कधी कधी कुणास ठाऊक
एकटं राहावसं वाटतं
गर्दीतून बाहेर पडून
पाय नेतील तिकडे
निघून जावसं वाटतं
अनोळखी रस्ता तुडवावा
दि. १८ जुलै रोजी मला अध्यापनाच्या क्षेत्रात येऊन १२ वर्षे पूर्ण झाली. कालच्याच दिवशी २००८ साली मी जळगावच्या डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात रुजू झालो होतो. त्यानंतर मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ज्युनियर रिसर्च फेलो व नंतर सिनियर रिसर्च फेलो म्हणून काम केले. गेल्या साडे आठ वर्षांपासून जव्हार येथे अध्यापन करीत आहे. Read More
भाषा हे ज्ञान आत्मसात करण्याचे सर्वात महत्वाचे साधन, माध्यम आहे. त्यामुळे हे साधन चांगल्या पद्धतीने वापरता येणे, या माध्यमावर आपले प्रभुत्व असणे हे खूप गरजेचे असते. कोणतीही भाषा लहानपणी जेवढ्या सहज व लवकर शिकता येते. तेवढी नंतर जमत नाही. मोठं झाल्यावर भाषाशिक्षणासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात.
अलीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे लोण शहरांपासून तर अगदी खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचलेले आहे. मात्र इंग्रजी
केंद्राच्या १५℅ कोट्यातील मेडिकलच्या एकूण जागांमधील ओबीसींसाठी असलेले २७% आरक्षण बंद करून टाकले गेलेले आहे. त्यामुळे यापुढे दरवर्षी जवळपास ३००० पेक्षा जास्त OBC च्या जागा कायमस्वरूपी संपून गेलेल्या आहेत.
गेल्या २ वर्षात OBC च्या मेडिकलमधील ५५०० पेक्षा जास्त जागा OBC ना न देता त्या general
Read Moreलोकशाही राज्यात दबावगट नावाची एक संकल्पना असते. आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक असे विविध क्षेत्रातील दबावगट असतात. औद्योगिक क्षेत्रातील लोकं असेच दबाव टाकून त्यांना योग्य व अनुकूल निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडतात. बौद्धिक क्षेत्रातील लोकांचाही दबावगट असतो. पण राज्यकर्ती मंडळी वैचारिकदृष्ट्या कमकुवत असली
Read Moreविद्यार्थी मित्रांनो, आम्ही प्राध्यापकांनी लॉकडाऊनच्या काळात एकही दिवस वाया न घालवता अनेक वेबिनार अटेंड केले, अनेकांनी वेबिनार आयोजित केले. ७ किंवा १४ दिवसांचे online कोर्स केले, व्हिडिओ, PPT कसे बनवावेत, ते एडिट कसे करावेत, Google form वगैरेसारख्या कित्येक गोष्टी शिकून घेतल्या. Youtube, zoom वरून भरपूर ऐकलं, पुस्तकं वाचली, तुमच्यासाठी नोट्स तयार केल्या, अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ तयार केले. Facebook live, zoom, google meet च्या माध्यमातून तुम्हाला, समाजाला संबोधित केले. Online अनेक उपक्रम राबविले.
अनेकांनी आपले पीएचडी, एमफिलचे अपूर्ण राहिलेले काम पुढे नेले. ज्यांनी आपले प्रबंध आधीच विद्यापीठाला सादर केले होते, त्यापैकी काहींनी ऑनलाइन पद्धतीने मौखिक परीक्षा (Viva) देऊन पीएचडी पदवी संपादित केली.
Youtube वरून खूप सारे tutorial बघून अनेक कौशल्ये आत्मसात केली.
आम्ही जेव्हा-जेव्हा फोनवर बोललो तेव्हा जास्त तुमच्याविषयीच बोललो, तुमचीच काळजी आम्हाला वाटत राहिली. स्वतःचा हा विकास आम्ही फक्त तुमच्यासाठीच करत राहतो. यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समाजाचा व देशाचा फायदाच होतो.
तुम्ही काय केले? आत्मपरीक्षण करा.
मित्रांनो, आयुष्यात पुढे जायचे असेल तर स्वस्थ बसून कसे चालणार बरं? तुम्हीच सांगा व तुम्हीच ठरवा.
आयुष्यात जिथून जे मिळेल, ते आत्मसात करत नवीन शिकत राहायला हवे. कालपेक्षा आज आपली थोडी का असेना समज, आकलन, बौद्धिक उंची वाढलेली असायला हवी. थांबून चालणारे कसे?
एक शिक्षक
(सर्व शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मी वरील मत व्यक्त केले.)
आज SYBA च्या वर्गात फळ्यावर’ संसद, लोकसभा / राज्यसभा, विधानसभा / विधानपरिषद असे शब्द लिहिले. भारतीय संसदेत काय येतं, असे विचारले. ३०-३५ मुलांपैकी कुणालाच सांगता आलं नाही. त्यानंतर तुम्ही ज्यांना आमदार व खासदार म्हणून निवडून देतात ते वरीलपैकी कोणत्या सभागृहात जाऊन बसतात , असे विचारले. नाही सांगता आले. नाही सांगता आले.
मागच्या वर्षी NSS मधील प्रवेशासाठी जवळपास ३०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यात काेणत्याही ५
Read Moreमी जून २००७ मध्ये एम. ए. झालो. त्याच महिन्यात २९ जून रोजी झालेली नेट परीक्षा मी (नोव्हेंबरमध्ये निकाल) उत्तीर्ण झालो. त्यानंतर जून २००८ मध्ये झालेली नेट परीक्षा मी JRF सह उत्तीर्ण झालो. नंतर मी दोन वर्ष JRF व चार महिने SRF (फेलोशिप) घेतली.
डिसेंबर २०११ च्या आधी ही परीक्षा फक्त वस्तुनिष्ठ स्वरूपाची नव्हती. पहिला व दुसरा पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असायचा तर तिसरा पेपर लिहावा लागायचा. त्यात संकल्पना, दीर्घोत्तरी प्रश्न, ४० गुणांसाठी निबंध इ. स्वरूपाचे प्रश्न विचारले जायचे व २०० गुणांच्या पेपरसाठी फक्त अडीच तास वेळ दिलेली असायची. तेव्हा कमी वेळेत अतिशय अचूक उत्तरे लिहावी लागायची. Read More
घटनाक्रमाकडे जरा लक्ष द्या-
३० जानेवारीला भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला.
फेब्रुवारीमध्ये ट्रम्प यांच्या स्वागतासाठी लाखो लोकं एकत्र केले गेले.
१६ मार्चपर्यंत अख्या भारतातील शाळा, महाविद्यालये सुरू होती.
१९ मार्चला जनता कर्फ्युची घोषणा
२२ मार्चला जनता कर्फ्यूचा फार्स पार पडला.
२३ तारखेपर्यंत संसदेचे अधिवेशन सुरू होते.
२३ तारखेला मध्यप्रदेशात शपथ घेतली.
२४ तारखेला बहुमत सिद्ध केले.
मेंदूत नवीन विचार व कल्पनाच येत नसतील, तर नवीन संशोधन कसे होणार? संशोधनच नाही झाले तर आरोग्य, शिक्षण, शेती, पाणी, शस्त्रास्त्रे, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, पर्यावरण संरक्षण, शहर नियोजन इ. इ. क्षेत्रांमध्ये नवीन भर पडून त्यावर आधारित उद्योग, व्यवसाय कसे निर्माण होणार? असे काही घडले नाही तर अनेकांच्या हाताला काम कसे मिळणार?
ग्रामीण-दलित कादंबऱ्यांची आशयसूत्रे
(१)
ग्रामीण आणि दलित साहित्यलेखनाला सुरुवात होऊन आता बराच काळ लोटला आहे. या साहित्यप्रकारांवर आतापर्यंत खूप चर्चा व लेखनही झालेले आहे. अगदी सुरुवातीच्या काळात साहित्याच्या प्रवाहाबाहेरील, दुर्लक्षित, उपेक्षित अशा जीवनाविषयीचे दलित व ग्रामीण साहित्य आज मराठी साहित्याचा मध्यवर्ती प्रवाह बनलेलेले आहे, ही निश्चितच महत्त्वाची बाब आहे.
दलित आणि ग्रामीण साहित्य हे मराठी साहित्याने भारतीय साहित्याला दिलेली मोठी देणगी आहे. खास मराठी मातीतून उगवलेलं, अस्सल देशीवादी साहित्य म्हणून या साहित्याचा उल्लेख करता येईल. प्रस्थापित मराठी साहित्य हे मध्यमवर्गीय जीवनाभोवती रुंजी घालत असताना, रंजनवादी, कलावादी विचारांचा मराठी साहित्यावर जबरदस्त प्रभाव असताना ग्रामीण व दलित साहित्याने मराठी साहित्याला वास्तवाभिमुख, समाजाभिमुख करण्याचे बहुमोल कार्य केलेले आहे.
ग्रामीण आणि दलित साहित्यात पुष्कळ साम्य आहे. त्यातील एक म्हणजे या दोन्ही प्रकारच्या साहित्यात गावातील व गावकुसाबाहेरील लोकांच्या जीवनाचे चित्रण आलेले आहे. मात्र ग्रामीण साहित्यात गावकुसाच्या आतील लोक केंद्रभागी असतात; तर दलित साहित्यात गावकुसाबाहेरील. उपेक्षित विश्वाचे, खऱ्या-खुऱ्या दुःखांचे, मानवी भावभावनांचे, ग्रामीण भागात, गावकुसाबाहेर मोठ्या प्रमाणात पसरलेल्या दुर्लक्षित, अज्ञान, दारिद्र्य, भूक, शोषण, वेदना यांनी पिचलेल्या समाजाचे, इथल्या मूळ मातीचे, लोकपरंपरांचे, लोकसंस्कृतीचे, शिक्षणाने, महापुरुषांच्या विचारांनी, कार्याने जागृत झालेल्या, परिवर्तनाच्या टप्प्यावर, उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या, आत्मभान प्राप्त झालेल्या, आपल्या हक्कांसाठी, साध्या माणूसपणाच्या अधिकारासाठी विद्रोहास सज्ज असलेल्या मानव समुहांचे, त्यांच्या बदलत चाललेल्या जीवनाचे, येथल्या कृषिसंस्कृतीचे, आदिम जीवनाचे अशा या मध्यमवर्गीयांना अपरिचित असलेल्या विश्वाचे दर्शन ग्रामीण व दलित साहित्याने मराठी वाचकाला घडविले.
(२)
(१९/०२/२०१४ रोजी ‘शिवजयंती’निमित्त मी छत्रपती शिवाजी शासकीय व निमशासकीय कर्मचारी पतसंस्था, जव्हार, जि. पालघर आयोजित कार्यक्रमात दिलेल्या व्याख्यानाची पूर्वतयारी करताना खालीलप्रमाणे लिहून ठेवले होते.)
भारतात कोणत्याही कालखंडात राज्यसत्ता, धर्मसत्ता आणि अर्थसत्ता या तीनही सत्ता मूठभर लोकांच्या हातात राहिल्या आहेत. हा विशिष्ट वर्ग वगळता इतर जे वर्ग किंवा जो समाज यापासून वंचित राहिला व बऱ्याच अंशी आजदेखील आहे तो बहुजन वर्ग, असे मला वाटते. या बहुजन वर्गात हिंदू, बौद्ध, मुस्लिम इ. या सर्व धर्मातील लोकं येतात. या बहुजन समाजाच्या सद्यस्थितीविषयी मला विचार मांडण्यास संयोजकांनी सांगितले होते. थोडे स्वातंत्र्य घेऊन ती सुधारण्याचे काही उपायही मी सांगणार आहे किंवा विवेचनाच्या ओघात ते आपोआपच येणार आहेत.
विवेचनाच्या सुरुवातीला एक गोष्ट मला आवर्जून सांगाविशी वाटते. अलीकडच्या काळात भारतीय समाजामध्ये तीन प्रकारच्या परंपरा असल्याचे मला दिसून येते.
(१) भारतीय स्वातंत्र्याची परंपरा, Read More
‘गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’ (साधना प्रकाशन) हे पुस्तक वाचले. सुरेश द्वादशीवार यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीत
सदर पुस्तक लिहिलेले आहे. या पुस्तकातून जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, जीना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर व इतर तत्कालीन नेत्यांचे जीवन, कार्य, स्वभाव, सामर्थ्य, मर्यादा व गांधीजींशी त्यांच्या असलेल्या संबंधांवर लेखकाने
प्रकाश टाकलेला आहे. अनेक ग्रंथ, पत्रव्यवहार, डायऱ्या यांचा अभ्यास करून, आवश्यक तेथे त्यातील संदर्भ दिलेले आहेत. या पुस्तकाच्या वाचनाने गांधींजीच्या संदर्भातील अनेक गैरसमज दूर होतील आणि ज्या महापुरुषाने आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी व देशातील सामान्य माणसाच्या उद्धारासाठी खर्ची घातले. भारतातील विविध जाती-धर्मांमध्ये शांतता, सौहार्द, बंधुभाव निर्माण व्हावा, यासाठी हौतात्म्य पत्करले. जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा लोकलढा जगाच्या इतिहासातील आजवरच्या सर्वात मोठ्या साम्राज्याविरूद्ध पुकारला व तो यशस्वी करून दाखविला, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येईल.
Read Moreगोपाळ गणेश आगरकर यांची त्यांच्या हयातीत प्रेतयात्रा काढली होती, म. फुलेंना मारण्यासाठी रामोशी धाडले होते, तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवली होती, नंतर त्यांना सदेह वैकुंठीही पाठवले, म. गांधी, दाभोळकर, पानसरे यांच्या हत्याच झाल्यात. आंबेडकरांचा कित्येक वेळेस अपमान झाला, त्यांना धमक्या दिल्या गेल्या. (अशी असंख्य उदाहरणे देता येतील). किती मन दुखवले असेल या महापुरुषांनी त्या काळातील लोकांचे! त्याशिवाय बिच्चाऱ्या लोकांनी असे केले असेल का?
Read Moreआयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर दुसरा कुणीतरी आपल्याला कायमचा सुखी करेल, ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. सुख हे एक भ्रम आहे. तुम्ही जितके त्याच्या मागे पळाल, तितके दुःख पदरात पडेल. सुख तुमच्या आत आहे. तुमच्या मनात. ते तिथेच शोधा. तुम्हाला ते एकदाचे सापडले म्हणजे तुम्ही कायमस्वरूपी सुखी झालात असेही नव्हे. त्याला तुम्ही चिमटीत पकडून ठेवू शकत नाही. ते निसटल्यावर तुम्हाला ते पुन्हा-पुन्हा शोधत राहावे लागेल. पण त्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही.
(१२-१३ वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले सापडले.)
इंडियातल्या भारतीयाचे विचार
(सदर लेख १२-१३ वर्षांपूर्वी मी विद्यार्थीदशेत असताना लिहिलेला असून जसाच्या तसा टाईप करून टाकला आहे. लेख वाचताना स्वतः ला अपवाद समजून वाचावे व तसे वाटत नसल्यास आत्मपरीक्षण करावे. पण वाईट वाटून घेऊ नये.)
भारत सध्या तरुणांचा देश मानला जात आहे. या देशात सर्वात जास्त तरुण आहेत. पण या तरुणांच्या हाताला काम कुठे आहे? यावर तथाकथित यशस्वी, उच्चवर्गीय, श्रीमंत वर्ग असं म्हणतो की, ज्याने -त्याने मेहनत करून स्वतःचे काम स्वतः मिळवायला पाहिजे, असं म्हणणाऱ्यांना जोड्याने हाणावसं वाटतं. कारण हे स्वतःच्या श्रीमंतीत, प्रतिष्ठेत मग्रूर आहेत. यांना फक्त मुकेश, अनिल अंबानी बंधू, सचिन तेंडुलकर, काही फिल्मस्टार यांच्या संपत्तीचे हिशेब (तेही कायदेशीर. त्यांची बेकायदेशीर संपत्ती स्वतः त्या व्यक्तींनाही माहिती नसेल) माहिती आहेत. पण या देशात किती टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली आहे? किती टक्के लोक निरक्षर अज्ञानी आहेत?, दर दिवसात किती शेतकरी आत्महत्या करत आहेत?, किती बालके कुपोषणामुळे मरत आहेत?, या देशातल्या प्राथमिक, माध्यमिक, आश्रमशाळांचा दर्जा कसा आहे? दारिद्र्यामुळे हाताला काम न मिळाल्यामुळे किती लोकांची कुचंबणा होत आहे? या प्रश्नांची उत्तरे या महाभागांकडे आहेत का? मुंबईत बेस्टने किंवा लोकल ट्रेनने जाताना झोपडपट्ट्या, Read More
अभ्यास कसा करावा (भाग-१)
मित्रांनो, एखाद्या विषयावर जर आपल्याला प्रभुत्व मिळवायचे असेल तर आपल्याला त्या विषयातील मूलभूत संकल्पना स्पष्ट असणे अत्यंत आवश्यक असते. प्रत्येक विषयात असंख्य मूर्त, अमूर्त अशा वस्तू, गोष्टी असतात. त्यांचे काहीएक स्वरूप, व्याप्ती व विस्तार असतो. त्याचे काटेकोरपणे आकलन करून घेतले, दोन वस्तू, गोष्टी यातील साम्य-भेद, सीमारेषा व्यवस्थित समजून घेतल्या तर आपली त्या विषयावर पकड निर्माण होते.
या असंख्य संकल्पना स्पष्ट करून घेण्यासाठी, त्यांचे नियमित वाचन होणे, त्या नियमितपणे नजरेखालून जाणे, त्यावर विचार, चर्चा, चिंतन, मनन होणे गरजेचे असते. त्यासाठी त्या जर एकाच संदर्भ पुस्तकात मिळत असतील, तर अशी पुस्तके संग्रही ठेवून त्यांचे अध्ययन करायला हवे. मात्र एखाद्या विषयात असे संदर्भग्रंथ उपलब्ध नसतील तर आपण स्वतः एक मोठी २०० पेजेस वही घेऊन त्या वहीत सुवाच्च अक्षरांत त्या त्या विषयातील तज्ज्ञांनी, अभ्यासकांनी लिहिलेल्या ग्रंथाचे वाचन करून त्यात जिथे-जिथे संज्ञा, संकल्पना स्पष्ट केलेल्या आढळतील. त्या या वहीवर लिहून घ्यायला हव्यात.
फायदे- Read More
संविधान हा माझ्या
आत्म्याचा हुंकार आहे
संविधानाचा सरनामा
माझ्या जगण्याचा गाभा आहे.
माझ्यात एक भारत आहे
मीही एक भारत आहे
आज माझ्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली. इतकी वर्षे कशी निघून गेली, फुलपाखरासारखी उडून गेली, ते कळलंही नाही. १० वर्षात खूप बदलले, माझ्या जगण्यातही खूप बदल झाले. हळूहळू प्रगतीची एक एक पायरी चढत गेलो. सुखी जीवनासाठी जे-जे हवे असते, ते सर्व मिळत गेले. यात अर्थातच माझ्या सर्व कुटुंबाची साथ मोलाची आहे.
१० वर्षांपूर्वी अतिशय गरिबीत माझ्या संसाराची सुरुवात झाली. लग्न झाले तेव्हा मी फेलोशिपवर (JRF) होतो. दीड वर्षानंतर नोकरी मिळाली. मग आम्ही जव्हारला म्हणजे नोकरीच्या ठिकाणी राहायला गेलो. नोकरी तर मिळाली परंतु एका तांत्रिक कारणामुळे पहिले पाऊणे तीन वर्षे पगार सुरू झाला नाही. नंतर मात्र सर्व सुरळीत सुरू झाले.
या सर्व संघर्षाच्या काळात गरिबीचा कोणताही अनुभव व सवय नसताना माझ्या पत्नीने- वैशूने मला मोलाची साथ दिली. म्हणून मीही मानसिकरित्या स्थिर राहू शकलो व माझ्या करियरमध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये प्रगती साधू शकलो. Read More
प्रस्तावना :
साहित्याला समाजजीवनाचा आरसा असे म्हणतात. त्या-त्या कालखंडातील श्रेष्ठ अशा साहित्यकृतींमधून समकालीन घडामोडी, विचारप्रणाली, त्याचा जनमानसावर होणारा परिणाम याचे काल्पनिक पात्रे व घटनाप्रसंगांच्या माध्यमातून वास्तव असे चित्रण केलेले असते. म्हणूनच आपल्याला तत्कालीन समाजाचे दर्शन घडत असते. म्हणून साहित्य हे समाजजीवन अभ्यासण्याचे एक महत्वाचे साधन मानले जाते.
पाकिस्तान निर्मितीची घटना ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची राजकीय घटना आहे. भारताच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनावर या घटनेचे तात्कालिक व दूरगामी असे अनेक परिणाम घडून आलेले आहेत. १९४५ च्या आसपास पाकिस्तान निर्मितीचा विचार जोर पकडू लागला होता. इंग्रजांनी या विचारांना खतपाणी घालण्याचे काम केले. मुस्लीम लीग हा मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष होता. या पक्षाने स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा जोरदार पुरस्कार करायला सुरुवात केली. मोहम्मद अली जिनांचे नेतृत्त्व याच मुद्द्यावरून पुढे आले. मुस्लिमबहुल गाव व शहरांमध्ये या विचारांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला होता. स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीमागची कारणे, त्यामागची विचारधारा, त्यासाठी निवडलेले मार्ग, सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आणि या घटनेचे परिणाम यांचे चित्रण १९६० ते १९७५ या कालखंडातील या कादंबर्यांमधून पुढीलप्रमाणे आलेले आहे.
मराठी ग्रामीण कादंबर्यांमधील चित्रण :
मराठीतील १९६० ते १९७५ या कालखंडातील ग्रामीण कादंबर्यांपैकी हमीद दलवाई लिखित ‘इंधन’ (१९६८) ही अतिशय वास्तववादी स्वरूपाची कादंबरी आहे. या कादंबरीत पाकिस्तान निर्मिती, त्या दरम्यान झालेले दंगे, मोहम्मद अली जीना इ. गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. या कादंबरीत कोकणातील एका मुस्लीमबहुल खेड्याचे जीवनचित्रण आलेले आहे. या गावातील मुसलमानांचा पाकिस्तान निर्मितीसाठी जीनांना पाठिंबा होता. ते मुस्लीम लीग या पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांनी तिथल्या मापारी मशिदीजवळ दंगाही घडवून आणलेला होता. नायकाच्या वडिलांना आणि इतर मुसलमानांना असे वाटायचे की, “पाकिस्तान मिळालं की, सब कुछ ठीक होईल. इकडे मुसलमान, तिकडे हिंदू राहिले की कुणी कुणाच्या केसाला धक्का लावणार नाही.” १ परंतु, स्वातंत्र्य मिळून पंधरा वर्षे झालीत तरी हिंदुस्थानातील हिंदू-मुस्लीम संबंधांत आणि भारत-पाकिस्तानात प्रचंड तणाव राहिला. हे बघून नायकाच्या वडिलांना असे वाटते की, पाकिस्तान निर्मिती ही जीना साहेबांकडून झालेली मोठी चूक आहे. एकदम स्वतंत्र पाकिस्तान मागण्याऐवजी भारताशी कुठे तरी बांधून घ्यायला हवे होते. म्हणजे अशी वाईट अवस्था झाली नसती. जीनासाहेब एवढे हुशार होते. परंतु, ही चूक त्यांच्या हातून झाली. आम्ही त्यांना पाठिंबा दिला. परंतु, आम्ही अडाणी, अशिक्षित प्रजा होतो. ते पुढारी होते. त्यांनी आम्हाला सुधारायचे काम होते.
यावरून, भारत-पाक फाळणीला पंधरा वर्षे उलटल्यावर पाकिस्तान निर्मिती ही जीनांकडून झालेली एक मोठी चूक आहे, असे या कादंबरीतील मुसलमानांना वाटत असल्याचे दिसून येते. कारण ज्या हेतूसाठी पाकिस्तानची मागणी केली होती. तो पूर्ण होऊ शकला नाही. हिंदू-मुस्लीम आणि भारत-पाक यांच्यातील संबंध नंतरच्या काळातही तणावग्रस्त राहिले.
या कालखंडातील इतर मराठी कादंबर्यांमध्ये या संदर्भातील चित्रण आढळले नाही.
हिंदी ग्रामीण कादंबर्यांमधील चित्रण :
मला विद्यार्थीदशेत पुस्तकं वाचताना त्यातील महत्त्वाचे परिच्छेद, वाक्ये, संवाद, सुभाषिते, कवितांच्या ओळी इत्यादी लिहून ठेवण्याची सवय होती. अशा कित्येक वह्या माझ्याकडे भरून पडलेल्या आहेत. आजही ते वाचलं तरी त्यातील बरचसं मी कुठे बसून वाचलं (म्हणजे धाब्यावर, शेतात, गावाबाहेरच्या शाळेत, बसस्टँडवर, बसमध्ये, लायब्ररीत की अजून कुठे), मी कोणत्या पोझिशनमध्ये बसलेलो होतो हे सर्व आठवतं. स्वतःचे ते चित्र, image
Read More
वाचन करणाऱ्यांबद्दल बऱ्याचदा लोकं असं म्हणत असतात की, “तो ना, तो नेहमी पुस्तकातच डोकं घालून बसलेला असतो. काय असतं एवढं पुस्तकात, कुणास ठाऊक!”
खरंच, काय असतं पुस्तकात एवढं? काय असतं?
मित्रांनो, पुस्तकात भूत, भविष्य, वर्तमान असतं. काळाचा एक विस्तीर्ण व व्यापक असा पट पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यासमोर उभा राहतो. पुस्तकांमध्ये विविध स्वभावाची, विविध प्रवृत्तीची माणसं आपल्याला भेटतात. तशी ती आपल्या भोवती असतातच. पण पुस्तकांमधून अशी असंख्य माणसं त्यांच्या स्वभावधर्मासकट आतून-बाहेरून ती जशी आहेत, अगदी तशीच आपल्यासमोर प्रकट होतात. त्यापैकी काही वर्तमानातील असतात, तर काही भूतकाळातील. काही काल्पनिक असतात, तर काही Read More
अक्षर मानव या संघटनेने परवा असे आवाहन केले की, “आपल्या नाशिकवरून मुंबई-आग्रा हायवेने असंख्य लोकं पायी, सायकलीने किंवा मिळेल त्या वाहनाने त्यांच्या गावी काही आपल्याच राज्यात तर काही परराज्यात निघालेले आहेत. त्यांच्यासाठी आपण पोळी-भाजी, बिस्कीट पुडे, फळे, पाण्याच्या बाटल्या हे व इतर खाद्यपदार्थ जे काही असेल ते उपलब्ध करून घ्यायचे आहे. त्यासाठी उद्या सकाळी ९.०० वा. आपण वरील वस्तू घेऊन या. आम्ही कसारा घाटाजवळ त्या त्यांच्यापर्यंत पोहचवू.”
तोपर्यंत लॉकडाऊनचे नियम पाळायचे म्हणून आम्ही घराबाहेर पडत नव्हतो. पण उद्या पोळीभाजी व बिस्किट पुडे घेऊन जायचे मी निश्चित केले. माझा मित्र चंद्रकांत पाटील व माझे स्टाफ मेम्बर विजय शिंदे हे माझ्या बाजूलाच राहतात, त्यांनाही मी हे सांगितले. ते पण लगेच तयार झाले.
परवा ठरल्याप्रमाणे मी व माझा मित्र आम्ही दोघे जण कारने हायवेवर आलो. पण तिथे भरधाव वेगाने ट्रक, रिक्षा व इतर वाहने धावत होती. मग आम्ही हायवेनेच मुंबईच्या दिशेने ४-५ किमी पुढे गेलो व मुंबईकडून येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला जाऊन उभे राहिलो. जवळपास अर्धा तास आम्ही तिथे उभे होतो. आम्ही पोळी-भाजीचे ते पार्सल देण्यासाठी अनेक वाहनांना हात दिला. पण ते काही थांबले नाहीत. सायकलीने जाणाऱ्यांना आम्ही बिस्किट पुडे दिले. कारण रस्त्यावर काहींनी जेवणाची व्यवस्था केलेली असल्याने त्यांनी आमच्याकडून पोळी-भाजी काही घेतली नाही. मग आम्ही अक्षर मानवच्या कार्यकर्त्यांकडे ते सोपवले. ते कसाऱ्याकडे घेऊन गेले.
या अर्ध्या तासादरम्यान मी रस्त्याने जाणाऱ्या स्थलांतरितांची जी परिस्थिती बघितली, ती अतिशय भयानक होती. लोकं अक्षरश: मिळेल त्या वाहनाने गावाच्या, आपल्या लोकांच्या भेटीच्या ओढीने निघालेले आहेत. पायी, सायकल, मोटरसायकल, रिक्षा, कार,
Read More
मला बुद्ध का आवडतात?
गौतम बुद्ध हे नाव मी पहिल्यांदा केव्हा ऐकले किंवा वाचले, हे मला आता आठवत नाही. त्यांच्याविषयी मला माहिती केव्हा मिळायला सुरुवात झाली, तो आरंभबिंदू, माझे तेव्हाचे वय हेही मी आज सांगू शकत नाही. पण साधारणत: गेल्या १४-१५ वर्षांपासून मी बुद्धांच्या विचारांच्या संपर्कात असेल. बुद्ध मला का आवडतात, किंबहुना सर्वात जास्त का आवडतात, हा प्रश्न आज मला स्वतःलाच पडला. मला आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी सहज विचारले आहे की, तुमचे सर्वात आवडते महापुरुष कोणते? माझ्याकडून नकळत गौतम बुद्ध असे उत्तर दिले गेलेले आहे किंवा मनात तरी गौतम बुद्धांचेच नाव आलेले आहे. तर का आवडतात मला बुद्ध?
मी राष्ट्रीय सेवा योजना विभागात (NSS) जून २०१२ ते ऑक्टोबर २०१८ अशी साडे सहा वर्ष कार्यक्रम अधिकारी (Program Officer) म्हणून काम केलेले आहे. या काळात महाविद्यालयाचे ६ तर एक राज्यस्तरीय व एक जिल्हास्तरीय असे ७-७ दिवसांचे ८ श्रमदान शिबिर आयोजित करण्याची संधी मला मिळाली. आमच्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागात ३०० विद्यार्थी असल्याने आमच्याकडे ३ कार्यक्रम अधिकारी असतात. या श्रमदान शिबिरांमध्ये व्याख्यानाच्या सत्रांमध्ये आम्ही या काळात ‘विवाहपूर्व समुपदेशन’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करायचो. मुलांसाठी पुरुष डॉक्टर तर मुलींसाठी स्त्री डॉक्टर असे एकाच वेळी वेगवेगळे मार्गदर्शनपर सत्र आम्ही घ्यायचो. जव्हारच्या सरकारी रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. रामदास मराड हे अतिशय सोप्या भाषेतून मुलांच्या शंकांचे निरसन करायचे. त्यांच्यासोबत दरवर्षी वेगवेगळ्या महिला डॉक्टर असायच्या. त्या मुलींना वेगळ्या खोलीत मार्गदर्शन करायच्या. सुरुवातीला मुलं व मुली
Read Moreयादों के सहारे
जिया नही जाता
तेरा मुझसे बिछडना
सहा नही जाता
मै सब कुछ था
एक दिन तुम्हारे लिए Read More
अंत:करणाचे बोल!
बहुजन समाजात जन्माला आलो. बहुजन समाजात लहानाचा मोठा झालो. प्रचंड कष्ट करून जिद्दीने चांगले उच्च शिक्षण घेतले. पीएचडी पदवीसाठी संशोधन करतानाही मराठी आणि हिंदीतील ग्रामीण कादंबर्यांचा अभ्यास करून काहीएक प्रमाणात ग्रामीणांच्या म्हणजेच बहुजनांच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केला. (जो आजही चालू आहे व पुढेही चालू राहणार.) बहुजन समाजाच्या जगण्यात विधायक व सकारात्मक बदल घडवून आणणार्या विचारधारा व संत, महापुरुषांच्या विचारांशी संवादी राहून आतापर्यंत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करीत राहिलो. बहुजन समाजाच्या सर्व क्षेत्रातील मागासलेपणाची कारणे वेगळी शोधण्याची आवश्यकता भासली नाही. कारण आपले
हिमालय में मेरे मन को ‘विशाल’ता प्राप्त हुई,
‘अतुल’नीय ‘अनुभव’ मिला
जिंदगी के कई ‘(श्री)रंग’, ‘रूप(एश)’ देखे
खुशी के ‘तुषार’ से मन तृप्त हुआ
मन मे तरह तरह के भाव(इका) आने लगे Read More
विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या परीक्षा केव्हा होतील, हे आज आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीत. तुमच्या परीक्षा जेव्हा होतील, तेव्हा होतील किंवा न होवोत, तुम्ही तुमचा अभ्यास थांबवता कामा नये. उलट मी असे म्हणेन की, या लॉकडाऊनच्या निवांत अशा काळामध्ये तुम्ही
Read More
कोरोना व झोपडपट्ट्यांमधील लोकांचा प्रश्न
(सदर लेख लिहितेवेळी एकट्या मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ४४४७ इतकी आहे. तसेच हा लेख लिहिताना मी अनेकांशी फोनवर बोललोय व तज्ज्ञांची मते विचारात घेतलीत, कृपया याची नोंद घ्यावी.)
माझे वडील ३५ वर्षे मुंबईत कांदिवली येथील लक्ष्मीनगर, हनुमाननगर या झोपडपट्टी परिसरात राहिलेले आहेत. माझे सख्खे काका, सख्खे मामा व सख्खी मावशी उधना (सुरत) येथे गेल्या ३०-३५ वर्षांपासून राहताहेत. मुंबई-उधनामधील झोपडपट्ट्या, तेथील राहणीमान, छोटी छोटी घरं, तेथील अज्ञान, निरक्षरता, १२-१२ तास काम करूनही कमी वेतनमान इत्यादी गोष्टी मी अगदी लहानपणापासून खूप जवळून बघितलेल्या, अनुभवलेल्या आहेत. हे सर्व आत्ताच सांगण्याचे कारण म्हणजे गेल्या एक महिन्यापासून लॉकडाऊनमुळे या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांची काय अवस्था होत असेल, हा विचार राहून राहून माझ्या मनात येत आहे.
मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये अक्षरशः १० बाय १० किंवा १२ बाय १० ची म्हणजे १०० ते १२० चौरस फूटच्या रूम असतात. त्या रूममध्येच आंघोळीसाठी तसेच भांडे, कपडे धुण्यासाठी छोटीशी मोरी असते. बाजूला गॅस सिलेंडर व शेगडी, स्वयंपाकाची भांडी ठेवण्यासाठी छोटीशी रॅक वगैरे असते. या रूममध्ये जेमतेम दोन किंवा तीन व्यक्ती कशाबशा राहू शकतात. येथे तर चार-पाच जणांपासून (तर अनेक ठिकाणी) दहा बारा जणांचे कुटुंब राहते. उधना-सुरत मध्येही अशीच परिस्थिती आहे. हीच अवस्था भारतातल्या कोणत्याही मोठ्या शहरांमधील निम्नवर्गीय वस्तींची आहे. या झोपडपट्ट्यांमधील व्यक्तींना शौचासाठी सार्वजनिक Read More
एकनाथला आता आभाळात ढग येऊ लागल्याने पावसाळा सुरू होईल असे वाटते. त्यासोबतच आता पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव कशी करावी, याची चिंता त्याला सतावू लागते. त्याच्या कुटुंबात तोच आता कर्ता आहे. व्यवहार त्याच्याच हातात आहे. लहान भाऊ मधू याचे शेतकीचे शिक्षण झालेले असूनही त्याला शेतीत बिलकूल रस नाही. तो गावातील त्याच्या काही सुशिक्षित परंतु बेरोजगार व रिकामटेकड्या मित्रांबरोबर गावाबाहेरच्या माळरानावर जुन्या ऐतिहासिक खुणा असलेल्या ठिकाणी खोदकाम करून सोने, जुन्या काळातील दागिने शोधण्यासाठी दररोज रात्र-रात्रभर जातो. त्याला त्याबद्दल घरातल्यांनी काही बोलले तर तो सांगतो की, “मले सोनं उकरायले जाऊ देत नाई, त नाई जात. मंग मले जीप देऊन द्या एक. सन्नान चिखली-खामगाव आशा सवार्या वाह्यतो. अन् दणकावून पैसे कमावून आणतो.” (पृ. ६) पण जीप घेण्यासाठी घरात कुणाकडेच पैसे नसल्याने त्याची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. Read More
‘बारोमास’ ही सदानंद देशमुख यांची ग्रामीण जीवनाचा सर्वांगीण वेध घेणारी कादंबरी २००२ साली प्रकाशित झाली. या कादंबरीला २००४ साली भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. या कादंबरीमधून ग्रामीण भागातील तीन पिढ्यांमधील बदलत्या ग्रामवास्तवाचे, कृषीजीवनाचे चित्रण आलेले आहे.
बारोमास म्हणजे बारा महिने. बारा महिने शेतकऱ्यांना शेतीची कामे करत असताना पेरणीपासून ते कापणीपर्यंत व शेतमाल मार्केटमध्ये नेऊन तो विकून पैसे मिळेपर्यंत; तर पुढील वर्षांच्या पेरणीपूर्वी मशागतीपर्यंत शेतकर्यांना ज्या काही हालअपेष्टाना सामोरे जावे लागते, त्याचे चित्रण या कादंबरीत सदानंद देशमुख यांनी अतिशय वास्तवदर्शी शैलीतून साकारलेले आहे.
ही कादंबरी विदर्भातील मोहाडी तालुक्यातील सांजोळ गाव व त्या भोवतालच्या ग्रामीण परिवेश यावर आधारलेली आहे. या कादंबरीत तीन पिढ्यांचे चित्रण आलेले आहे. नानूआजा, वडील सुभानराव-आई शेवंता, त्यांची मुलं एकनाथ, मधू, सून अलका अशा
प्रस्तावना :
स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये ग्रामीण भागामध्ये जमीनदार हा अतिशय सधन असा वर्ग होता. ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्येच्या मानाने या जमीनदारांची लोकसंख्या अतिशय कमी होती. म्हणजे एका गावात एक किंवा दोन घरे असायची. या वर्गाकडे मुबलक प्रमाणात शेती होती. शेती हे त्यांच्या उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन होते. याव्यतिरिक्त काही जमीनदारांकडे शेतसारा वसुलीचे अधिकार होते. त्यामुळे जवळपास संपूर्ण गाव, गावातील लोकं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर अवलंबून असायचे. त्यांचे राहणीमान अतिशय उच्च दर्जाचे असायचे. मोठमोठी घरे, वाडे, दागदागिने, महाग, किमती कपडे, दळणवळणासाठी घोडे, बैलांची सारवट गाडी यांचा वापर ते करत. जमीनदार हा वर्ग ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणाच होता. कारण गावातील बहुतांश लोकं जमीनदारांच्या शेतावर राबून, प्रसंगी त्यांच्याचकडून कर्ज घेऊन आपला उदरनिर्वाह भागवित.
स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने जमीनदारी निर्मूलनाचा (कुळकायदा) केला. या कायद्याचा जमीनदारांच्या उत्पन्नाच्या साधनांवर, आर्थिक स्थितीवर, त्यांच्या राहणीमानावर खूप मोठा व दूरगामी परिणाम घडून आला. जमीनदारांची शेतजमीन जे शेतकरी, कुळं कसायचे, कुळकायद्याने ती शेती त्यांच्या मालकीची झाली. तसेच जमीनदारांकडची अतिरिक्त शेतजमीन काढून घेण्यात आली आणि ती भूमिहीनांमध्ये वाटण्यात आली. शेती हेच या जमीनदारांचे उत्पन्नाचे सर्वात महत्त्वाचे व प्रभावी साधन असल्याने नंतरच्या काळात त्यांची आर्थिक स्थिती खूप मोठ्या प्रमाणात ढासळली. अनेक जमीनदारांकडे त्या-त्या भागातील शेतसारा वसुलीचा अधिकार होता. स्वातंत्र्योत्तर काळात त्यासाठी स्वतंत्र सरकारी यंत्रणा तयार करण्यात आल्याने त्यांच्याकडून हा अधिकार काढून घेण्यात आला. त्यामुळे त्यांचे उत्पन्नाचे आणखी एक साधन कमी झाले. या अशा अनेक कारणांमुळे स्वातंत्र्योत्तर काळात अनेक जमीनदार कर्जबाजारी आणि आर्थिकदृष्ट्या बेजार झाले. १९६० ते १९७५ या कालखंडातील मराठी आणि हिंदीतील ग्रामीण कादंबर्यांमध्ये या वर्गाचे, त्यांच्या आर्थिक स्थितीचे, राहणीमानाचे, पडझडीचे चित्रण पुढीलप्रमाणे आलेले आहे.
आपल्याकडील शिक्षण क्षेत्राकडे सहज नजर टाकली तर आपल्याला जिल्हापरिषदेच्या शाळा सोडल्या तर जिकडेतिकडे माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर स्तरावरील शिक्षण देणाऱ्या शाळा व महाविद्यालये ही खाजगी संस्थांचालकांचीच दिसून येतात. याव्यतिरिक्त अलीकडे इंग्रजी माध्यमाच्या केजी, नर्सरीपासूनच्या खाजगी शाळांचेही जणू पेव फुटलेले आहे.
या संस्थांमधील शाळा-महाविद्यालयांमध्ये विनाअनुदानित, तासिका तत्त्वावर वर्षानुवर्षे काम करणारे असंख्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. या शिक्षकांना, प्राध्यापकांना २०००, ५०००, १०००० किंवा अपवादात्मक ठिकाणी या पेक्षा थोडे जास्त मासिक वेतन दिले जाते. त्यात परत मे महिन्यात ब्रेक दिला जातो. म्हणजे त्या महिन्याचे वेतन दिले जात नाही. काही ठिकाणी तर सहा महिन्यांमधून, वर्षातून एकदा थोडेफार ‘मानधन’ दिले जाते. त्यांच्याकडून त्या-त्या शैक्षणिक संस्थेत वाट्टेल ते काम करून घेतले जाते. अनेकदा त्यांना शिक्षणाव्यतिरिक्त इतर राजकीय कामांसाठीही वापर करून घेतला जातो. शाळा-महाविद्यालय अनुदानित असेल तर आपण एक ना एक दिवस पर्मनंट होऊ, या आशेने हे बिच्चारे कोणतेही काम टाळत नाहीत. आपल्यावर वरिष्ठांची, पदाधिकाऱ्यांची, संस्थाचालकांची खप्पा मर्जी होऊ नये, म्हणून ते अतिशय काळजी घेतात.
आजूबाजूची परिस्थिती बघितल्यावर आपल्यासारख्याच कित्येक वर्ष काम करणार्यांना वगळून पर्मनंट जागेसाठी ऐनवेळेस दुसऱ्याला घेतले गेले हे ऐकल्यावर, प्रत्यक्ष पाहिल्यावर यांच्यात नैराश्य येत जाते. त्यांच्या मनातही भीती, असुरक्षितता निर्माण होत जाते. त्यापैकी अनेकांचे लग्न झालेले असते. अनेक जण गरिबीच्या परिस्थितीतून आलेले असतात. कुटुंबाची त्यांच्यावर जबाबदारी असते. कर्जबाजारी असतात. आज ना उद्या आपल्या कष्टाचे, प्रामाणिकपणाचे, आपण संस्थेसाठी केलेल्या कामाचे चीज Read More
बाबासाहेबांना बुद्धी देवाने दिली!
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या चांगल्या संपर्कातील एक व्यक्ती मला बऱ्याचदा अमुक तमुक बाबांबद्दलचे मेसेज पाठवायची. ती व्यक्ती आरक्षण घेऊन नोकरीला लागलेली होती. त्या व्यक्तीच्या घरात अनेक जण नोकरीला होते. त्या व्यक्तीला मी हक्काने बोलू शकत असल्याने एकदा मी त्या व्यक्तीला विचारले की,
“तुला नोकरी या बाबांमुळे मिळाली की दुसऱ्या कुणामुळे? तुझे जीवनमान कुणामुळे सुधारले? तुझी, तुझ्या कुटुंबाची एवढी प्रगती कुणामुळे घडून आली?”
मग ती व्यक्ती मला गंमतीने म्हणाली की, “मला माहित होतं की तू असे मेसेज पाठविल्याने उत्तर देशील.”
मी म्हटलं, ” विषयानंतर करू नको. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे दे”.
बाबासाहेबांचे विद्यार्थी जीवन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उर्फ भीमराव रामजी आंबेडकर हे जगातील सार्वकालीन थोर विद्वान, अभ्यासक म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे त्यांचे ज्ञान त्यांनी त्यांच्या स्वतःच्या करिअर व विकासापुरतेच सीमित ठेवले नाही. तर भारतातील ५००० वर्षांची शोषणाची, गुलामीची परंपरा मोडून काढण्यासाठी, येथील सामान्य माणसाला सामाजिक गुलामीतून, शोषणातून मुक्त करण्यासाठी, त्याच्या जगण्याला पशुपातळीवरून मानवी पातळीवर आणून अर्थ प्राप्त करून देण्यासाठी वापरले. अशा या महामानवाच्या विद्यार्थी जीवनाबद्दल खूप कमी जणांना अचूक माहित असते. तेव्हा ते माहीत व्हावे व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना त्यापासून प्रेरणा मिळावी, त्यांनीही ते वाचून कार्यप्रवृत्त व्हावे, म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे एकूणच विद्यार्थीजीवन आपल्यासमोर मांडत आहे.
बाबासाहेबांचे नाव भीमराव असले तरी लहानपणी त्यांना सर्वजण भिवा म्हणत. ती एकूण १४ भावंडे होती. बाबासाहेब सर्वात लहान होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये झाला. त्यांचे वडील रामजी हे लष्करात सुभेदार होते. पण सुभेदार असूनही त्यांनी लष्करातील मुला-मुलींसाठी दिवसाच्या शाळा व प्रौढांसाठी रात्रीच्या शाळांमध्ये १४ वर्षे हेडमास्तरकी केलेली असल्याने त्यांना शिक्षणाचे महत्त्व उमगलेले होते. म्हणून त्यांनी भिवाच्या शिक्षणाकडे, अभ्यासाकडे खूप लक्ष दिले. भिवा १-२ वर्षांचा असताना त्यांचे वडील निवृत्त झाले. त्यांना नोकरी करत असताना अल्पसे वेतन होते. निवृत्तींनंतर ते कोकणातील काप दापोली येथे स्थायिक होण्यासाठी आले. परंतु तेथे दापोली येथील नगर परिषदेच्या शाळेमध्ये अस्पृश्य मुलांना प्रवेश नाकारण्यात आल्याने मुलांच्या शिक्षणासाठी ते १८९४-९५ च्या सुमारास मुंबई व नंतर सातारा येथे स्थलांतरित झाले.
नेट-सेटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर ही परीक्षा पास होऊन प्रमाणपत्र पदरात पाडून घ्यायला हवे.
मानवजातीची आज जी प्रगती घडून आलेली आहे. ती काही अचानक व एका रात्रीत घडून आलेली नाही. गेल्या लाखो वर्षात हळूहळू एक एक टप्पा गाठत, पायर्या चढत माणूस आज इथवर येऊन पोहचलेला आहे. त्याच्या या विकासामध्ये अनेक शोध कारणीभूत ठरलेले आहेत. त्यापैकी काही महत्वाच्या शोधांची ओळख आपणास करून देणार आहे. आजचे हे मानवी जग कसे घडलेले आहे, तयार झालेले आहे, हे आपणास कळावे. हा उद्देश या लेखनामागे आहे.
आजच्या या लेखात मी आपणाला मानवाच्या विकासामध्ये अतिशय क्रांतिकारक ठरलेल्या भाषेच्या शोधाविषयी सांगणार आहे.
भाषेचा शोध:
भाषेच्या शोधाने मानवजातीला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे केले. या शोधात मानवाला कोणत्याही शरीरबाह्य भौतिक गोष्टींची मदत घ्यावी लागली नाही. मानवप्राण्याच्या बुद्धीत हळूहळू होत गेलेले विकास, त्याचवेळेत त्याच्या नाक, कान, घसा, कंठ, जीभ, दातांची रचना इ. (वागिंद्रियांमध्ये) अवयवांमध्ये झालेले बदल व हळूहळू होत गेलेल्या उत्क्रांतीमुळे भाषेची निर्मिती व्हायला मदत झाली.
निसर्गातील प्राणी, पक्षी, इतर सजीव, निर्जीव घटक यांच्या आवाज व ध्वनीच्या निरीक्षणातून व नंतर अनुकरणातून मनुष्य
कोरोना व मानवजातीचे अपराध
मानवजातीसमोर आज कोरोना नामक विषाणूचे खूप मोठे संकट उभे ठाकलेले आहे. किंबहुना, हा मानवाचे अस्तित्वच नष्ट करतो की काय? अशी शंका, असा यक्षप्रश्न आज मानवजातीसमोर आ वासून उभा राहिलेला आहे. आतापर्यंत अशा अनेक आजारांना, विषाणूंना पुरून उरणारा मानव आजच्या प्रगत विज्ञानाच्या युगातही एका विषाणूसमोर अक्षरशः हतबल झालेला दिसून येत आहे.
सर्व जगात, आज मी हे लिहीत आहे त्या दिवसापर्यंत जवळपास ४०००० लोकांचा जीव या विषाणूने घेतलेला आहे. अमेरिका, स्पेन, इटली, जर्मनी, चीन, सिंगापूर, जपान अशा प्रगत-अतिप्रगत देशांनी या विषाणूसमोर, त्यापासून होणार्या आजारासमोर गुडघे टेकलेले दिसून येत आहेत. या विषाणूच्या प्रादुर्भावापासून प्रतिबंध करू शकणारी लस अथवा त्याच्यापासून व्यक्ती बाधित झाल्यावर त्याला बरे करण्यासाठी नेमके, अचूक (Proper) औषध शोधून त्याला आवर घालण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ
प्रत्येक गावात सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका, प्रयोगशाळा, क्रीडांगण, उद्यान, आरोग्य केंद्र, एक मोठे सार्वजनिक सभागृह, कृषी मार्गदर्शन
देव व धर्म नसलेल्या जगात मला १००० वर्षे जगायचंय.