अलीकडच्या काळातील काही कथासंग्रह


१) ‘ट्रोलधाड’हा वर्षा किडे-कुळकर्णी यांचा तिसरा कथासंग्रह आहे. ‘गुंतता हृदय हे’ व ‘झिरो मॅरेज’ या कथासंग्रहांनाही अखिल भारतीय स्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
ट्रोलधाड – दत्तात्रय सांडू प्रतिष्ठान चेंबूर, मुंबई,

२०२२-२३

२) विवेक कुडू यांच्या ‘चार चपटे मासे’ या लघुकथा संग्रहाला राज्य सरकारचा यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार.

३) सांजड – सुचिता घोरपडे, शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने शेतकरी साहित्य पुरस्कार २०२३

४)  प्रज्ञा बहुद्देशीय साहित्य संस्था कल्याण, महाराष्ट्र तर्फे जळगाव येथील दीपक तांबोळी लिखित ‘वाटणी’ या कथासंग्रहास प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार – २०२४

५) संतोष गोनबरे – माकडहाड डॉट कॉम, गावगाडा पुरस्कार – २०२२

६) किरण येले यांच्या ‘तिसरा डुळा’ या कथासंग्रहाला २०२० सालाकरताचा महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर झाला आहे. किरण यांना साहित्याच्या दुनियेत खरी ओळख मिळाली ती ‘बाईच्या कविता’ या बहुचर्चित कवितासंग्रहामुळे. ‘मोराची बायको’ या कथासंग्रहामुळे बदललेल्या लेखन-प्रवासातही किरण तितकेच यशस्वी झाले.

७) आसाराम लोमटे यांच्या आलोक या कथासंग्रहाला २०१६ या वर्षाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

८) किरण गुरव – बाळूच्या अवस्थांतराची डायरी, २०२१ या वर्षाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

९) अनंता सूर – वाताहत

१०) तिची वाटच वेगळी’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार, सोलापूरचा भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार, प्रवरानगरचा पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आनंदीबाई शिर्के पुरस्कार, जगद्‍गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचा पुरस्कार, हिंगोलीचा संत नामदेव साहित्य पुरस्कार आणि लोहा येथील खोब्राजी चव्हाण साहित्य पुरस्कार असे सात पुरस्कार प्राप्त.
सदर कथासंग्रहाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात तसेच सोलापूर विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश.
या कथासंग्रहातील कथांचे नांदेड आकाशवाणी केंद्रावरून क्रमशः अभिवाचन झाले. तसेच आकाशवाणीच्या नांदेड व उस्मानाबाद केंद्रावरून कथांचे नाट्यीकरण सादर करण्यात आले.

११) प्रतिशोध कथासंग्रह सर्वोत्तम साताळकर, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने आनंदीबाई शिर्के स्मृती पारितोषिक २०२१.

१२) मराठी भाषा विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१६. जयसिंगपूर येथील लेखिका नीलम माणगावे यांच्या ‘निर्भया लढते आहे’ या कथासंग्रहाला प्रौढ वाङ्मय लघुकथा प्रकारात ‘दिवाकर कृष्ण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. एक लाख, स्मृतिच‌िन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

१३) साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या (Suryodaya Mandal ) एकोणीसाव्या वर्धापनदिनानिमित्त स्व. गिरिजा कीर यांच्या स्मरणार्थ कथा पुरस्कार नाशिक येथील सप्तर्षी माळी यांच्या ‘फिंद्री’ या कथासंग्रहाला,
जळगाव येथील दीपक तांबोळी यांच्या रंग हळव्या मनाचे या कथासंग्रहाला,
कापूसवाडी, जामनेर ( Kapusvadi, Jamner ) येथील प्रा. डॉ. युवराज पवार यांच्या शिकार या कथासंग्रहाला पुरस्कार प्रत्येकी रुपये 1500 गौरवपत्र,
पुण्याच्या संजय ऐलवाड यांच्या बिबट्याचे पिल्लू आणि इतर कथा या बालकथासंग्रहाला राज्यस्तरीय सूर्योदय बालकथा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून रुपये 1100, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

१४) कथाकार राहुल निकम यांच्या संवर्ग या कथासंग्रहाला कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार – २०२३

(संग्रहित)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *