जंतरमंतरवर विद्यार्थ्यांना मारहाण

जे व्हिडिओ बघायला मिळत आहेत त्यावरून स्पष्ट कळत आहे की, दिल्ली पोलीस गुंडागर्दी करत आहे. निष्पाप विद्यार्थ्यांना काठीने फोडून काढत आहे.

व्हिडिओंवरून हे पण दिसून येत आहे की, अनेक जण साध्या कपड्यांमध्ये आहेत आणि ते पोलीस वाटत नाहीयेत. ते भाड्याने आणलेले गुंड असू शकतात किंवा एखाद्या संघटनेचे कार्यकर्ते असू शकतात की ज्यांना मुद्दामहून मुलांना मारण्यासाठी

आणलेले आहे. असे याच्या आधीदेखील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये घडलेले आहे.

पोलिसांच्या वेषात असलेल्या अनेक जणांच्या ड्रेसवर त्यांच्या नावाचे किंवा कोणतेही बॅचेस नाहीयेत. म्हणजे महाराष्ट्रात जसे म.पो., होमगार्ड असे लिहिलेले असते, त्यापैकी काही नाहीये. म्हणजे तेसुद्धा मुलांना मारण्यासाठी भाड्याने आणलेले आहेत की काय अशी शंका येत आहे आणि हे सर्व देशाच्या राजधानीत, संसद परिसरात आणि तेही संसदेचे अधिवेशन सुरू असताना म्हणजे सर्व खासदार उपस्थित असताना घडत आहे.

हा भारतीय नागरिकांना उघड उघड इशारा आहे की, आम्ही तुमचे काहीही ऐकणार नाहीत, तुमच्याशी संवाद साधणार नाहीत. हुकुमशाही अगदी उघडपणे आम्ही सुरू केलेली आहे.

निखिल वागळे हे ज्येष्ठ पत्रकार असून ते काल जंतर मंतर येथे प्रत्यक्ष उपस्थित होते व तेथील मारहाण, घडामोडी त्यांनी स्वतः बघितलेल्या आहेत. त्यांच्या युट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये त्यांनी ते सर्व सांगितले आहे.

दिल्ली येथील आंदोलनामध्ये मुलांनी दंगे घडवण्याचा प्रयत्न केला, असा अपप्रचार करणारे व्हिडिओ आयटीसेलकडून फिरवले जात आहेत. जे लोक पोलिसांच्या सोबत गुंडांची नेमणूक करू शकतात, ते मुद्दामून काही ठिकाणी गुंडांना आणून त्यांच्याकडून काही चुकीच्या गोष्टीदेखील घडून आणू शकतात व ते व्हिडिओ सोशल मीडियावर फिरवू शकतात.

जर एक लाख मुलांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला असता तर दिल्लीमध्ये काय अवस्था झाली असती याचा विचार करून बघा. संसद तरी शिल्लक राहिली असती का? पोलिसांनी गोळीबार केला नसता का? मुलांनी पोलिसांचा अत्याचार सहन केलेला आहे व शांततेच्या मार्गाने प्रतिकार केलेला आहे.

काल शरद पवार यांनी आंदोलकांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी भेटू दिले नाही. बॅरिकेट्स लावले होते. पोलिसांनी ते काढले नाहीत. म्हणून शरद पवार यांना परत जावे लागले.

दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारण्यासाठी स्वतः ट्रॅक भरून दगड आणले होते, असे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. अनेक पोलीस व गुंडांनी त्यांच्या काठ्यांना खिळे ठोकलेले होते. त्यामुळे अनेक मुलामुलींना गंभीर जखमा झालेल्या आहेत.

भाजप व मित्रपक्षांचा एकही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ एक ओळ लिहू शकत नाहीये, एवढी भीती यांच्या मनात आहे. फक्त सत्ता पाहिजे. बस. संवेदनशीलता, सामाजिक जबाबदारी काही नाही.

एकही धार्मिक संघटना, बाबा बुवा तुमच्या-माझ्या मुलांच्या समर्थनात बोलत नाहीये. रस्त्यावर उतरणे तर खूप लांबची गोष्ट आहे. एक लोटा जल टाकून सर्व समस्यांचा निपटारा कसा होईल?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *