नेट/ सेट उत्तीर्ण झालेल्या मित्रांनो, प्राध्यापक व्हायचंय?
नेट/ सेट उत्तीर्ण झालात. अभिनंदन!
पण खरा संघर्ष आता सुरू होईल. कारण स्पर्धा खूप
आहे. तुमची काही वर्ष वाया जाऊ शकतात.
उत्तीर्ण झालात म्हणून अभ्यास सोडू नका. अभ्यासाला पर्याय नाही. चांगल्या संस्थांमध्ये मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थी निवडले जातात. अशा ठिकाणी तुमचा कस लागतो. पास झालात व अभ्यास सोडून दिला तर तुम्ही प्रवाहाच्या बाहेर जाणार व मुलाखतीत फेल होणार. मग तुमची निवड होऊ शकत नाही.
वस्तुस्थितीत सामोरे जा. आज सहायक प्राध्यापक पदासाठी ४०-५० लाख रुपये डोनेशन घेतले जाते. ही अतिशय घाणेरडी व दुर्दैवी व्यवस्था आपल्याकडे आहे. माझ्या मते ही परिस्थिती तुम्हीच बदलायला हवी. एकत्र या. संघटना बांधा. शेतकऱ्यांच्या आंदोलनासारखे शांततामय मार्गाने आंदोलन करा. राज्यपाल, राष्ट्रपती, आमदार, खासदार , युजीसी, प्राध्यापक संघटना, विद्यार्थी संघटना यांना निवेदने द्या. भेटा. राजकारणी लोकच संस्थाचालक आहेत. प्राध्यापक भरतीतून त्यांना प्रचंड पैसा मिळतो. म्हणून ही पद्धत बदलणे सोपे नाही, पण अशक्यसुद्धा नाही.
संशोधन करा. शोधनिबंध लिहा. पीएचडी करा. वाचन व लेखन करा. इतर कौशल्ये आत्मसात करा. सोबत परिस्थिती/ व्यवस्था बदलण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा द्या. तरच तुम्हाला भविष्य आहे.
सविस्तर मार्गदर्शनासाठी हा व्हिडिओ बघा – https://youtu.be/cH7wqqUdYpI
© डॉ. राहूल पाटील