मराठी विभाग अहवाल २०२१-२२
महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची सुरुवात १४/०६/२०२१ रोजी झाली. पहिल्या आठवड्यापासूनच महाविद्यालयाच्या तासिका ऑनलाइन पद्धतीने नियमितपणे सुरू झाल्या.
निकाल
एकूण परीक्षार्थी | २९ |
उत्तीर्ण | २४ |
अनुत्तीर्ण | ०५ |
निकालाची टक्केवारी | ८२.७५% |
श्रेणीनुसार विद्यार्थी संख्या |
|
ओ श्रेणी |
०१ |
ए + श्रेणी | ०६ |
ए श्रेणी | ०८ |
ब+ श्रेणी | ०३ |
ब श्रेणी | ०४ |
कश्रेणी | ०० |
ड श्रेणी | ०२ |
गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी
अ. क्र. | नाव | गुण |
१ | कांचन परशुराम महाले |
५५७+५०६=१०६३ |
२ | निवृत्ती वळे | ४८५+४६८=९६३ |
३ | दिलीप थेतले | ४२९+४७५=९०४ |
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व चांगल्या निकालासाठी मराठी विभागातील प्राध्यापक नेहमीच प्रयत्नशील असतात. या वर्षीदेखील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने टाळेबंदी घोषित केल्याने महाविद्यालय नियमित सुरू होऊ शकले नाही. म्हणून या वर्षीदेखील
विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकविण्याचा मार्ग पत्करावा लागला. त्यासाठी मराठी विभागातील प्राध्यापकांनी यूट्यूब चॅनेल सुरू केलेलेच होते. त्यावर अभ्यासाचे व्हिडिओ बनवून ते अपलोड करायला सुरुवात केली. याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कारण मुलांना केव्हाही, कुठेही व कितीही वेळेस आम्ही शिकविलेले बघणे, अभ्यास करणे त्यामुळे शक्य झाले. या व्यतिरिक्त झूम, गुगल मिट यांचाही वापर शिकविण्यासाठी केला. तसेच विद्यार्थ्यापर्यंत अभ्याससाहित्य पोहचविण्यासाठी व त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हाट्सअप, टेलिग्राम, गुगल क्लासरूम यांचा वापर केला.
विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम व उपक्रम दरवर्षी राबविले जातात. या वर्षीचे कार्यक्रम व उपक्रम पुढीलप्रमाणे-
१) मराठी भाषा संवर्धन पंधरवडा –
मराठी भाषेचा प्रसार व प्रचार व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. १४ ते २८ जानेवारी २०२२ या दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात आला. त्यानुसार आपल्या महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने पुढील कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन आभासी पद्धतीने करण्यात आले.
- काव्यवाचन स्पर्धा – दिनांक १४/०१/२०२२ – १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
- कथा अभिवाचन स्पर्धा – दि. १५/०१/२०२२ – ११ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
- पोस्टर स्पर्धेचे – दि. १६/०१/२०२२ – कोणत्याही मराठी लेखकाची माहिती लिहिलेले पोस्टर तयार करून त्याचे सादरीकरण करणारा व्हिडिओ बनवायला सांगितला होता. ०९ विद्यार्थ्यांचा सहभाग.
- पत्रलेखन स्पर्धा – दि. १७/०१/२०२२ – या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना आई, वडील, भाऊ, बहीण, काका, मामा, शिक्षक असे कुणालाही पत्र लिहून त्याची PDF मागविली. १५ विद्यार्थ्यांचा सहभाग.
- अतिथी व्याख्यान- पत्रलेखन स्पर्धेच्या आधी दि. १०/०१/२०२२ रोजी प्रज्वली नाईक यांनी zoom मिटिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘पत्रलेखन : स्वरूप, प्रकार व पद्धती’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
सर्व स्पर्धांचे परीक्षण करून विद्यार्थ्यांचे प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक काढण्यात आले. या स्पर्धांचे परीक्षण डॉ. प्रज्ञा कुलकर्णी (निवृत्त मराठी विभागप्रमुख), प्रज्वली नाईक (मुंबई), डॉ. शरद नागरे (नाशिक), प्रा. सुधर्मा काळे यांनी केले.
२) मराठी भाषा गौरव दिन –
दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेरील मराठीभाषक ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करीत असतात. या दिवसाचे औचित्य साधून मराठी विभागाच्या वतीने पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
- दि.२६/०२/२०२२ – ‘लेखक आपल्या भेटीला’ – या उपक्रमांतर्गत लेखक म्हणून कवी श्री. रवि बुधर यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी ‘साहित्याची निर्मितीप्रक्रिया’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या कवितांचे सादरीकरण केले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले होते.
- दि.२७/०२/२०२२ – मराठी विभाग व कोकण मराठी साहित्य परिषद शाखा, जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी गौरव भाषा दिन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात –
- कविसंमेलन – ८ कवींचा सहभाग.
- ‘डोंगरदऱ्यातील लोकगीतांचा जागर’ – या कार्यक्रमांतर्गत आदिवासी भागातील लोककलावंतांनी त्यांच्या पारंपारिक गीतांचे पारंपारिक वाद्यांच्या साह्याने सादरीकरण केले.
- डॉ. राहुल पाटील यांचे ‘मराठीचे महत्त्व व तिचे जतन-संवर्धन : काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान.
- श्री. देवचंद महाले, (ग्रामीण कवी, पत्रकार, त्रंबकेश्वर) यांचे व्याख्यान
- श्री. तुकाराम चौधरी (कांदबरीकार, पेठ, जि. नाशिक) यांचे व्याख्यान
- प्रा. वसंत धांडे यांचे अध्यक्षीय भाषण
- या कार्यक्रमाला जव्हार शहरातील मान्यवर नागरिक व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
३) चला, ज्ञान वाढवू या! : उपक्रम –
या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान अशा तिन्ही शाखांच्या सर्व वर्गांमधील विद्यार्थ्यांचा whatsapp ग्रुप तयार करून त्यांना २२ फेब्रुवारी ते १५ मार्च, २०२२ या दरम्यान दररोज एक-एक विषयावरील अभ्यास साहित्य उपलब्ध करून दिले. तसेच २१ मार्च, २०२२ रोजी त्यांची Google Formच्या माध्यमातून परीक्षा घेतली. एकूण ८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लावण्याचा, त्यांची बौद्धिक विकास साधण्याचा व स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्याचा उद्देश आहे.
४) ग्रंथालय भेट – १४/१२/२०२१ रोजी विद्यार्थ्यांची ग्रंथालय भेट.
५) लेखनविषयक उपक्रम – फेब्रुवारी २०२२- प्रथम व द्वितीय वर्ष कला या वर्गातील विद्यार्थ्यांकडून ‘मी का शिकत आहे?’ या विषयावर लेखन करायला सांगून त्याचे संकलन केले.
६) अतिथी व्याख्यान- ०२/०६/२०२१ रोजी डॉ. संदीप कदम (साठ्ये महाविद्यालय, मुंबई) यांचे ‘समीक्षा व समीक्षापद्धती’ या विषयावर आभासी पद्धतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले.
मराठी विभागातील प्राध्यापकांची या वर्षातील कामगिरी-
डॉ. राहुल भालेराव पाटील
- पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय औरंगाबाद यांच्या वतीने दि. १२ जुलै ते १७ जुलै, २०२१ या दरम्यान ‘मराठी भाषा व साहित्याच्या आधुनिक तंत्रस्नेही अध्यापन कार्यशाळा’ या विषयावरील सात दिवसीय कार्यशाळेत दि १६ जुलै, २०२१ रोजी ‘यु ट्युब च̌नेल माझे अनुभव’ या विषयावर साधनव्यक्ती (Resource Person) म्हणून मार्गदर्शन केले.
- दि. १९ जुलै, २०२१ रोजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेली, जि. ठाणे यांच्या वतीने आयोजित तृतीय वर्ष कला मराठी अभ्यासपत्रिका क्र. ६ ‘साहित्य आणि समाज’ या विषयाच्या एकदिवसीय पुनर्रचित अभ्यासक्रम कार्यशाळेमध्ये सहभाग.
- दि. ०५ सप्टेंबर, २०२१ रोजी मुळजी जेठा महाविद्यालयाच्या मराठी विभागाकडून आयोजित ‘नेट-सेट मार्गदर्शन कार्यशाळा २०२१’ या कार्यशाळेत ‘भाषा आविष्काराची रूपे आणि भाषाविज्ञान, व्याकरण’ या घटकावर आभासी पद्धतीने व्याख्यान दिले.
- ‘Power of Knowledge’ या An International Multilingual Quarterly Peer Review Refereed Research Journal च्या जुलै-सप्टेंबर २०२१च्या अंकात ‘आदिवासी लोकागीतांमधील स्त्रीदर्शन’ या विषयावरील शोधनिबंध प्रकाशित.
- ‘Journal of Research and Development’ या Multidisciplinary International Level Refereed Journal च्या ऑक्टोबर २०२१च्या अंकात ‘बारोमास’ कादंबरीतून चित्रित झालेले कृषिआधारित ग्रामजीवन : एक अभ्यास’ या विषयावरील शोधनिबंध प्रकाशित.
- दि. ०७ व ०८ ऑक्टोबर, २०२१ रोजी गो.ए.सो.च्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीवर्धन या महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘Career Advancement Scheme and Writing Skills of Review of Literature and Framing the Objectives and Hypothesis’ या विषयावरील दोन दिवसीय वेबिनारमध्ये सहभाग.
- दि. १६/१०/२०२१ रोजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मोखाडा, जी. पालघर यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गुगल मिट या ऑनलाइन माध्यमाद्वारे ‘वाचन संस्कृती’ या विषयावर व्याख्यान दिले.
- दि. ३० ऑक्टोबर, २०२१ रोजी संत रामदास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, घनसावंगी, जि. जालना व सहकारभूषण एस. के. पाटील कॉलेज, कुरुंदवाड, जि. कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Agriculture and Rural Development : Strategic Issues and Reform Options’ या विषयावर आयोजित एक दिवसीय बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय ई-चर्चासत्रात आभासी पद्धतीने सहभागी होऊन ‘बारोमास’ कादंबरीतून चित्रित झालेले कृषिआधारित ग्रामजीवन : एक अभ्यास’ या विषयावर शोधनिबंधाचे सादरीकरण.
- दि. ११ ते १७ नोव्हेंबर, २०२१ या दरम्यान गुरु अंगद ट्रेनिंग लर्निंग सेंटर SGTB खालसा कॉलेज, दिल्ली विद्यापीठ व श्रीमती NNC कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुसुंबा, जि. धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Essentials of Modern Efficient Teaching Practices In Higher Education’ या विषयावर आयोजित सात दिवसीय National Faculty Development Programm यशस्वीरीत्या पूर्ण केला.
- वाडा क्लस्टर अंतर्गत तृतीय वर्ष कला मराठी (सत्र पाचवे) या वर्गाच्या पेपर क्र. ६ ‘साहित्य आणि समाज’ या विषयाचा पेपर सेटर म्हणून काम केले.
- महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाकडून आयोजित ‘वाणिज्य सप्ताहा’त दि.१३/१२/२०२१ रोजी घेण्यात आलेल्या वक्तृत्त्व स्पर्धेचे परीक्षण केले व ‘वक्तृत्त्व कला कशी आत्मसात करावी?’ या विषयावर व्याख्यान दिले.
- दि. १७/१२/२०२१ रोजी अभिनव महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष कला मराठीच्या विद्यार्थ्यांना ‘अनिवार्य मराठी- सत्र पहिले’ या विषयावर अभ्यासक्रम व परीक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
- दि. २१ फेब्रुवारी, २०२२ रोजी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाकडून ‘राष्ट्रीय विज्ञान दिन-२०२२’निमित्त आयोजित पोस्टर आणि निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
- दि.२७/०२/२०२२ रोजी जव्हार महाविद्यालयाचा मराठी विभाग व कोकण मराठी साहित्य परिषद शाखा, जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठी गौरव भाषा दिन’ सोहळ्यात ‘मराठीचे महत्त्व व तिचे जतन-संवर्धन : काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान दिले.
- दि. १२/०४/२०२२ रोजी जव्हार नगरपरिषदेच्या वतीने बाबासाहेब जयंतीच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धेचे परीक्षक पद भूषविले.
- मराठी विषय घेऊन नेट/सेट, पेट, MPSC-UPSC, बीए, एम. ए. या व इतर स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी व्हाट्सअप व टेलिग्राम ग्रुप तयार केला असून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश व सिल्व्हासा-दादरा नगर हवेली या राज्यातील-केंद्रशासित प्रदेशातील एकूण १२०० पेक्षा जास्त विद्यार्थी व प्राध्यापक या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. त्यांच्या जून ते ऑगस्ट, २०२१ या दरम्यान लागोपाठ ११ आठवडे, तर जानेवारी-फेब्रुवारी, २०२२ मध्ये २ आठवडे अशा दर रविवारी Google Formच्या साह्याने ऑनलाइन पद्धतीने सराव परीक्षा घेतल्या. जानेवारी महिन्यात लागलेल्या सेट परीक्षेच्या निकालात या ग्रुपमधील मराठी विषयाचे १९ विद्यार्थी तर फेब्रुवारी महिन्यात लागलेल्या नेट परीक्षेच्या निकालात १७ विद्यार्थी (४ JRFसह) उत्तीर्ण झाले. एकूण २० जण विविध विद्यापीठांमधील पेट परीक्षा उत्तीर्ण झाले.
- ‘चला, ज्ञान वाढवू या!’ उपक्रम- या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान अशा तिन्ही शाखांच्या सर्व वर्गांमधील विद्यार्थ्यांचा whatsapp ग्रुप तयार करून त्यांना २२ फेब्रुवारी ते १५ मार्च, २०२२ या दरम्यान दररोज एक-एक विषयावरील अभ्यास साहित्य उपलब्ध करून दिले. तसेच २१ मार्च, २०२२ रोजी त्यांची Google Formच्या माध्यमातून परीक्षा घेतली. एकूण ८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
- ब्लॉगलेखन-
- मराठी विषयातील करियरच्या विविध संधी,
- विद्यार्थ्यांसाठी २४ टिप्स,
- ‘बारोमास’ कादंबरीतील व्यक्तिरेखा,
- समकालीन साहित्य,
- स्त्रीवादी साहित्य,
- दलित साहित्य: संकल्पना व स्वरूप,
- शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार कसा थांबणार?,
- सूत्रसंचालन: एक नमुना,
- गं. बा. सरदार – परिचय,
- एखाद्या डायरेक्टरला विचार की यांच्यावर किती ‘फाईल्स’ (चित्रपट) बनू शकतात?,
- बहुजनांचे व भारताचे खरे कल्याण केव्हा होईल?,
- रवींद्र शोभणे यांच्या ‘धर्म’, ‘वाफ’, ‘सांड’ या कथांचा परिचय,
- ज्ञानाधिष्ठित समाजाची वाटचाल
अशा विषयांवर लेखन करून ते Drrahulrajani.com या माझ्या ब्लॉगवर प्रकाशित केले. यापैकी काही लेखांचे व्हिडिओ बनवून ते यूट्यूबवर देखील टाकले. त्यामुळे अनेक विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व पालक यांना त्याचा लाभ झाला.
प्रा. ज्योत्स्ना राव-
- दि.०१ जुलै २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत Institute for design of Electrical Measuring Instruments यांचे ‘फिल्म मेकिंग कंपोझिटिंग अँड एडिटिंग’ हा ऑनलाइन कोर्स केला.
- पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय औरंगाबाद यांच्या वतीने दि. १२ जुलै ते १७ जुलै, २०२१ या दरम्यान ‘मराठी भाषा व साहित्याच्या आधुनिक तंत्रस्नेही अध्यापन कार्यशाळा’ या विषयावरील सहा दिवसीय कार्यशाळेत उपस्थित राहिले.
- फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट व मराठी अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२० जुलै २०२१ रोजी तृतीय वर्ष कला मराठी अभ्यासपत्रिका क्र.०८ (आधुनिक मराठी साहित्य) या एक दिवसीय पुनरर्चित अभ्यासक्रम कार्यशाळेत सहभाग.
- दि.२३ सप्टेंबर २०२१ रोजी कला महाविद्यालय, सावर्डे व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांजा तसेच आय. सी. एस. महाविद्यालय, खेड मराठी विभाग आयोजित साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘फेसाटी आणि मी’ नवनाथ गोरे या राज्यस्तरीय चर्चासत्रात सहभाग.
- महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाकडून आयोजित ‘वाणिज्य सप्ताहा’त दि.१८/१२/२०२१ रोजी घेण्यात आलेल्या वक्तृत्त्व स्पर्धेचे परीक्षण केले.
- Peer Reviewed Annual National Indexed Research Journal In Marathi Published as per UGC ( India) Guidelines च्या मराठी प्राध्यापक संशोधन पत्रिकेच्या जानेवारी २०२२ च्या अंकात ‘नारान देवाचे विधीनाट्य’ या विषयावरील शोधनिबंध प्रकाशित.
- दि.१३ मार्च २०२२ ते २४ मार्च २०२२ या वेळेत मुंबई विद्यापीठ अंतर्गत मराठी विभागाच्या वतीने आयोजित पीएच. डी. कार्यशाळेत सहभाग.
प्रा. महेंद्र कोंगील-
- दि.२३ सप्टेंबर २०२१ रोजी कला महाविद्यालय, सावर्डे व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांजा तसेच आय. सी. एस. महाविद्यालय, खेड मराठी विभाग आयोजित साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘फेसाटी आणि मी’ नवनाथ गोरे या राज्यस्तरीय चर्चासत्रात सहभाग.
- दि.१४/०३/२०२२ रोजी सोनोपंत दांडेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, पालघर अण्णासाहेब वर्तक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, वसई, मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तृतीय वर्ष कला शाखेचे मराठी अभ्यासक्रम आधारित विशेष व्याख्यान, संवाद नाटककराशी : लेखक-आशुतोष पोतदार, ‘सिंधू, सुधारक रम आणि इतर’ चर्चासत्रात सहभाग.
डॉ. राहुल भालेराव पाटील
(मराठी विभाग प्रमुख)