कविता जगणारा महाकवी : विंदा करंदीकर
(‘गिरणांगण’ या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वार्षिकांकात वर्ष २००९-२०१० मध्ये प्रकाशित झालेला लेख)
मराठी साहित्याला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण लेखनाने वैश्विक पातळीवर नेणाऱ्या आणि मराठीला तिसरे मानाचे ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणाऱ्या विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचे दि. १४ मार्च २०१० रोजी निधन झाले. अवघ्या महाराष्ट्राने हे अटळ दुःख ‘माझ्या मन बन दगड…’ असे म्हणून सहन केले. त्यांच्या निधनाने मराठी काव्य क्षेत्रातील / साहित्यक्षेत्रातील एका पर्वाचा अंत झाला.
विंदांनी कविता, बालकविता या प्रकारांव्यतिरिक्त लघुनिबंध, समीक्षा, अनुवाद या प्रकारांतही लेखन करून मोलाची भर घातली. आपल्या ‘बहुपेडी’ व्यक्तिमत्वाने त्यांनी या साहित्यप्रकारांवर अमीट ठसा उमटविला. मात्र कवी म्हणूनच त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. त्यांनी आपल्या आशयातील विविधता, नाविण्यपूर्णता आणि अभिव्यक्तीतील प्रयोगशीलतेने मराठी कवितेचा चेहरा – मोहरा बदलून टाकला. बालकवितांच्या माध्यमातून ते अवघ्या महाराष्ट्राच्या मुलांचे ‘आजोबा’ बनले. त्यांच्या निधनानंतर मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे, व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना ‘संन्यासी कवी’, ‘ध्रुवताऱ्यासारखा अढळ प्रकाश देणारा’, ‘मराठी Read More