कधीकधी माझ्याचकडे मी
तटस्थपणे बघतो
माझ्यातच मला
कधीही न भेटलेला
दुसराच ‘मी’ गवसतो
त्याच्याशीच गप्पा मारण्यात
वेळ माझा निघून जातो
Read More
आपल्या मराठी व हिंदी भाषेत ‘द्ध’ हे जोडाक्षर
शुद्ध,
युद्ध,
विरुद्ध,
समृद्धी,
प्रसिद्ध,
प्रसिद्धी,
प्रतिबद्ध,
वृद्धी,
बुद्ध,
रिद्धी,
सिद्धी,
सिद्ध
अशा अनेक शब्दांमध्ये येते.
मात्र बरेच जण हे शब्द
माणसाने सुंदर असावं मनाने,
शरीरानेही सुंदर दिसावं…
माणूस निसर्गातील वस्तुंवर
प्रक्रिया करून, त्यांच्यात Read More
माझे मत वाया गेले!
भारतातील मतदारांची अशी समजूत किंवा मानसिकता असते की, आपण ज्यांना मत दिले तो जर पराभूत झाला तर आपले मत वाया जाते. ‘तू कुणाला मतदान केले’, असे सरळ विचारता येत नसल्याने निवडणूक संपून निकाल लागल्यावर लोकं गंमतीने विचारतात की, ‘तुमचे मत वाया गेले की सत्कारणी लागले’. म्हणजे तुम्ही ज्यांना मत दिले तो निवडून आला की नाही. यावरून त्यांना कळते की समोरच्याने कुणाला मतदान केले.
कोरोना आणि एकांत
मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनाने सर्व जगभर थैमान घातलेले आहे. या विषाणूपासून होणाऱ्या आजारामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडलेले असून लाखोंना याची लागण झालेली आहे. या विषाणूवर अजून तरी कोणतीही लस किंवा औषध सापडले नसल्याने याचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ नये म्हणून आपल्याला बाहेरच्या सर्वांशी प्रत्यक्ष संपर्क तोडून, सर्व कामधंदे सोडून घरात बसणे भाग आहे. अशा पद्धतीने रिकामे घरात बसणे अनेकांना असह्य होत असल्याने बरेच जण बाहेर पडणे चुकीचे आहे, हे माहित असताना देखील एखादा फेरफटका मारून येत आहेत. आज मात्र आपल्याला सक्तीचे घरात बसून राहावे लागणार आहे. एवढेच नाही तर पुढे कदाचित अनेक दिवस आपल्याला घरात बसून काढावे लागतील, असे चित्र सध्यातरी दिसत आहे.
मित्रांनो, आपण सर्वच जण (आजच्या घडीला जगभरातील ४०० कोटींपेक्षा जास्त लोकं) या सक्तीच्या एकांताला
तुलना करणे ही मानवाची स्वाभाविक अशी प्रवृत्ती आहे. आपण नेहमीच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, प्रकट वा अप्रकट तुलना करीत असतो. तुलना करताना एकापेक्षा अधिक गोष्टींची आवश्यकता असते. अशा एकापेक्षा अधिक गोष्टींमधून एकाची निवड करावयाची असेल तर तुलना ही आपोआपच आपल्याकडून होत असते. तर कधी-कधी ती आपण जाणिवपूर्वक करत असतो. आपण आपले विचार, मूल्य ठरवितानाही तुलना करूनच आपल्या स्वभावानुरूप ठरवित असतो.
साहित्याचा विचार करताना तुलनेला अत्यंत
धर्मांधांची कुळे
माजली चहुकडे
कापतात गळे
निष्पापांचे।
प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो,
कोजागिरीचा चंद्रमा
कोजागिरीचा चंद्रमा
मला वेगळाच भासला
तोही एकटा, मीही एकटा
डोळे भरून मी त्याला पाहताना
तो मला खुणावताना दिसला.
कोजागिरीचा चंद्रमा…–१–
बस एवढंच…बाकी काही नाही
काही क्षण पकडून ठेवावेसे वाटतात चिमटीत
पण जातात निसटून क्षणार्धात…
आणि शिरतो आपण दुसर्या क्षणांमध्ये
आपल्याही नकळत…
साधारणतः १४-१५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा माझी आई जात्यावर काम करत असताना अहिराणी बोलीत काही ओव्या गुणगुणत होती. त्या मी लिहून घेतल्या व त्यांच्या खाली काही ओव्या मी जुळवल्या होत्या.
चंद्राचे आणि माझे नाते
तसे खूप जुने आहे
कधीकाळी भाकरीत चंद्र दिसायचा
चंद्रात भाकरी शोधायचो
ती मिळावी म्हणून
प्रिय मित्रांनो,
‘ट्रॉय’ हा हॉलिवूडमधील एक प्रसिद्ध चित्रपट आहे. तो होमरच्या ‘इलियड’ या महाकाव्यवर आधारलेला आहे. या चित्रपटाला ऑस्करसह अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या चित्रपटातील अखिलिस या पात्राच्या तोंडी आलेली पुढील वाक्ये मला खूप आवडतात- Read More
दरवर्षी असंख्य विद्यार्थी विविध परीक्षांचा अभ्यास करत असतात. त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना अपयश येत असते. तर अनेक विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित असलेले यश मिळत नाही. याचा अर्थ त्यांना परीक्षांमध्ये यश मिळवण्याचा फॉर्म्युला माहित नसतो, असे म्हणावे लागेल. तेव्हा या यशाचा फॉर्म्युला मी आज आपणासमोर मांडणार आहे.
जगातील कोणत्याही परीक्षेला सामोरे जायचे असेल तर त्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. त्या पुढीलप्रमाणे-
८० किमी – एक प्रवास
(३०/१०/२०१७ च्या डायरीतील पान)
परवा २८ ऑक्टो. (२०१७) ला मी नाशिकला गियरची सायकल घेतली. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून घ्यायचं चाललेलं होतं. परवा घेतली आणि काल नाशिक ते जव्हार (८० किमी अंतर) चालवत आणली. सकाळी ६.४५ ला निघालो. ३.४५ ला पोहचलो. म्हणजे ९ तास लागले.
सर्वच कठीण आहे…
प्रतिगामी शक्तींनी
हैदोस मांडलाय….
रान पेटवलंय…
हिरवळही पेटलीय
अजून काय जळेल
साहसी शिबिर अहवाल
(मुंबई विद्यापीठाला सादर केलेला अहवाल)
(Adventure camp report)
दि. ०५ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०१६ दरम्यान Atal Bihari Vajpayee Institute of mountaineering and Allied Sports, Regional Mountaineering Centre, धर्मशाला, हिमाचल प्रदेश येथे साहसी शिबिर (Adventure camp) घेण्यात आले. या शिबिरात मुंबई विद्यापीठाच्या १० स्वयंसेवकांचा (५ मुले व ५ मुली) संघ पाठविण्यात आला होता. या संघाचे नेतृत्व प्रा. राहूल पाटील (कार्यक्रम अधिकारी, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जि. पालघर) यांनी केले.
दि. १२ ते १८ नोव्हेंबर, २०१८ या दरम्यान मुर्टी, ता. बारामती येथे चित्रपट निर्मिती कार्यशाळेत (निवासी) सहभागी झालो होतो. अक्षर मानव या संघटनेनेnही कार्यशाळा आयोजित केली होती. ७ दिवसांच्या कार्यशाळेसाठी सहभागी व्यक्तींकडून १०,०००/- रु. शुल्क घेण्यात आले होते. तर अक्षर मानव संघटनेच्या आजीव सदस्यांना ३०००/- सूट देण्यात आली होती.
चित्रपट या माध्यमाविषयी समज निर्माण व्हावी, पटकथा, चित्रिकरण, संपादन, दिग्दर्शन, गीतरचना इ. इ. गोष्टींची, विविध तंत्रांची माहिती व्हावी व माझ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात काही संधी मिळू शकते का? याचा शोध घ्यावा, या उद्देशाने मी या कार्यशाळेत सहभागी झालो होतो. या कार्यशाळेत Read More
तू, मी व आपण सर्व
एकाच रस्त्याने जाणार
गर्भातून सुरू झालेला हा प्रवास
सरणावर जाऊन संपणार ।।धृ.।।
देश हा फक्त भौगोलिक सीमांनी मिळून बनलेला नसतो. तर भौगोलिक प्रदेश व त्या भुप्रदेशातील माणसांनी मिळून देश तयार होत असतो. जसे घर हे फक्त भिंतींनी बनलेले नसते, तसेच देशाचे आहे. Read More
जिंदगी की कड़वाहट को धीरे-धीरे पी रहा हूँ
चंद रोज की जिंदगी में, कुछ रंग भर रहा हूं…
अक्सर घिरा रहता हूँ, भीड़ में मगर
ग्रामीण साहित्य : संकल्पना व मराठीतील परंपरा
१९६० नंतर मराठी साहित्यात जे अनेक प्रवाह निर्माण झाले. त्यात ग्रामीण साहित्य हा एक महत्त्वाचा प्रवाह मानला जातो. ग्रामीण साहित्याने मराठी साहित्यात संख्यात्मक व गुणात्मक दृष्ट्या अतिशय मोलाची भर घातलेली आहे. एक नवा आशय, जीवनाचे नवे क्षेत्र मराठी वाचकांसाठी ग्रामीण साहित्याने खुले करून दिले. या अर्थाने मराठी साहित्याला समृद्ध करण्याचे कार्य ग्रामीण साहित्याने केले आहे.
मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा, विविध फेलोशिप इ. विषयांवरील दर्जेदार व्हिडिओ बघण्यासाठी कृपया माझ्या youtube channel ला Subscribe करा. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw
‘ग्रामीण साहित्य’ ही संकल्पना समजून घेत असताना आधी ‘ग्रामीण’ ही संकल्पना समजून घ्यावी लागते. ‘ग्रामीण’ या शब्दातून ग्राम-गाव-खेडे इत्यादी गोष्टी लक्षात येतात. ग्राम-गाव किंवा खेडे याची रचना, त्याचे स्वरूप-वैशिष्ट्ये समजून घेतल्यास ‘ग्रामीण साहित्य’ ही संकल्पना स्पष्ट होऊ शकते.
अलीकडे ग्रामीण जीवनात अनेक परिवर्तने घडून आलेली आहेत. त्याआधी गाव हे गावगाड्यावर आधारलेले होते. या गावगाड्यात शेतकरी, अलुतेदार, बलुतेदार, दलित, फिरस्ते इत्यादींचा समावेश होता. हे सर्व घटक गावपातळीवर एकमेकांशी निगडित व परस्परांवर अवलंबून होते. शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय, उत्पन्नाचे मुख्य साधन. शेती करणारा शेतकरी. त्याला शेती व गृहोपयोगी वस्तू व अवजारे करून देणारे सुतार, लोहार, चांभार, कुंभार, तेली, सोनार इ. जाती किंवा व्यावसायिक; सेवा पुरवणारे न्हावी, रामोशी, धोबी, कोळी; ग्रामपातळीवर मनोरंजनाचे काम करणारे जोशी, पिंगळा इत्यादी जाती. या सर्वांना ग्रामजीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान होते. शेतकर्याकडे शेतीतून उत्पन्न आल्यावर तो त्यातून विशिष्ट हिस्सा किंवा वाटा या सर्व घटकांना द्यायचा, त्याला ‘बलुते’ असे म्हणायचे. ते त्यांच्या कामाचा व श्रमाचा मोबदला म्हणून दिले जायचे. या बलुत्यावर या जाती-व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालायचा. याचा अर्थ शेती ही केंद्रस्थानी होती व इतर घटक त्याभोवती असायचे. अशी ग्रामरचना परिवर्तनपूर्व काळात अस्तित्वात होती.
फासावर लटकलेल्या बापाला
पाहून, मुलाला प्रश्न पडला
कर्जात जन्मलेला माझा बाप
कर्जापायीच का मेला ? …धृ…