्वच धर्मांनी बुद्धिमान आणि सारासारबुद्धी असलेल्या होमोसेपियन प्रजातीच्या व्यक्तींना, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निसर्गदत्त गुणांचा उपयोग करून, उपलब्ध असलेल्या धर्मातील एका धर्माची निवड करण्याचा अधिकार नाकारला आहे.
- होमोसेपियन व्यक्तीच्या सारासारबुद्धीची दखल घेऊन, प्रत्येक व्यक्तीला सज्ञान वयाची झाल्यावर आपल्या पसंतीचा धर्म निश्चित केल्यावरच, त्या व्यक्तीस धर्माची दीक्षा देण्याची प्रथा, खरं तर सर्वच धर्मसंस्थापकांनी व धर्मगुरूंनी सुरू करायला हवी होती.
- त्याऐवजी सर्वच धर्मसंस्थापकांनी व धर्मगुरूंनी सरसकटपणे व्यक्तीच्या मातापित्याचा धर्म तोच व्यक्तीचा धर्म अशी मान्यता देऊन, तशी प्रथा व परंपरा सुरू करून, व्यक्तीच्या आपल्या इच्छेने धर्म नाकारण्याचा किंवा उपलब्ध धर्मातील एक धर्म निवडायच्या अधिकारावर गदा आणली आहे.
- बुद्धिमान आणि सारासारबुद्धी असलेल्या मानवी व्यक्तींनी, आपल्या व इतर प्रजातींच्या भविष्यकालीन परस्पर संबंधांना मानवी रूप देण्यासाठी भूतकाळातील सर्वच धर्म व पंथ संस्थापकांकडून झालेला हा प्रमाद नाकारून, त्यात सुधारणा करण्याची नितांत गरज आहे.
- जगातील सर्वच धर्म आपसात केवळ स्पर्धाच नव्हे तर काही प्रमाणात द्वेषही करताहेत, त्यामुळे आतापर्यंत जगभरात प्रचंड हिंसाचार घडून आलेला आहे.
- ह्यातील कुणा एका धर्मातील वा वेगवेगळ्या धर्मातील व्यक्ती एकत्र येऊन धर्मसंस्थापकांनी केलेली ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा करणे, अशक्यच आहे.
- त्यामुळे मानव प्रजातीचा विकास करण्यासाठी ईश्वर ह्या संकल्पनेच्या जालात अडकलेल्या मानव प्रजातीतील व्यक्तीला आपला धर्म निवडण्याचा अधिकार मिळवून देण्याची जबाबदारी अनिश्वरवाद्यांना व संयुक्त राष्ट्र संघटनेलाच स्विकारावी लागणार आहे.
- ह्यासाठी जगातील समस्त नास्तिकांनो, सुजाण नागरिकांनो, जगातील असे देश, ज्यांनी आपले राष्ट्र एका विशिष्ट धर्माचे असल्याचे नाकारले आहे, अशा रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, बेल्जियम, इंग्लंड आणि इतर अशा सर्व देशांनी, ह्या दिशेनं वाटचाल करावी म्हणून, त्यांना योग्य लॉजिकल कृती करण्यास, पुढचे पाऊल टाकण्यास उद्युक्त करूया.
- ह्या देशाच्या शासनसंस्था आपापल्या देशातील धर्मसंस्थांना अशा प्रकारे सज्ञान झालेल्या व्यक्तीनांच, व्यक्तींच्या इच्छेप्रमाणे, त्यांनी निवडलेल्या धर्माची दीक्षा देण्याचा विधी विकसित करावा आणि अशा विधी झालेल्या, दीक्षाप्राप्त व्यक्तीसच आपल्या धर्मामध्ये प्रवेश देण्याची प्रथा सुरू करावी व त्याप्रमाणे योग्य नियम बनवावेत म्हणूून योग्य कायदे करतील.
- आपल्या देशाच्या नागरिकांना नागरिकत्वाचा हक्क देताना त्यांनी, एक तर स्वत़ःला अनिश्वरवादी घोषित करायला हवे किंवा सज्ञान झाल्यावर आपल्या इच्छेने निवडलेल्या धर्माचा विधीपूर्वक स्विकार करायला हवा, अशा रीतीचे कायदे सर्वच देश करतील, असे प्रयत्न करावेत.
- त्याचबरोबर युनोच्या सभागृहातही युनोच्या सर्व सदस्य देशांनी आपापल्या देशाच्या धर्मविषयक कायद्यांत योग्य बदल करून धर्मसंस्थांना ह्या उद्देशास सहाय्यक अशा प्रकारचे नियम, विधी, माहिती विकसित करण्यास उत्तेजन द्यावे.
- युनोचे सदस्य असलेल्या सर्वच देशांनी युनोच्या आमसभेत, मानव ही सर्व प्रजातीतील एक बुद्धिवान आणि सारासारविवेकबुद्धी असलेली प्रजाती आहे, म्हणून निसर्गाने बहाल केलेल्या, आपल्या वैशिष्ट्यांचा, आपल्या वेगळेपणाचा विकास करणे ही मानवाचीच जबाबदारी आहे, अशा आशयाच्या भूमिकेला मान्यता देऊन, मानवाच्या विकासाला मर्यादित करणाऱ्या सर्व धर्मांमध्ये योग्य बदल करून, मानवाला मानव्याच्या दिशेने प्रवास करण्यास पूरक असे नियम करण्याविषयक आवाहन करणारा एक ठराव पारित करावा.
- भविष्यातील मानवाने एक तर त्याचा धर्म हा तो सज्ञान झाल्यावर विचारपूर्वक निवडलेला असायला हवा किंवा निधर्मी राहण्याचा, एकापेक्षा अधिक धर्मातील चांगल्या गोष्टींचे पालन करण्याचा त्यांचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार त्याला मिळायला हवा.
- म्हणून कुणाच्याही दाखल्यावर तो सज्ञान झाल्यावर स्वतःहून कायद्याप्रमाणे कोणताही एक धर्म स्वीकारेपर्यंत कोणत्याही धर्माचा उल्लेख करता कामा नये.
- शाळा, महाविद्यालये यात कोणत्याही धर्माचे कार्यक्रम होणार नाहीत, यासाठी नियम, कायदे बनवायला हवेत व जर असे कुठे घडत असेल तर एका तक्रारीवर चौकशी व दोषी आढळल्यास कारवाई करायला हवी.
- धर्माच्या नावाने होणाऱ्या हिंसा, दंगे इत्यादी गोष्टींवर कठोरातली कठोर कारवाई करून वरील गोष्टींना प्रोत्साहन मिळणार नाही असे कायदे निर्माण करायला हवेत व त्यांची अंमलबजावणी करायला हवी.
- धर्माचा ठेका घेतलेल्या संस्था, संघटना, व्यक्ती यांचा कायदे करून बिमोड करायला हवा.
(दीनानाथ मनोहर यांची पोस्ट काही बदलांसह…)
- डॉ. राहुल पाटील
मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान -महत्त्वाच्या app व संकेतस्थळांची माहिती (भाग १)
कोणतीही भाषा ही जर टिकून ठेवायची असेल, तिचा विकास साधायचा असेल तर तिच्या विकासासाठी आधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे. दैनंदिन जीवनात आपला भाषेशी वेगवेगळ्या कारणास्तव नित्य संबंध येत असतो. आपण ती कामे टाळू शकत नाहीत. उदाहरणार्थ- टंकलेखन, मुद्रण, पुस्तकातील एखाद्या कागदावरील मजकूर पुन्हा मुद्रित करणे, भाषांतर करणे, कठीण शब्दांचे अर्थ जाणून घेणे, अशा कामांसाठी आपण जुन्या पद्धतीचे पारंपरिक तंत्रज्ञान वापरले तर आपले काम अगदी सावकाश होते, कामाला उशीर होतो व एवढा जास्त वेळ या धावपळीच्या काळात अशा कामांसाठी देणे आपल्याला शक्य होत नाही. मग कंटाळा आल्याने आपण अशी कामे टाळायला लागतो व हळूहळू ती करणे सोडून देतो. मात्र याच कामासाठी आपले संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅब यांच्यातील आधुनिक तंत्रज्ञानाचा, सॉफ्टवेअर, ॲप्स,
Read Moreअनिल काकोडकर यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे-
३१ जानेवारी व ०१ फेब्रुवारी, २०१८ असे दोन दिवस जव्हारमध्ये मराठी विज्ञान परिषद व गोखले एज्युकेशन सोसायटीच्या के. व्ही. हायस्कूलच्या वतीने जव्हारमध्ये दोन दिवसीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या पहिल्या दिवशी थोर अणुशास्त्रज्ञ पद्मश्री, पद्मभुषण, पद्मविभुषण पुरस्कारप्राप्त डॉ. अनिल काकोडकर व ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण उपस्थित होते. या प्रसंगी काकोडकर सरांचे व्याख्यान झाले. यानंतर त्यांचे जव्हार परिसरातील शिक्षक प्राध्यापकांसोबत
Read Moreबहुजनांनी मोक्याच्या जागा का मिळवाव्यात? भविष्यात काय करावे?
गोविंदराव पानसरे यांच्या ‘जात, धर्म…’ नावाच्या एका पुस्तकात त्यांनी शेतमजूर कुटुंबातून आलेला न्यायाधीश व जमीनदाराच्या कुटुंबातून आलेला न्यायाधीश यांनी एकाच गुन्ह्यातल्या आरोपींना
Read Moreप्राध्यापक व्हायचंय? मग हे करा-
नेट/ सेट उत्तीर्ण झालेल्या मित्रांनो, प्राध्यापक व्हायचंय?
नेट/ सेट उत्तीर्ण झालात. अभिनंदन!
पण खरा संघर्ष आता सुरू होईल. कारण स्पर्धा खूप
समान नागरी कायदा : गैरसमज व वस्तुस्थिती
समान नागरी कायदा-
● भारतात आज जवळपास ९९% कायदे सर्व जाती व धर्मांसाठी पूर्णपणे सारखे आहेत.
● वेगवेगळे कायदे फक्त विवाहपद्धती, घटस्फोटाची व पोटगीची नियमावली, वारसा आणि दत्तक या
प्राध्यापकांचे शोषण
प्राध्यापकांचे सर्वात जास्त व भयंकर असे शोषण हे संस्थाचालकांकडून होते. आजच्या घडीला सहाय्यक प्राध्यापक बनण्यासाठी ४० ते ६० लाख रुपये रेट
Read Moreनेट उत्तीर्ण
प्रिय मित्रांनो,
आपल्या ‘मराठी व्याकरण व साहित्य (सर्व स्पर्धा परीक्षा व नेट सेट)’ या ग्रुपमधील/ माझ्या संपर्कातील/ माझ्या YouTube channelवरील व्हिडीओ बघणाऱ्यांपैकी खालील विद्यार्थी
दि. ०५/०९/२०२२ रोजी घोषित झालेल्या नेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्यापासून आपल्यालाही प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांची नावे पुढे देत आहे.
१) संदीप पोपटराव भदाणे (साक्री, जि. धुळे)
२) सुरेश बापूराव पारवे
३) अमित आप्पा गवळे (रायगड)
४) मोहनसिंग बुधासिंग मुझालदा (इंदौर)
५) सोमनाथ गायकवाड (औरंगाबाद)
६) प्रतीक राऊत (अकोला, पुणे विद्यापीठ)
७) टेंगसे श्रेया मनोहर (गोवा)
८) बडगे उमेश रावसाहेब (बीड)
९) क्षितिजा अजय आगाशे
१०) गोंटलेवार गणेश पांडुरंग (ता. वाडा, जि. पालघर)
११) महेश घावट (मुरबाड, जि. ठाणे)
१२) दत्ता महाले (अमरावती विद्यापीठ)
१३) रुपेश मेटकर (अमरावती विद्यापीठ)
१४) गणेश पोकळे (अमरावती विद्यापीठ)
१५) अर्चना सोळंके (अमरावती विद्यापीठ)
१६) निकेत चंदिवाले (अमरावती विद्यापीठ)
१७) गायत्री मुळे (अमरावती विद्यापीठ)
१८) अडलिंगे सूर्यकांत श्रीधर (सोलापूर)
१९) संगीता जगन्नाथ शेळके (नाशिक)
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व भविष्यासाठी शुभेच्छा! तसेच इतरांनाही पुढील परीक्षांसाठी शुभेच्छा!
डॉ. राहूल भालेराव पाटील
आदिवासी मूळ कोण आहेत?
जे आदिवासी नाहीत, ज्यांचा काही अभ्यास नाही तेसुद्धा ‘आदिवासी हे हिंदू आहेत’ असे म्हणत आहेत. कायदा काय म्हणतो, न्यायालय काय म्हणते,
Read More
आदिवासींचे आरक्षण धोक्यात!
आधी सोबतच्या कात्रणातील बातमी व्यवस्थित वाचा. त्यात भाजपच्या हिंदुत्ववादी केंद्र सरकारकडून जम्मू काश्मीरमध्ये डोंगराळ भागात राहणाऱ्या मुस्लिम व इतर समूहातील लोकांचा ST संवर्गात समावेश करण्यात आला आहे.
RSSवाले आदिवासींना ‘आदिवासी’ न म्हणता ‘वनवासी’ म्हणतात. वनवासी म्हणजे वनात/ जंगलात राहणारे. ‘वनवासी’ या शब्दात जंगलात राहणाऱ्या सर्वांचा समावेश होतो.
अशा पद्धतीने आदिवासींना वनवासी म्हणण्याचा व ते खपवून घेण्याचा दुष्परिणाम असा होऊ शकतो की-
Read Moreपुनर्जन्म – एक घातक संकल्पना-
प्रिय बहुजन बंधू-भगिनींनो,
पुनर्जन्म या संकल्पनेने इथल्या शूद्र-अतिशूद्रांच्या ५६ पिढ्यांची माती केली आहे. त्यांची भयंकर गुलामगिरी या संकल्पनेमुळे टिकून राहिली.
कसे ते पहा.
घराच्या बांधकामाचा करारनामा – नमुना
मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना घराचे काम contractorकडून करून घ्यायचे असते. पण त्याच्याकडून काय लिहून घ्यावे, त्याचा नमुना आपल्याला माहित नसतो. माझ्या एका नातेवाईकाच्या घराचे काम सुरू होत आहे. त्याच्याकडे लिखित स्वरुपात हा नमुना मिळाला. तो सर्वांना उपलब्ध करून देत आहे. १०० रु.च्या stamp पेपरवर तुम्ही खालील करारनामा लिहून घेऊ शकता.
सूचना- १) यात तुम्ही तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार व प्रदेशानुसार बदल करू शकतात.
२) काही बांधकाम व्यवसायाशी संबंधित शब्द अशुद्ध असू शकतात. त्यात बदल करून घ्यावा.
बांधकामाचा करारनामा-
- बांधकामाच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे- Read More
बहुजनांचा उद्धार कुणामुळे झाला?
बहुजन समाजातील अनेक जण आज नोकरी, व्यवसाय करत आहेत, उच्चशिक्षित आहेत. आनंदाने जीवन व्यतित करत आहेत. अतिशय आनंदाची व समाधानाची बाब
Read Moreकुंकू, टिकली व भिडे
कुंकू व संस्कृतीचा, धर्माचा संबंध जोडणाऱ्यांनो, इकडे लक्ष द्या.
● धर्माच्या व संस्कृतीच्या नावानेच या देशामध्ये स्त्रियांना भावीण, जोगतीणी म्हणून सोडले जायचे व त्यांचा उपभोग, लैंगिक शोषण ज्यांना ज्यांना शक्य होईल, ते
Read Moreश्रद्धा, caliber व वास्तव
●बऱ्याचशा श्रद्धा जाणीवपूर्वक निर्माण केल्या जातात.
●सत्यनारायण पूजा/ विधी नव्हता, तोपर्यंत कुणीही
Read Moreसरस्वती व माझे पूर्वज
सरस्वतीला भारतात हजारो वर्षे ज्ञानाची देवता मानले गेले आहे. पण तिच्यामुळे भारतातील स्त्रिया, शूद्र, आदिवासी व भटक्या जमाती यांना शिक्षणाचा, ज्ञानग्रहणाचा अधिकार मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
आजही सरस्वतीच्या देशात 75% पेक्षा जास्त साक्षरता
Read Moreआस्तिक, नास्तिक, श्रद्धा-अंधश्रद्धा : परिणाम
आस्तिक असणे किंवा नास्तिक असणे, यात चांगले काय व वाईट काय हा प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की, धर्माच्या नावाने/ श्रद्धेच्या आधारे चालू असलेल्या प्रथा ह्या फक्त आनंदासाठी नसतात. याच्यातून सामाजिक
Read Moreजात व धर्माचे कोष, त्याचे परिणाम
भारतीय समाजात प्रत्येक ‘जात’ हा एक कोष आहे व असे असंख्य कोष ‘धर्म’ या कोषात समाविष्ट आहेत.
काही जण थोड्या फार प्रमाणात पहिल्या कोषातून बाहेर पडले की दुसऱ्या मोठ्या कोषात अडकतात. परंतु या
Read Moreभारत धर्मराष्ट्र व्हायला हवे!
पुण्यातील दगडू शेठ हलवाईच्या गणपतीसमोरील दरवर्षी हजारो स्त्रियांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठण, उच्चशिक्षित स्त्रियांची दररोजची कर्मकांडे, दैववाद, उपास-तापास, या सर्वांमधील बहुजनांचा
Read Moreबहुजनांच्या सण-उत्सवांचे बदलते स्वरूप-
या ऑगस्ट महिन्यातील २६ तारखेला पोळा हा सण साजरा करण्यात आला. पोळा हा ग्रामीण भागातील लोकांचा अतिशय जुना व महत्त्वाचा सण मानला जातो. ज्या बैलांच्या सहाय्याने शेतकरी शेती कसतो, ज्यांच्या मदतीशिवाय शेतात राबणे, शेतातील सर्व कामे करणे शक्य नव्हते, हजारो वर्षे आपल्या शेकडो पिढ्या ज्याच्यामुळे जगल्या, अशा बैलांबद्दल
Read Moreपंडित जवाहरलाल नेहरूजी कितने साल जेल में रहे थे?
पंडित जवाहरलाल नेहरूजी कितने साल जेल में रहे थे?
कुल 3258 दिन ÷365=8.92 याने ९ साल
पहली बार- 6 दिसंबर, 1921 से 3 मार्च, 1922 – 87 दिन
Read Moreवर्गात नियमित न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
विद्यार्थी मित्रांनो,
जी मुलं लेक्चरला येत नाहीयेत त्यांनी व इतरांनीही लक्षात ठेवा.
१) यावर्षी तुमची परीक्षा ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन होईल.
२) सर्व पेपर तुम्हाला लिहावे लागतील. ऑब्जेक्टिव्ह
नवीन शैक्षणिक धोरण
माझ्या एकूणच विचारांशी सहमत असलेल्या किंवा नसलेल्या सर्वांसाठी-
भारत सरकार नुकतेच जे नवीन शैक्षणिक धोरण आणू पाहत आहे, ते देशातील पुढच्या पिढ्यांचे प्रचंड नुकसान करणारे आहे. तुम्हाला या संदर्भात जिथे वाचायला
गेल्या २०० वर्षातील भारतीय समाजाची वाटचाल व मानसिकता
प्रिय बंधू आणि भगिनींनो,
या लेखात गेल्या २०० वर्षांमध्ये भारतीय समाजात कोणकोणते बदल घडून आले, त्याच्या आधी काय परिस्थिती होती व आज समाजाची मानसिकता कशी आहे, याचा थोडक्यात आढावा घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व समजूतदार नागरिकांनी हे समजून घेणे मला गरजेचे वाटते.
आज फुलेपूर्व काळ/ राज्यघटनापूर्व काळ जर आपण डोळ्यासमोर आणला तर पुढील गोष्टी आपल्यासमोर येतात.
● त्या काळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती.
● ब्राह्मणांच्या लेखी क्षत्रिय कुणीही नव्हते. कारण
‘रोजगारी’ (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दही दिशा या पुस्तकातील कथा)
‘रोजगारी’ ही कथा गावगाड्यातील एका शेतमजूर कुटुंबातील एक १४ वर्षाचा मुलगा आपल्या आई व वडिलांप्रमाणे शेतमजुरी न करता व्यवसायाला सुरुवात करतो आणि आत्मविश्वास व स्वाभिमानाने जगायला लागतो, या विषयावर आधारलेली आहे.
मारत्या ही या कथेतील महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. तो १४ वर्षाचा आहे. त्याची आई पाटलाकडे शेतमजुरी करायला जाते व त्यावर तिचा व मारत्याचा उदरनिर्वाह भागवते. तिची अशी इच्छा असते की, मुलाने सुद्धा आता आपल्यासोबत पाटलाकडे Read More
‘ससा आणि सर्कस’(SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दही दिशा या पुस्तकातील कथा)
‘ससा आणि सर्कस’ ही कथा बाब्या नावाच्या एका पाच-सहा वर्षाच्या मुलाच्या जीवनावर आधारलेली आहे. बाब्या पाच-सहा वर्षाचा असूनही त्याला ‘मा’ आणि ‘बा’ या दोन शब्दांशिवाय काहीच बोलता येत नाही. त्याच्या वेळेस त्याची आई गरोदर असताना तिच्याकडून काहीतरी आयुर्वेदिक जडीबुटी खाल्ली गेली होती. त्यामुळे बाब्या मंदबुद्धी म्हणून जन्माला आला. मोठा होऊनही त्याच्या मेंदूचा विकास होऊ शकला नाही.
बाब्यासोबत नेहमी एक ससा राहायचा. तो कुठेही गेला तरी सशाची साथ सोडायचा नाही. हा ससा त्याला एका वर्षापूर्वी Read More
‘मोर्चा’ (SNDT विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट रवींद्र शोभणे यांच्या दही दिशा या पुस्तकातील कथा)
‘मोर्चा’ ही कथा शिवराम व त्याची आठ वर्षाची मुलगी सुशी यांच्यातील प्रेमळ नाते व सुशी मोर्च्यात हरवल्यामुळे कथेच्या शेवटी त्यांची झालेली ताटातूट, त्यामुळे शिवरामची झालेली सैरभैर अवस्था यावर आधारलेली आहे.
शिवरामची बायको त्याच्यासोबत लग्न झाल्यानंतर दोन वर्ष नांदते. त्या दरम्यान त्यांना एक मुलगी होते. ती म्हणजे सुशी. सुशी एक वर्षाची असताना शिवरामची बायको एका ठेकेदारासोबत पळून जाते, त्याच्यापासून तिला पुढे तीन अपत्ये होतात, असे Read More
‘घोर’- (दाही दिशा) रवींद्र शोभणे (SNDT विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट कथा)
‘घोर’ ही कथा एका खेड्यातील आबा नावाच्या एका अल्पभूधारक शेतकर्याला त्याच्या मुलीच्या लग्नाची लागून राहिलेली काळजी (घोर) आणि त्याने त्यातून काढलेला मार्ग या विषयावर आधारलेली आहे.
आबा हा ‘घोर’ या कथेतील एक अल्पभूधारक शेतकरी आहे. त्याला एक मुलगी आहे. या मुलीच्या लग्नाच्या वेळेस हुंड्यासाठी पैसे हवेत म्हणून त्याने आयुष्यभर कष्ट करून पै पै जमवून एक शेत विकत घेतलेले असते. हे शेत विकून तो हुंड्याचे Read More
बहुजन समाजाचा निर्बुद्धपणा
बहुजन समाजातील काही बधिरांना ज्यांनी आपल्याला हजारो वर्षांच्या गुलामीतून मुक्त करून सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली असे आपले महापुरुष फक्त तोंडी लावायला हवे असतात. या महापुरुषांचे विचार, कार्य समजून घेण्यासाठी Read More
जपान व आपण
जपानने एका पिढीत संपूर्ण देशात परिवर्तन घडवून आणले होते. म्हणून जपान गेल्या सव्वाशे वर्षांपासून प्रगतीपथावर आहे. आपल्याकडे २-३ पिढ्या उलटून