मानवाचा आधुनिक काळापासूनचा सुधारणेचा इतिहास हा धर्मसत्तेविरूद्धच्या संघर्षाचा व धर्मसुधारणेचा इतिहास आहे. युरोपात या प्रक्रियेला चौदाव्या – पंधराव्या शतकापासून तर आपल्याकडे
१९व्या शतकापासून सुरुवात झाली. सतीप्रथा, केशवपन, बालविवाह, जरठ – कुमारी विवाह, विधवाविवाहास बंदी, घटस्फोटाची सोय नाही, स्त्रिया-शूद्र यांच्या शिक्षणाला विरोध, अस्पृश्यता, समुद्र ओलांडायला बंदी, शूद्रांना मंदिरप्रवेश नाही या व यासारख्या कित्येक गोष्टींना धर्माचे पाठबळ होते. समाजसुधारकांना धर्मव्यवस्थेविरूद्ध एक प्रकारचे बंड पुकारावे लागले. तेव्हा कुठे आजचा बदल तुम्हाला व आम्हाला बघायला मिळतो आहे. हा इतिहास समजून न घेता याकडे पाठ फिरवणे म्हणजे भविष्यातील मानवजातीच्या विकासाच्या वाटा बंद करण्यासारखे आहे.
आस्तिक असणे किंवा नास्तिक असणे, यात चांगले काय व वाईट काय हा प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की, धर्माच्या नावाने/ श्रद्धेच्या आधारे चालू असलेल्या प्रथा ह्या फक्त आनंदासाठी नसतात. याच्यातून सामाजिक जीवनात छोट्या छोट्या असंख्य समस्या निर्माण होतात. समाजात एक खोटा इतिहास बिंबवला जातो. जसे ह्या रंगांचे महत्त्व अमुक-तमुक धर्मग्रंथात…
‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.’ खरं तर मी आदिवासी नाही. पण आदिवासी भागात काम करत आहे. आदिवासींची दुःखे, त्यांचे जगणे, त्यांच्या समस्या आदिवासी समाजाइतकी मला माहीत नाहीत. पण माझ्या निरीक्षणातून, संपर्कातून, अनुभवातून, चर्चांमधून मला जे ज्ञात आहे, ते मांडण्याचा नम्रपणे मी प्रयत्न करीत आहे. काही चुकलं तर आपल्या थोर…
प्रिय बंधू आणि भगिनींनो, या लेखात गेल्या २०० वर्षांमध्ये भारतीय समाजात कोणकोणते बदल घडून आले, त्याच्या आधी काय परिस्थिती होती व आज समाजाची मानसिकता कशी आहे, याचा थोडक्यात आढावा घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व समजूतदार नागरिकांनी हे समजून घेणे…