मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व


व्यायाम हा फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीदेखील खूप आवश्यक असतो. व्यायामामुळे हॅपी हार्मोन स्रवतात. त्यामुळे माणसाच्या आनंदाचा स्तर सुधारतो. मनुष्य अधिक आनंदी राहतो. आनंदी राहण्याचा फायदा कौटुंबिक, व्यावसायिक क्षेत्रामध्येदेखील खूप होतो.

व्यायामामुळे स्नायू, हाडे मजबूत होतात. शरीराची लवचिकता वाढते. प्रतिकारशक्ती, सहनशक्ती वाढते. जीवनातील आव्हानांना जास्त चांगल्या

पद्धतीने सामोरे जाण्यासाठी बळ प्राप्त होते. आत्मविश्वास वाढतो.

व्यायामामुळे मनुष्य इतरांसारखा सहज आजारी पडत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या फेऱ्या, स्वतःला व कुटुंबाला होणारा मानसिक त्रास, त्यासाठी खर्च होणारा वेळ व पैसा वाचतो.

व्यायाम केल्याने चयापचय क्षमता वाढते. खाल्लेले पचते. छानपैकी भूक लागते. त्यामुळे ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, अपचन इत्यादी गोष्टी होत नाहीत.

बीपी, शुगर, सांधेदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, मायग्रेन अशा दीर्घकाळ टिकणाऱ्या कित्येक आजार अथवा रोगांपासून मनुष्य कोसो दूर राहतो.

व्यायामामुळे एकाग्रता वाढते. आपली कार्यक्षमता वाढते. आपली व्यावसायिक प्रगतीदेखील त्यामुळे होते. शरीर व मन निरोगी असेल तर आपण आयुष्यात कोणतीही गोष्ट सहजपणे करू शकतो. किंबहुना जीवनाचा आनंद तेव्हाच आपल्याला घेता येतो.

व्यायामामुळे माणूस छान सडपातळ (स्लिम) दिसतो. त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व छान वाटते. इतरांसाठी तो आदर्श (Roll Model) असतो.

व्यायामामुळे आपण आपल्या वयापेक्षा जास्त तरुण दिसतो. किंबहुना तरुण राहतो. कारण आपल्या शरीरातील सर्व पेशींची झीज कमी होते. तुम्ही ४० वर्षाचे असणार आणि व्यायाम करत नसणार तर तुम्ही डॉक्टरांकडे तपासून बघा तुमच्या पेशींचे वय ४५ पेक्षा जास्त भरेल आणि तुमचे वय ५० असेल आणि तुम्ही नियमितपणे व्यायाम करत असणार तर तुमच्या पेशींचे वय हे ४५ किंवा ४८ भरेल. सांगण्याचे तात्पर्य व्यायाम आपल्याला तरुण ठेवण्यासाठी मदत करतो.

कोणत्याही वयाचे स्त्री-पुरुष व्यायामाला सुरुवात करू शकतात व त्यात सातत्य ठेवू शकतात. माझे ४०, ५०, ६० वय आहे, मी तर जास्त जाड नाही, माझे वजन जास्त नाही म्हणून मी आता व्यायाम कशाला करू, हे डोक्यातून आधी काढून टाकायला हवे. सर्वांना व्यायामाची गरज असते.

पण फक्त व्यायाम करून उपयोग नाही. तर त्यासोबत योग्य सकस आहार, किमान ७ तास पुरेशी झोप, मेडिटेशन, व्हिज्यूलायझेशन या गोष्टीदेखील खूप गरजेच्या असतात.

तुम्ही फक्त व्यायाम करत असणार व योग्य आहार घेत नसणार तर तुम्ही व्यायामात सातत्य ठेवू शकत नाहीत. कारण तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो. मी ‘योग्य आहार’ असे म्हटलेले आहे म्हणजे भरपूर खाणे नव्हे. तसेच हर्बल प्रॉडक्ट वगैरे घेणे नव्हे. आपण आयुष्यभर हर्बल प्रॉडक्टवर जगू शकत नाहीत. आपल्या दैनंदिन जीवनातीलच खाद्यपदार्थ खायचे असतात. फक्त त्यांचा क्रम, प्रमाण, आपल्या शरीराची गरज या गोष्टी समजून घेणे व त्याप्रमाणे आहार घेणे आवश्यक असते.

आपल्या शरीरासाठी कोणते अन्न चांगले आहे, कोणते त्रासदायक आहे, हे आपल्याला कळायला हवे आणि एकदा कळले म्हणजे मग त्यात बिलकुल तडजोड करता कामा नये. मात्र हे सर्व सहज व्हायला हवे. एकदा चांगल्या आहारतज्ज्ञाने आपल्याला समजावून सांगितले की, आपल्याला चटपटीत किंवा गोड पदार्थ यांच्याबद्दल आकर्षण राहत नाही. ते टाळताना मन मारावे लागत नाही. तर ते सहज घडते.

नियमित व्यायाम व डाएट पाळल्याने आपापल्या आपले शरीर, आहारशास्त्र चांगल्या पद्धतीने कळायला लागते. आपले शरीर आपल्याशी बोलू लागते. आपले स्वतःशी एक चांगले नाते निर्माण होते.

कोचचे आत्यंतिक महत्त्व –
व्यायामात सातत्य ठेवण्यासाठी मात्र कुणीतरी कोच असायलाच हवा. मी ‘असायलाच’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरलेला आहे. कारण आपल्या मनाने मोजकेच दोन-तीन व्यायामाचे प्रकार करून संपूर्ण शरीराला, शरीराच्या सर्व अवयवांना त्याचा फायदा होत नाही. त्यासाठी व्यायामाचे असंख्य प्रकार असतात. पण त्यांचे योग्य कॉम्बिनेशन करून, दररोज विविधता ठेवून सातत्याने व्यायाम करावा लागतो. त्याचप्रमाणे ते प्रकार चुकीच्या पद्धतीने करून चालत नाहीत. तसे केल्यास स्नायूंना दुखापत होणे, चमक भरणे किंवा यापेक्षा गंभीर गोष्टी घडू शकतात. त्यामुळे मग आपण व्यायामात सातत्य ठेवू शकत नाहीत किंवा दुखापत झाल्यामुळे, सातत्य न ठेवू शकल्यामुळे व्यायामाबद्दल आपले नकारात्मक किंवा चुकीचे मत तयार होऊ शकते. तेव्हा व्यायामाचे विविध प्रकार कोणते, ते नेमक्या पद्धतीने कसे करायचे, त्यांचे कॉम्बिनेशन कसे करायचे, त्यासोबत आहार कोणता घ्यायचा, मेडिटेशन, व्हिज्यूलायझेशन करून आपल्या सुप्त मनाला व्यायाम, डायट याबद्दल योग्य संदेश कसा द्यायचा, हे सर्व एक कोचच आपल्याला सांगू शकतो, शिकवू शकतो.

हे सर्व फक्त सांगून उपयोगाचे नाही तर तो आपल्याला नेहमी उपलब्ध असायला हवा. त्याने आपल्याकडून ते करून घ्यायला हवे. त्याने स्वतः आपल्यासोबत करायला हवे. कोणता प्रकार किती वेळेस करायचा, कसा करायचा, केव्हा थांबायचे, व्यायाम टप्प्याटप्प्याने कसा वाढवत न्यायचा, व्यायाम आनंदाने कसा करायचा हे सांगणारा, छानपैकी समजावणारा, प्रेरणा देणारा तो असावा.

माझे दुसरे असे मत आहे की, व्यायाम, डाएट, मेडिटेशन हे सर्व घेणारी व्यक्ती एकच असायला हवी. त्याला त्यातील सूक्ष्म ज्ञान असायला हवे. त्याने स्वतःचे प्रॉडक्ट विकता कामा नये. फक्त हे सर्व व्यवस्थित समजावून सांगणारा, करून घेणारा असायला हवा. मग तो ऑनलाइन असो किंवा ऑफलाईन.

मी स्वतः ऑनलाईन कोर्स जॉईन केला आहे. माझ्या आयुष्यात मी आतापर्यंत साडेचार महिने सातत्याने कधीच व्यायाम केला नव्हता. पण सुशील धनवडे या कोचमुळे ते शक्य झाले. त्यांचा कोर्स जॉईन करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात योग्य निर्णय होता. त्यामुळे माझ्या आयुष्याला एक चांगले वळण मिळाले.
त्यांच्या कोर्सची वैशिष्ट्ये –
१) ते दररोज सकाळी न चुकता ६.३० ते ७.३० या दरम्यान झूम ॲपच्या मदतीने ऑनलाईन व्यायाम घेतात.


२) प्रत्येक दिवसाच्या व्यायामाचा व्हिडिओ ते त्यांच्या ॲप तसेच संकेतस्थळावर ३६ तासांसाठी उपलब्ध करून देतात. त्यामुळे ज्यांना सकाळी ड्युटी असल्याने लाईव्ह सेशन करता येत नाही ते संध्याकाळी व्हिडिओ बघून व्यायाम करतात. ही सुविधा अन्यत्र कुठे उपलब्ध नाहीये. माझे सकाळी कॉलेज असल्यामुळे मी दररोज न चुकता रेकॉर्डिंग बघून संध्याकाळीच व्यायाम करून माझ्या शरीरात खूप चांगले बदल घडवून आणलेले आहेत.


३) त्यानंतर पाऊण ते एक तास त्यांच्या कोर्समधील मेंबरसोबत त्यांच्या शंका, अनुभव, प्रश्न या संदर्भात चर्चा करतात. हाही व्हिडिओ ३६ तास उपलब्ध असतो.

४) दर सोमवारी, बुधवारी व शनिवारी मेडिटेशन घेतात. हाही व्हिडिओ ३६ तास उपलब्ध असतो.


५) दर बुधवारी संध्याकाळी ७ ते ९ या दरम्यान डाएट सेशन घेतात. त्यात डाएट अतिशय शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगतात. कॅलरी ट्रॅक करायला शिकवतात. त्यांचे हे सेशन ऐकल्यानंतर आपल्याला आयुष्यात कधीही कोणत्या आहारतज्ज्ञाला भेटायची गरज भासत नाही. हा व्हिडिओ त्यांच्या ॲप व संकेतस्थळावर आपल्याला आयुष्यभर उपलब्ध असतो.

६) सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते स्वतःचे कोणतेही प्रॉडक्ट विकत नाहीत. त्यांचे स्वतःचे कोणतेही प्रॉडक्ट नाहीये.


७) त्यांच्या ॲप तसेच वेबसाईटवर स्ट्रेचिंग, मेडिटेशन, डाएट, हिप्नोमाईंड, झोपेशी संबंधित त्यांनी रेकॉर्ड केलेले कित्येक व्हिडिओ आपल्याला लाईफ टाईम फ्री मिळतात. हे सर्व व्हिडिओ तुम्हाला इतरत्र ५०,०००/- रुपयांच्या खाली मिळणार नाहीत. जे आपल्याला आयुष्यभर मोफत मिळतात.


८) आपण दररोज किती व्यायाम केला, त्यासंदर्भातील अनुभव या ॲप व संकेतस्थळावर फेसबुकसारखे आम्हाला दररोज पोस्ट करता येते. आम्ही ते करतो. त्यामुळे आपण कोणत्या तारखेला काय केले याची नोंद आपल्याकडे आयुष्यभर राहते.


९) त्यांनी तयार केलेल्या व्हाट्सअप ग्रुपवर आपल्याला सकाळी साडेसहा वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत आपल्या कोणत्याही शंका विचारता येतात. तसेच इतर लोक स्वतःचा अनुभव मांडत असतात. त्यातून आपल्याला खूप शिकायला मिळते. मोटिवेशन मिळते व व्यायामात सातत्य ठेवण्यासाठी, पुढची पातळी गाठण्यासाठी मोटिवेशन खूप गरजेचे असते.


१०) आमच्या या ग्रुपमध्ये डॉक्टर, इंजिनियर, व्यावसायिक, नोकरदार असे विविध क्षेत्रातील लोक आहेत. हे आमचे एक कुटुंबच आहे.

११) अपघात वगैरे असे अनैसर्गिक काहीही न घडल्यास आमच्यापैकी कित्येक जण १०० वर्ष हमखास जगतील व तेव्हासुद्धा आम्ही व्यायाम करत राहू, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. वाटल्यास तर कोणी भविष्यात सर्वेक्षण करावे. त्यासाठी आमच्या कोर्समध्ये कोण कोण होतं, त्याच्या नोंदी ठेवाव्यात.

११) अपघात वगैरे असे अनैसर्गिक काहीही न घडल्यास आमच्यापैकी कित्येक जण १०० वर्ष हमखास जगतील व तेव्हासुद्धा आम्ही व्यायाम करत राहू, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. वाटल्यास तर कोणी भविष्यात सर्वेक्षण करावे. त्यासाठी आमच्या कोर्समध्ये कोण कोण होतं, त्याच्या नोंदी ठेवाव्यात.

१२) सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या या कोर्सचा फायदा हा फक्त जॉईन करणाऱ्या एकट्या व्यक्तीलाच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला होतो.

त्यांच्या कोर्सला जॉईन करण्यासाठी पुढील प्रक्रिया करा.

दर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता ते दीड तासाचे एक सेशन घेतात. त्या दीड तासांचे शुल्क ४९९/- रुपये आहे. पण तुम्ही Have a Couponवर क्लिक करून तेथे FIT50 हा कोड टाकला की फक्त ९/- रुपयात तुम्हाला हा कोर्स जॉईन करता येईल.

फक्त ९/- रुपयात दीड तासांचा कोर्स.
त्यातून आरोग्याशी संबंधित खूप गोष्टी स्पष्ट होतील.

त्यांच्या दीड तासाच्या कोर्सला जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करू शकता. मी स्वतः अनुभव घेत आहे म्हणून सांगत आहे. बाकी काही नाही.https://learn.sushildhanawde.com/web/checkout/67f4ce693524b4b254bf41b4?affiliate=67f75d2dcd359d28f4d211a4&purchaseNow=true

त्यांचे हे सेशन आवडले तर मग त्यांचा ३ महिन्यांचा कोर्स जॉईन करायचा असतो. मग तुम्ही त्यांच्या या स्वतःला समृद्ध करणाऱ्या कुटुंबाचा एक भाग बनतात.

थोडक्यात, व्यायामाचे मानवी जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडून योग्य व शास्त्रीय पद्धतीने व्यायाम करून घेणाऱ्या, आपल्याला त्यासाठी प्रेरणा देणाऱ्या कोचचेदेखील तेवढेच महत्त्व आहे.

डॉ. राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *