‘वोल्गा ते गंगा’मध्ये चित्रित आदिम काळातील स्त्रीजीवन
राहुल सांकृत्यायन हे विसाव्या शतकातील एक महान अभ्यासक, थोर विद्वान होते. म्हणून त्यांना ‘महापंडित’ असे म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात संशोधन व अभ्यासासाठी नेपाळ, भूतान, श्रीलंका, रशिया, जर्मनी, इंग्लंड अशा विविध देशांना भेटी देऊन विस्मृतीत गेलेली असंख्य ग्रंथसंपदा शोधून काढली. मानवी इतिहास, वेद, बौद्ध वाङ्मय, मार्क्सवादी साहित्य यांचा अतिशय सूक्ष्म असा अभ्यास त्यांनी केलेला होता. त्यांनी अतिशय मौलिक अशी विपुल ग्रंथरचना केलेली आहे. त्यांनी अनुवादित व संपादित केलेल्या आणि स्वतः लिहिलेल्या ग्रंथांची एकूण संख्या सुमारे १२५ इतकी असून या ग्रंथांची पृष्ठसंख्या सुमारे ४४००० इतकी आहे. त्यांना इंग्रजी, फ्रेंच, रशियन, जर्मनी, चिनी, पर्शियन, अरबी, तिबेटी, हिंदी, बंगाली, गुजराती, मराठी, तमिळ, कानडी इतक्या भाषा Read More