इंग्रजी विषयात मला मिळालेले गुण

मला २००२ साली बारावीत ६९.१७% मिळाले होते. इंग्रजीत ३५ गुण होते. मला इंग्रजीत ५० गुण जरी मिळाले असते. तरी मी डीएडला जाऊ शकलो असतो व डीएड करून शिक्षक झालो असतो. पण आज मी साहाय्यक प्राध्यापक पदावरून पदोन्नती

मिळवून सहयोगी प्राध्यापक आहे.

म्हणून दहावी बारावीला किती गुण मिळाले याचा फार विचार न करता चांगल्या मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन घेऊन योग्य निर्णय घेत चांगल्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेऊन कष्ट करत प्रवास चालू ठेवा.

अंतिम यश, अंतिम अपयश असे काहीच नसते. जीवन हा एक प्रवास आहे. आजचा दिवस, क्षण चांगल्या अर्थाने आनंदात गेला, आपण कालपेक्षा थोडे अधिक शिकलो, थोडे अधिक विकसित झालो,  म्हणजे आजचा दिवस सार्थकी लागला, असे समजून प्रवास करत रहावा, असे मला वाटते.

(इंग्रजीत मला नंतर मिळालेले गुण –
FYBA – ५१
SYBA – ६५
TYBA – ७१)

डॉ. राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *