विठ्ठलाशी संवाद -आषाढीच्या निमित्ताने…


बा विठ्ठला,
तू वेदांमध्ये नाहीस, उपनिषदांमध्ये नाहीस, रामायण महाभारतामध्ये नाहीस. तू कुठलाही पुराणांमध्ये नाहीस. पण तू इथल्या मातीत रुजलेला आहेस! इथल्या मेघांमधून वर्षत आहेस! इथल्या फुलांमध्ये तुझाच सुगंध दरवळत असतो आणि इथल्या संगीतातून, तालासुरातून,

Read More

मुलाखत लेखन – श्री. रवी बुधर यांची यांची मुलाखत (विषय : आदिवासी समाज, संस्कृती : परिचय’)

       मित्रांनो, आज आपण आदिवासी समाज, त्यांची संस्कृती, शिक्षण, अर्थव्यवस्था अशा विषयांवर चर्चा करणार आहोत आणि या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत प्रसिद्ध कवी श्री. रवी बुधर सर हे आहेत. मी सर्वप्रथम रवी बुधर सरांचे मनःपूर्वक स्वागत करतो. तसेच सुरुवातीला त्यांचा परिचय करून देतो.  

रवी बुधर सर हे ग्रामीण कवी व अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ते प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असून सध्या प्राथमिक व माध्यमिक शाळा चौक, ता. जव्हार, जि. पालघर येथे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.

✴️ ते अ.भा.मराठी साहित्य परिषद पुणे यांच्या जव्हार तालुका शाखेचे सचिव आहेत.

Read More

बहुजनांनी मोक्याच्या जागा का मिळवाव्यात? भविष्यात काय करावे?

गोविंदराव पानसरे यांच्या ‘जात, धर्म…’ नावाच्या एका पुस्तकात त्यांनी शेतमजूर कुटुंबातून आलेला न्यायाधीश व जमीनदाराच्या कुटुंबातून आलेला न्यायाधीश यांनी एकाच गुन्ह्यातल्या आरोपींना

Read More

पुनर्जन्म – एक घातक संकल्पना-

प्रिय बहुजन बंधू-भगिनींनो,

पुनर्जन्म या संकल्पनेने इथल्या शूद्र-अतिशूद्रांच्या ५६ पिढ्यांची माती केली आहे. त्यांची भयंकर गुलामगिरी या संकल्पनेमुळे टिकून राहिली.

कसे ते पहा.

Read More

सरस्वती व माझे पूर्वज

सरस्वतीला भारतात हजारो वर्षे ज्ञानाची देवता मानले गेले आहे. पण तिच्यामुळे भारतातील स्त्रिया, शूद्र, आदिवासी व भटक्या जमाती यांना शिक्षणाचा, ज्ञानग्रहणाचा अधिकार मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

आजही सरस्वतीच्या देशात 75% पेक्षा जास्त साक्षरता

Read More

आस्तिक, नास्तिक, श्रद्धा-अंधश्रद्धा : परिणाम

आस्तिक असणे किंवा नास्तिक असणे, यात चांगले काय व वाईट काय हा प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की, धर्माच्या नावाने/ श्रद्धेच्या आधारे चालू असलेल्या प्रथा ह्या फक्त आनंदासाठी नसतात. याच्यातून सामाजिक

Read More

भारत धर्मराष्ट्र व्हायला हवे!

पुण्यातील दगडू शेठ हलवाईच्या गणपतीसमोरील दरवर्षी हजारो स्त्रियांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठण, उच्चशिक्षित स्त्रियांची दररोजची कर्मकांडे, दैववाद, उपास-तापास, या सर्वांमधील बहुजनांचा

Read More

बहुजनांच्या सण-उत्सवांचे बदलते स्वरूप-

या ऑगस्ट महिन्यातील २६ तारखेला पोळा हा सण साजरा करण्यात आला. पोळा हा ग्रामीण भागातील लोकांचा अतिशय जुना व महत्त्वाचा सण मानला जातो. ज्या बैलांच्या सहाय्याने शेतकरी शेती कसतो, ज्यांच्या मदतीशिवाय शेतात राबणे, शेतातील सर्व कामे करणे शक्य नव्हते, हजारो वर्षे आपल्या शेकडो पिढ्या ज्याच्यामुळे जगल्या, अशा बैलांबद्दल

Read More

गेल्या २०० वर्षातील भारतीय समाजाची वाटचाल व मानसिकता

            प्रिय बंधू आणि भगिनींनो, 

         या लेखात गेल्या २०० वर्षांमध्ये भारतीय समाजात कोणकोणते बदल घडून आले, त्याच्या आधी काय परिस्थिती होती व आज समाजाची मानसिकता कशी आहे, याचा थोडक्यात आढावा घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व समजूतदार नागरिकांनी हे समजून घेणे मला गरजेचे वाटते. 

        आज फुलेपूर्व काळ/ राज्यघटनापूर्व काळ जर आपण डोळ्यासमोर आणला तर पुढील गोष्टी आपल्यासमोर येतात.

● त्या काळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती.
● ब्राह्मणांच्या लेखी क्षत्रिय कुणीही नव्हते. कारण

Read More

बहुजन समाजाचा निर्बुद्धपणा

          बहुजन समाजातील काही बधिरांना ज्यांनी आपल्याला हजारो वर्षांच्या गुलामीतून मुक्त करून सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली असे आपले महापुरुष फक्त तोंडी लावायला हवे असतात. या महापुरुषांचे विचार, कार्य समजून घेण्यासाठी Read More

जपान व आपण

           जपानने एका पिढीत संपूर्ण देशात परिवर्तन घडवून आणले होते. म्हणून जपान गेल्या सव्वाशे वर्षांपासून प्रगतीपथावर आहे. आपल्याकडे २-३ पिढ्या उलटून

Read More

सनातन्यांची कारस्थाने

           नाशिकमध्ये पाथर्डी फाट्याच्या बाजूला गामणे ग्राउंड आहे. हे ग्राउंड अतिशय मोठे आहे. येथे दररोज अक्षरशः हजारो लोक- ज्यात तरुण जास्त असतात- खेळायला-फिरायला येत असतात. या ठिकाणी आज यांनी गुढीपाडवा साजरा केला. पण गुढीपाडवा साजरा करत असताना यांच्या

Read More

बहुजनांचे व भारताचे खरे कल्याण केव्हा होईल?

प्रिय बंधू-भगिनींनो,

               हिंदू धर्मातील शूद्र, अतिशूद्र, आदिवासी, स्त्रिया अशा जवळपास ८५-९०% घटकांच्या गेल्या २००० वर्षातील आपल्या पूर्वजांना शिक्षणाचा, संपत्ती संचय करण्याचा, राज्य मिळवण्याचा अधिकार मुस्लिमांनी नाकारलेला

Read More

एखाद्या डायरेक्टरला विचारा की यांच्यावर किती ‘फाईल्स’ (चित्रपट) बनू शकतात?

एखाद्या डायरेक्टरला विचारा की यांच्यावर किती ‘फाईल्स’ (चित्रपट) बनू शकतात?

              तुम्ही ‘काकस्पर्श’ हा चित्रपट पाहिलेला आहे का? एका बालविधवेचे दुःख, वेदना या चित्रपटामधून मांडलेल्या आहेत. हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित

Read More

भगवद्गीता : थोडं चिंतन (एका पोस्टवरील प्रतिक्रिया…)

          गीता ही मूळ महाभारताचा भाग नाहीये. असे अभ्यासक मानतात. ती खूप नंतर लिहून महाभारतात युद्धाच्या प्रसंगाच्या आधी जोडली गेलेली आहे. त्यामुळे तिच्यातील तत्त्वज्ञान हे महाभारताचा जो कोणता काळ असेल, त्या काळाचे तत्त्वज्ञान नसावे. गीतेत कर्मयोग, सांख्य, ज्ञानयोग असे ज्याला जे हवे आहे असे Read More

‘हिंदू’ शब्दाच्या अनुषंगाने चिंतन…

   ‘हिंदू’ हा शब्द पर्शियन लोकांनी सिंधू नदीपलीकडे राहणाऱ्या लोकांना म्हणजे आपल्या तत्कालीन पूर्वजांना वापरला. ते सिंधू नदीच्या पश्चिमेकडे राहायचे व आपण पूर्वेकडे. त्यांच्या दृष्टीने इकडे राहणारे वैदिक-अवैदिक, आर्य-अनार्य, ब्राह्मण, बौद्ध, Read More

बरं झालं आपण विज्ञान युगात जन्माला आलो!

बरं झालं, आपण विज्ञानयुगात जन्माला आलो! कोरोना कशापासून होत आहे, त्याच्यापासून संरक्षण कसे करावे, आजार झालाच तर तर काय करावे हे तरी

Read More

‘आदिवासी समाजाची सद्यस्थिती आणि भवितव्य’ या विषयावरील व्याख्यानासाठी मी काढलेल्या नोट्स

          ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.’ खरं तर मी आदिवासी नाही. पण आदिवासी भागात काम करत आहे. आदिवासींची दुःखे, त्यांचे जगणे, त्यांच्या समस्या आदिवासी समाजाइतकी मला माहीत नाहीत. पण माझ्या निरीक्षणातून, संपर्कातून, अनुभवातून, चर्चांमधून मला जे ज्ञात आहे, ते मांडण्याचा नम्रपणे मी प्रयत्न करीत आहे. काही चुकलं तर आपल्या थोर अशा क्षमाशील संस्कृतीप्रमाणे मला माफ करणार, अशी अपेक्षा आहे.

            इतिहास- पार्श्वभूमी-

            आजच्या घडीला संपूर्ण जगात जवळपास ५००० आदिवासी समूह आहेत. ज्यांची लोकसंख्या ३७ कोटींच्या आसपास आहे. तसेच संपूर्ण जगात आदिवासींच्या जवळपास ७००० भाषा आहेत.

          भारतात आदिवासी समाजाची लोकसंख्या ही जवळपास १० कोटी असून ती भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ८.६% आहे. याचाच अर्थ असा की, भारतात आदिवासींची खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असून हा समाज अगदी प्राचीन कालखंडापासून Read More

‘गणपति’ का मतलब

दोस्तों, इस लेख के माध्यम से मै आपको गणपति का सही अर्थ बता रहा हूँ. मै सबके धार्मिक भावनाओ का सन्मान करता हुँ. लेकिन एक अभ्यासक के नाते अनुसंधान से जो सच सामने आता है, उसे बताना भी जरूरी होता है. इसलिए मै ये कहे रहा हुँ.

  गणपति वर्तमान राष्ट्रपति और सभापति के जैसा

Read More

शिवजयंतीनिमित्त

          प्रिय मित्रांनो, 
       येत्या १९ फेब्रुवारी रोजी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत महाराष्ट्रातील पहिले पराक्रमी व कर्तबगार महापुरुष, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१वी जयंती आपण सर्वजण उत्साहात साजरी करणार आहोत. या दिवशी आपण मोटरसायकलला झेंडा लावून रॅल्या काढतो,

Read More

‘गणपती’चे वास्तव

 गणपती हे आताचे राष्ट्रपती, सभापती यांसारखेच एक पद होते. ती व्यक्ती नव्हती. राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचा प्रमुख. सभापती म्हणजे सभेचा प्रमुख. त्याचप्रमाणे गणपती म्हणजे गणांचा प्रमुख. समुहाचा, समुदायाचा प्रमुख.
 
         ‘गण’ म्हणजे लाेकं, समुह, समुदाय (अनेकनचनी रूप). शब्दकोशांमध्ये तपासून पहा, ‘गण’ या शब्दाचा हाच अर्थ दिलेला आहे. तर पती म्हणजे प्रमुख (नवरा नव्हे).  

Read More

काय वाचावे?

बरेच जण म्हणतात की, वाचन करणे चांगले असते. वाचनाचे अमुक-तमुक फायदे असतात. बरोबरच आहे. वाचनाचे खरंच खूप फायदे आहेत. परंतु, त्याच्यासोबत काय वाचायचे, कोणती पुस्तके वाचायची हेही कळायला पाहिजे. आमच्या ‘साहित्य आणि समाज’ या TYBA च्या विषयाच्या एका पुस्तकात ‘हजारो वर्षे समाजाचे मन एकाच ठिकाणी थांबवून ठेवण्याचे सामर्थ्य साहित्यात असते’, असे एक वाक्य आहे. अगदी खरं आहे ते. कारण बहुतांश

Read More

बौद्धिक दबावगट

लोकशाही राज्यात दबावगट नावाची एक संकल्पना असते. आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक असे विविध क्षेत्रातील दबावगट असतात. औद्योगिक क्षेत्रातील लोकं असेच दबाव टाकून त्यांना योग्य व अनुकूल निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडतात. बौद्धिक क्षेत्रातील लोकांचाही दबावगट असतो. पण राज्यकर्ती मंडळी वैचारिकदृष्ट्या कमकुवत असली

Read More

नवीन, आधुनिक व विधायक समाजनिर्मितीसाठी संशोधनाची गरज

             मेंदूत नवीन विचार व कल्पनाच येत नसतील, तर नवीन संशोधन कसे होणार? संशोधनच नाही झाले तर आरोग्य, शिक्षण, शेती, पाणी, शस्त्रास्त्रे, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, पर्यावरण संरक्षण, शहर नियोजन इ. इ. क्षेत्रांमध्ये नवीन भर पडून त्यावर आधारित उद्योग, व्यवसाय कसे निर्माण होणार? असे काही घडले नाही तर अनेकांच्या हाताला काम कसे मिळणार?

Read More

काय असतं एवढं पुस्तकात?

             

              वाचन करणाऱ्यांबद्दल बऱ्याचदा लोकं असं म्हणत असतात की, “तो ना, तो नेहमी पुस्तकातच डोकं घालून बसलेला असतो. काय असतं एवढं पुस्तकात, कुणास ठाऊक!”

                 खरंच, काय असतं पुस्तकात एवढं? काय असतं?

               मित्रांनो, पुस्तकात भूत, भविष्य, वर्तमान असतं. काळाचा एक विस्तीर्ण व व्यापक असा पट पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यासमोर उभा राहतो. पुस्तकांमध्ये विविध स्वभावाची, विविध प्रवृत्तीची माणसं आपल्याला भेटतात. तशी ती आपल्या भोवती असतातच. पण पुस्तकांमधून अशी असंख्य माणसं त्यांच्या स्वभावधर्मासकट आतून-बाहेरून ती जशी आहेत, अगदी तशीच आपल्यासमोर प्रकट होतात. त्यापैकी काही वर्तमानातील असतात, तर काही भूतकाळातील. काही काल्पनिक असतात, तर काही Read More

बुद्ध मला का आवडतात?


मला बुद्ध का आवडतात?

गौतम बुद्ध हे नाव मी पहिल्यांदा केव्हा ऐकले किंवा वाचले, हे मला आता आठवत नाही. त्यांच्याविषयी मला माहिती केव्हा मिळायला सुरुवात झाली, तो आरंभबिंदू, माझे तेव्हाचे वय हेही मी आज सांगू शकत नाही. पण साधारणत: गेल्या १४-१५ वर्षांपासून मी बुद्धांच्या विचारांच्या संपर्कात असेल. बुद्ध मला का आवडतात, किंबहुना सर्वात जास्त का आवडतात, हा प्रश्न आज मला स्वतःलाच पडला. मला आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी सहज विचारले आहे की, तुमचे सर्वात आवडते महापुरुष कोणते? माझ्याकडून नकळत गौतम बुद्ध असे उत्तर दिले गेलेले आहे किंवा मनात तरी गौतम बुद्धांचेच नाव आलेले आहे. तर का आवडतात मला बुद्ध?

Read More

लोकशाही

लोकशाही व्यवस्थेत तात्त्विकदृष्ट्या सर्वजण समान असतात. व्यावहारिकदृष्ट्या मात्र खूप विषमता व भेदाभेद असतो. ही विषमता व भेदाभेद जसजसा कमी होत जाईल, तसतशी लोकशाही सुदृढ व सामान्यांसाठी फायदेशीर ठरत जाईल. परंतु त्यासाठी सामान्य लोकांनी लोकशाही

Read More

कोरोना व मानवजातीचे अपराध

कोरोना व मानवजातीचे अपराध

मानवजातीसमोर आज कोरोना नामक विषाणूचे खूप मोठे संकट उभे ठाकलेले आहे. किंबहुना, हा मानवाचे अस्तित्वच नष्ट करतो की काय? अशी शंका, असा यक्षप्रश्न आज मानवजातीसमोर आ वासून उभा राहिलेला आहे. आतापर्यंत अशा अनेक आजारांना, विषाणूंना पुरून उरणारा मानव आजच्या प्रगत विज्ञानाच्या युगातही एका विषाणूसमोर अक्षरशः हतबल झालेला दिसून येत आहे.

सर्व जगात, आज मी हे लिहीत आहे त्या दिवसापर्यंत जवळपास ४०००० लोकांचा जीव या विषाणूने घेतलेला आहे. अमेरिका, स्पेन, इटली, जर्मनी, चीन, सिंगापूर, जपान अशा प्रगत-अतिप्रगत देशांनी या विषाणूसमोर, त्यापासून होणार्‍या आजारासमोर गुडघे टेकलेले दिसून येत आहेत. या विषाणूच्या प्रादुर्भावापासून प्रतिबंध करू शकणारी लस अथवा त्याच्यापासून व्यक्ती बाधित झाल्यावर त्याला बरे करण्यासाठी नेमके, अचूक (Proper) औषध शोधून त्याला आवर घालण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ

Read More

कोरोना आणि एकांत

कोरोना आणि एकांत


          मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनाने सर्व जगभर थैमान घातलेले आहे. या विषाणूपासून होणाऱ्या आजारामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडलेले असून लाखोंना याची लागण झालेली आहे. या विषाणूवर अजून तरी कोणतीही लस किंवा औषध सापडले नसल्याने याचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ नये म्हणून आपल्याला बाहेरच्या सर्वांशी प्रत्यक्ष संपर्क तोडून, सर्व कामधंदे सोडून घरात बसणे भाग आहे. अशा पद्धतीने रिकामे घरात बसणे अनेकांना असह्य होत असल्याने बरेच जण बाहेर पडणे चुकीचे आहे, हे माहित असताना देखील एखादा फेरफटका मारून येत आहेत. आज मात्र आपल्याला सक्तीचे घरात बसून राहावे लागणार आहे. एवढेच नाही तर पुढे कदाचित अनेक दिवस आपल्याला घरात बसून काढावे लागतील, असे चित्र सध्यातरी दिसत आहे.

          मित्रांनो, आपण सर्वच जण (आजच्या घडीला जगभरातील ४०० कोटींपेक्षा जास्त लोकं) या सक्तीच्या एकांताला

Read More

ट्रॉयमधील तत्त्वज्ञान

प्रिय मित्रांनो,

   ‘ट्रॉय’ हा हॉलिवूडमधील एक प्रसिद्ध चित्रपट आहे. तो होमरच्या ‘इलियड’ या महाकाव्यवर आधारलेला आहे. या चित्रपटाला ऑस्करसह अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या चित्रपटातील अखिलिस या पात्राच्या तोंडी आलेली पुढील वाक्ये मला खूप आवडतात- Read More

माणूसपण

माणूसपण

 

माणसा-माणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. उदा. धर्म, जात, पंथ, संप्रदाय, पक्ष, लिंग, वय, वर्ण, रंग, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, देश, प्रांत, वंश, भाषा, वेशभूषा, संस्कृती, प्रथा-परंपरा, दैवते, विचारधारा, प्रस्थापित-विस्थापित इ. इ.

Read More

देशद्रोही?

देश हा फक्त भौगोलिक सीमांनी मिळून बनलेला नसतो. तर भौगोलिक प्रदेश व त्या भुप्रदेशातील माणसांनी मिळून देश तयार होत असतो. जसे घर हे फक्त भिंतींनी बनलेले नसते, तसेच देशाचे आहे. Read More