मराठी व इंग्रजीत Course outcomes : FYBA Marathi Syllabus- As per New Education Policy

As per New Education Policy

FYBA

शिकण्याचे परिणाम :

  • अभ्यासकांना मराठी साहित्याच्या प्रेरणा व प्रवृत्तींचा अभ्यास करून एकूण मराठी वाङ्याच्या इतिहासाच्या स्वरूपाचे आकलन होईल. त्याचबरोबर त्यांना भाषेच्या शास्त्रीय स्वरूपाचा परिचय होईल.
  • साहित्याच्या माध्यमातून समाज व संस्कृतीचा परिचय घडेल व साहित्याच्या सांस्कृतिक संदर्भाची जाण निर्माण होईल.
  • वेगवेगळ्या वाङ्यप्रकारांतील व कालखंडातील महत्त्वाच्या साहित्यकृतींचा परिचय होऊन साहित्यविषयक अभिरुची व संवेदनक्षमता निर्माण होईल. तसेच त्यांच्यामध्ये साहित्यकलेचा आस्वाद व समीक्षा करण्याची क्षमता निर्माण होईल.
  • विद्यार्थ्यांना विविध भाषिक कौशल्यांचा परिचय होऊन त्यांच्या उपयोजनाची क्षमता वाढेल.
  • विद्यार्थी मराठी भाषा, तिचा वापर व आधुनिक तंत्रज्ञान यांच्यात समन्वय निर्माण करू शकतील.
  • विद्यार्थी श्रवण, भाषण, लेखन व वाचन या भाषिक कोशल्यांवर प्रभुत्व मिळवू शकतील.

सत्र १

Name of the course: नाटक या साहित्य प्रकाराचा अभ्यास (major mandatory) (सविस्तर वाचा…)

Read More

‘वोल्गा ते गंगा’मध्ये चित्रित आदिम काळातील स्त्रीजीवन 

‘वोल्गा ते गंगा’मध्ये चित्रित आदिम काळातील स्त्रीजीवन

              राहुल सांकृत्यायन हे विसाव्या शतकातील एक महान अभ्यासक, थोर विद्वान होते. म्हणून त्यांना ‘महापंडित’ असे म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात संशोधन व अभ्यासासाठी नेपाळ, भूतान, श्रीलंका, रशिया, जर्मनी, इंग्लंड अशा विविध देशांना भेटी देऊन विस्मृतीत गेलेली असंख्य ग्रंथसंपदा शोधून काढली. मानवी इतिहास, वेद, बौद्ध वाङ्मय, मार्क्सवादी साहित्य यांचा अतिशय सूक्ष्म असा अभ्यास त्यांनी केलेला होता. त्यांनी अतिशय मौलिक अशी विपुल ग्रंथरचना केलेली आहे. त्यांनी अनुवादित व संपादित केलेल्या आणि स्वतः लिहिलेल्या ग्रंथांची एकूण संख्या सुमारे १२५ इतकी असून या ग्रंथांची पृष्ठसंख्या सुमारे ४४००० इतकी आहे. त्यांना इंग्रजी, फ्रेंच, रशियन, जर्मनी, चिनी, पर्शियन, अरबी, तिबेटी, हिंदी, बंगाली, गुजराती, मराठी, तमिळ, कानडी इतक्या भाषा Read More