
‘बारोमास’ ही सदानंद देशमुख यांची ग्रामीण जीवनाचा सर्वांगीण वेध घेणारी कादंबरी २००२ साली प्रकाशित झाली. या कादंबरीला २००४ साली भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. या कादंबरीमधून ग्रामीण भागातील तीन पिढ्यांमधील बदलत्या ग्रामवास्तवाचे, कृषीजीवनाचे चित्रण आलेले आहे.
बारोमास म्हणजे बारा महिने. बारा महिने शेतकऱ्यांना शेतीची कामे करत असताना पेरणीपासून ते कापणीपर्यंत व शेतमाल मार्केटमध्ये नेऊन तो विकून पैसे मिळेपर्यंत; तर पुढील वर्षांच्या पेरणीपूर्वी मशागतीपर्यंत शेतकर्यांना ज्या काही हालअपेष्टाना सामोरे जावे लागते, त्याचे चित्रण या कादंबरीत सदानंद देशमुख यांनी अतिशय वास्तवदर्शी शैलीतून साकारलेले आहे.
ही कादंबरी विदर्भातील मोहाडी तालुक्यातील सांजोळ गाव व त्या भोवतालच्या ग्रामीण परिवेश यावर आधारलेली आहे. या कादंबरीत तीन पिढ्यांचे चित्रण आलेले आहे. नानूआजा, वडील सुभानराव-आई शेवंता, त्यांची मुलं एकनाथ, मधू, सून अलका अशा


