एकविसाव्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे, विविध समाजमाध्यमे यांचा वापर वाढलेला असून ते आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनून गेले आहेत. आजच्या काळात ज्ञान, माहिती, मनोरंजन, जाहिरात आणि प्रबोधन हे घटक विशिष्ट लोकांपुरते, विशिष्ट प्रसारमाध्यमांपुरते मर्यादित न राहता, त्यावर फक्त त्यांचीच मक्तेदारी न राहता सामान्य माणसंही त्यांचा वापर करू लागले आहेत. आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःची ओळख निर्माण करण्याची, स्वतःची नाममुद्रा उमटवण्याची संधी प्राप्त झाली आहे. स्वतःचे संकेतस्थळ, Facebook account/ page, Twitter, Instagram यांच्या वापरातून अनेकांनी स्वतःचा एक अनुयायी वर्ग (Followers) निर्माण केला आहे. यांसारखेच ‘ब्लॉग’ हे एक सामाजिक माध्यम आहे. त्याला ‘अनुदिनी’, ‘जालपत्रिका’ किंवा ‘जालनिशी’ Read More