मला २००२ साली बारावीत ६९.१७% मिळाले होते. इंग्रजीत ३५ गुण होते. मला इंग्रजीत ५० गुण जरी मिळाले असते. तरी मी डीएडला जाऊ शकलो असतो व डीएड करून शिक्षक झालो असतो. पण आज मी साहाय्यक प्राध्यापक पदावरून पदोन्नती
मला २००२ साली बारावीत ६९.१७% मिळाले होते. इंग्रजीत ३५ गुण होते. मला इंग्रजीत ५० गुण जरी मिळाले असते. तरी मी डीएडला जाऊ शकलो असतो व डीएड करून शिक्षक झालो असतो. पण आज मी साहाय्यक प्राध्यापक पदावरून पदोन्नती

एकविसाव्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे, विविध समाजमाध्यमे यांचा वापर वाढलेला असून ते आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनून गेले आहेत. आजच्या काळात ज्ञान, माहिती, मनोरंजन, जाहिरात आणि प्रबोधन हे घटक विशिष्ट लोकांपुरते, विशिष्ट प्रसारमाध्यमांपुरते मर्यादित न राहता, त्यावर फक्त त्यांचीच मक्तेदारी न राहता सामान्य माणसंही त्यांचा वापर करू लागले आहेत. आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःची ओळख निर्माण करण्याची, स्वतःची नाममुद्रा उमटवण्याची संधी प्राप्त झाली आहे. स्वतःचे संकेतस्थळ, Facebook account/ page, Twitter, Instagram यांच्या वापरातून अनेकांनी स्वतःचा एक अनुयायी वर्ग (Followers) निर्माण केला आहे. यांसारखेच ‘ब्लॉग’ हे एक सामाजिक माध्यम आहे. त्याला ‘अनुदिनी’, ‘जालपत्रिका’ किंवा ‘जालनिशी’ Read More
ही माझी आवडती गझल आहे. तिचा मराठीत अर्थ मी ChatGPTला विचारून मिळवलेला आहे. अतिशय खोल अर्थ या गझलचा आहे. अर्थानंतर गुलाम अली, आशा भोसले व तान्या वेल्स यांच्या आवाजात त्यांनी गायलेल्या या गझलच्या तीन तीन व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्हालाही नक्की आवडेल.
हैरतों के सिलसिले सोज़-ए-निहाँ तक आ गए हम तो दिल तक चाहते थे तुम तो जाँ तक आ गए
ज्यांनी ‘१२th फेल‘ हा चित्रपट बघितला असेल त्यांनी त्या चित्रपटातील एक प्रसंग आठवा. ज्यात मनोज कुमार शर्मा याला एक आयएएस ऑफिसर ‘मनोज कुमार शर्मा‘ या विषयावर निबंध लिहायला सांगतो. पण तो दिलेल्या वेळेत पुरेसे लिहू शकत नाही. त्यावरून ‘तू ये नही कर सकता‘ असे तो आयएएस ऑफिसर त्याला सांगतो. सांगायचे तात्पर्य आपल्याला जर एखाद्या विषयावर निबंध किंवा २००-४०० शब्दांमध्ये अभ्यासपूर्ण Read More
मित्रांनो,
मी बीए (विद्यापीठात प्रथम क्रमांक- सुवर्णपदक), एम.ए. (विद्यापीठात प्रथम क्रमांक-सुवर्णपदक), नेट, नेट-जेआरएफ, पीएचडी, योग्य मार्गाने साहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवणे, NSS-District level best programme officer award (पालघर जिल्हा), दोन पुस्तकांचे संपादन, प्रसिद्ध ब्लॉगर, युट्युबर हे सर्व यश ग्रामीण भागात शिक्षण व आदिवासी भागात नोकरी करत
Read Moreमाझे एम.ए. नेट, पीएचडी मराठी विषयात झालेले आहे. पण बीएला द्वितीय तसेच तृतीय वर्षाला इतिहास व राज्यशास्त्र हे विषय मी घेतलेले होते. हे माझ्या अतिशय आवडीचे विषय असल्याने मला यांच्यात खूप चांगले गुण मिळाले होते. याचा मला माझ्या पुढच्या वाटचालीत तसेच मानवजातीच्या
Read Moreशब्दांकन कौशल्य – विविध क्षेत्रे, करिअरच्या असंख्य संधी
शब्दांकन म्हणजे एखाद्या कल्पनेचा, संकल्पनेचा किंवा विचाराचा शब्दांमध्ये आविष्कार करणे. हे एक प्रकारचे अभिव्यक्तीचे साधन आहे, ज्याद्वारे आपल्या मनातील विचार, भावना, किंवा अनुभव इतरांसमोर प्रभावीपणे मांडता येतात.
शब्दांकन म्हणजे एखाद्या विचाराचा किंवा संकल्पनेचा शब्दांद्वारे सुस्पष्ट आणि प्रभावीपणे आविष्कार करणे.
शब्दांकन म्हणजे एकाने सांगितलेले विचार, अनुभव, घटनाप्रसंग दुसऱ्याने आपल्या शब्दांत मांडणे.
As per New Education Policy
FYBA
शिकण्याचे परिणाम :
सत्र १
Name of the course: नाटक या साहित्य प्रकाराचा अभ्यास (major mandatory) (सविस्तर वाचा…)
‘वोल्गा ते गंगा’मध्ये चित्रित आदिम काळातील स्त्रीजीवन
राहुल सांकृत्यायन हे विसाव्या शतकातील एक महान अभ्यासक, थोर विद्वान होते. म्हणून त्यांना ‘महापंडित’ असे म्हटले जाते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात संशोधन व अभ्यासासाठी नेपाळ, भूतान, श्रीलंका, रशिया, जर्मनी, इंग्लंड अशा विविध देशांना भेटी देऊन विस्मृतीत गेलेली असंख्य ग्रंथसंपदा शोधून काढली. मानवी इतिहास, वेद, बौद्ध वाङ्मय, मार्क्सवादी साहित्य यांचा अतिशय सूक्ष्म असा अभ्यास त्यांनी केलेला होता. त्यांनी अतिशय मौलिक अशी विपुल ग्रंथरचना केलेली आहे. त्यांनी अनुवादित व संपादित केलेल्या आणि स्वतः लिहिलेल्या ग्रंथांची एकूण संख्या सुमारे १२५ इतकी असून या ग्रंथांची पृष्ठसंख्या सुमारे ४४००० इतकी आहे. त्यांना इंग्रजी, फ्रेंच, रशियन, जर्मनी, चिनी, पर्शियन, अरबी, तिबेटी, हिंदी, बंगाली, गुजराती, मराठी, तमिळ, कानडी इतक्या भाषा Read More
गरिबांची मुलं प्राध्यापक व्हायला हवीत. निवड प्रक्रियेतील डोनेशन स्वरूपातला भ्रष्टाचार थांबायला हवा. आज ९९% संस्थाचालक ४०-५० लाख रुपये डोनेशन घेत आहेत. गरिबांची मुले एवढे पैसे देऊच
Read More
१) ‘ट्रोलधाड’ हा वर्षा किडे-कुळकर्णी यांचा तिसरा कथासंग्रह आहे. ‘गुंतता हृदय हे’ व ‘झिरो मॅरेज’ या कथासंग्रहांनाही अखिल भारतीय स्तरावरील व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
ट्रोलधाड – दत्तात्रय सांडू प्रतिष्ठान चेंबूर, मुंबई,
मित्रांनो, आज आपण आदिवासी समाज, त्यांची संस्कृती, शिक्षण, अर्थव्यवस्था अशा विषयांवर चर्चा करणार आहोत आणि या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत प्रसिद्ध कवी श्री. रवी बुधर सर हे आहेत. मी सर्वप्रथम रवी बुधर सरांचे मनःपूर्वक स्वागत करतो. तसेच सुरुवातीला त्यांचा परिचय करून देतो.
रवी बुधर सर हे ग्रामीण कवी व अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ते प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असून सध्या प्राथमिक व माध्यमिक शाळा चौक, ता. जव्हार, जि. पालघर येथे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.
✴️ ते अ.भा.मराठी साहित्य परिषद पुणे यांच्या जव्हार तालुका शाखेचे सचिव आहेत.
प्रश्न : ‘देवबाभळी’ या नाटकातील स्त्रियांची व्यक्तिचित्रे तुमच्या भाषेत सविस्तर लिहा.
उत्तर :
अभ्यासासाठी पुस्तक – Read More
वर्ग – प्रथम वर्ष कला
अभ्यासक्रम – नाटक: स्वरूप, घटक, प्रकार, वाटचाल
नमुना प्रश्न व त्याच्या उत्तरात अपेक्षित मुद्दे
दीर्घोत्तरी प्रश्न (४ पाने उत्तर लिहिणे अपेक्षित)
प्रश्न – नाटकाच्या घटकांचा सविस्तर परामर्श घ्या.
उत्तर –
सुरुवातीला नाटकाचे सर्व घटक खाली लिहिल्याप्रमाणे एका खालोखाल एक किंवा आकृती काढून लिहायचे. नंतर जेवढे घटक विचारलेले आहेत तेवढे साडे तीन पानांमध्ये सविस्तर लिहायचे. एक एक घटक घ्यायचे व Read More
मित्रांनो,
अवांतर वाचन करावे म्हणजे नेमके काय करावे, कसे करावे, काय वाचावे, केव्हा वाचावे, त्याचे फायदे काय आहेत, हे बऱ्याच जणांना माहिती नसते. तेव्हा हे आपण या लेखातून समजून घेणार आहोत.
अवांतर वाचन म्हणजे विद्यार्थी म्हणून आपल्या त्या त्या वर्गाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, तर गृहस्थ म्हणून आपल्या दैनंदिन नोकरी-व्यवसायाच्या कामाव्यतिरिक्त वर्तमानपत्र, त्यातील महत्त्वाच्या
कोणतीही भाषा ही जर टिकून ठेवायची असेल, तिचा विकास साधायचा असेल तर तिच्या विकासासाठी आधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे. दैनंदिन जीवनात आपला भाषेशी वेगवेगळ्या कारणास्तव नित्य संबंध येत असतो. आपण ती कामे टाळू शकत नाहीत. उदाहरणार्थ- टंकलेखन, मुद्रण, पुस्तकातील एखाद्या कागदावरील मजकूर पुन्हा मुद्रित करणे, भाषांतर करणे, कठीण शब्दांचे अर्थ जाणून घेणे, अशा कामांसाठी आपण जुन्या पद्धतीचे पारंपरिक तंत्रज्ञान वापरले तर आपले काम अगदी सावकाश होते, कामाला उशीर होतो व एवढा जास्त वेळ या धावपळीच्या काळात अशा कामांसाठी देणे आपल्याला शक्य होत नाही. मग कंटाळा आल्याने आपण अशी कामे टाळायला लागतो व हळूहळू ती करणे सोडून देतो. मात्र याच कामासाठी आपले संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅब यांच्यातील आधुनिक तंत्रज्ञानाचा, सॉफ्टवेअर, ॲप्स,
Read Moreविद्यार्थी मित्रांनो,
जी मुलं लेक्चरला येत नाहीयेत त्यांनी व इतरांनीही लक्षात ठेवा.
१) यावर्षी तुमची परीक्षा ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन होईल.
२) सर्व पेपर तुम्हाला लिहावे लागतील. ऑब्जेक्टिव्ह
माझ्या एकूणच विचारांशी सहमत असलेल्या किंवा नसलेल्या सर्वांसाठी-
भारत सरकार नुकतेच जे नवीन शैक्षणिक धोरण आणू पाहत आहे, ते देशातील पुढच्या पिढ्यांचे प्रचंड नुकसान करणारे आहे. तुम्हाला या संदर्भात जिथे वाचायला
‘रोजगारी’ ही कथा गावगाड्यातील एका शेतमजूर कुटुंबातील एक १४ वर्षाचा मुलगा आपल्या आई व वडिलांप्रमाणे शेतमजुरी न करता व्यवसायाला सुरुवात करतो आणि आत्मविश्वास व स्वाभिमानाने जगायला लागतो, या विषयावर आधारलेली आहे.
मारत्या ही या कथेतील महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. तो १४ वर्षाचा आहे. त्याची आई पाटलाकडे शेतमजुरी करायला जाते व त्यावर तिचा व मारत्याचा उदरनिर्वाह भागवते. तिची अशी इच्छा असते की, मुलाने सुद्धा आता आपल्यासोबत पाटलाकडे Read More
‘मोर्चा’ ही कथा शिवराम व त्याची आठ वर्षाची मुलगी सुशी यांच्यातील प्रेमळ नाते व सुशी मोर्च्यात हरवल्यामुळे कथेच्या शेवटी त्यांची झालेली ताटातूट, त्यामुळे शिवरामची झालेली सैरभैर अवस्था यावर आधारलेली आहे.
शिवरामची बायको त्याच्यासोबत लग्न झाल्यानंतर दोन वर्ष नांदते. त्या दरम्यान त्यांना एक मुलगी होते. ती म्हणजे सुशी. सुशी एक वर्षाची असताना शिवरामची बायको एका ठेकेदारासोबत पळून जाते, त्याच्यापासून तिला पुढे तीन अपत्ये होतात, असे Read More
‘घोर’ ही कथा एका खेड्यातील आबा नावाच्या एका अल्पभूधारक शेतकर्याला त्याच्या मुलीच्या लग्नाची लागून राहिलेली काळजी (घोर) आणि त्याने त्यातून काढलेला मार्ग या विषयावर आधारलेली आहे.
आबा हा ‘घोर’ या कथेतील एक अल्पभूधारक शेतकरी आहे. त्याला एक मुलगी आहे. या मुलीच्या लग्नाच्या वेळेस हुंड्यासाठी पैसे हवेत म्हणून त्याने आयुष्यभर कष्ट करून पै पै जमवून एक शेत विकत घेतलेले असते. हे शेत विकून तो हुंड्याचे Read More
मराठी विभाग अहवाल २०२१-२२
महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची सुरुवात १४/०६/२०२१ रोजी झाली. पहिल्या आठवड्यापासूनच महाविद्यालयाच्या तासिका ऑनलाइन पद्धतीने नियमितपणे सुरू झाल्या.
निकाल
| एकूण परीक्षार्थी | २९ |
| उत्तीर्ण | २४ |
| अनुत्तीर्ण | ०५ |
| निकालाची टक्केवारी | ८२.७५% |
|
श्रेणीनुसार विद्यार्थी संख्या |
|
| ओ श्रेणी |
०१ |
| ए + श्रेणी | ०६ |
| ए श्रेणी | ०८ |
| ब+ श्रेणी | ०३ |
| ब श्रेणी | ०४ |
| कश्रेणी | ०० |
| ड श्रेणी | ०२ |
गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी
| अ. क्र. | नाव | गुण |
| १ | कांचन परशुराम महाले |
५५७+५०६=१०६३ |
| २ | निवृत्ती वळे | ४८५+४६८=९६३ |
| ३ | दिलीप थेतले | ४२९+४७५=९०४ |
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व चांगल्या निकालासाठी मराठी विभागातील प्राध्यापक नेहमीच प्रयत्नशील असतात. या वर्षीदेखील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने टाळेबंदी घोषित केल्याने महाविद्यालय नियमित सुरू होऊ शकले नाही. म्हणून या वर्षीदेखील Read More
ग्रामीण भागात बर्याचदा माणसांतील नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे एकमेकांमध्ये चढाओढ, स्पर्धा, एकमेकांवर वर्चस्व गाजविण्याची प्रवृत्ती असते. यातून मग संघर्ष निर्माण होतो. ‘वाफ’ ही कथा गावातील संघर्ष, मारामारी, खून यावर आधारलेली आहे.
‘वाफ’ कथेची सुरुवात वामन पैलवानाचा मृत्यू व त्याची बातमी गावभर पसरल्यानंतर गावात जी खळबळ माजते, त्यापासून होते. वामन पैलवान हा एकाच वेळी दहा माणसांना पुरून उरला असता, अशा ताकदीचा गडी होता. तो अविवाहित होता. त्याची भाऊरावशी मैत्री होती. तो अनेकदा दिवसा व रात्रीसुद्धा भाऊरावकडेच राहायचा. त्यांचे जेवणही बऱ्याचदा त्याच्याकडेच असायचे. भाऊरावच्या बायकोने त्याला धर्माचा भाऊ मानलेले होते. भाऊरावचा देखील त्याच्यावर खूप विश्वास होता. म्हणून भाऊराव घरी Read More
कथानक –
‘सांड’ ही ‘दाही दिशा’ या कथासंग्रहातील शेवटची कथा आहे. ग्रामीण भागात शेती हा व्यवसाय केंद्रस्थानी असतो आणि शेतीसाठी गाय, बैल यांची खूप आवश्यकता असते. सांड म्हणजे गायीचा गोर्हा. देवाच्या किंवा धर्माच्या नावाने मोकळा सोडलेला बैल किंवा गायींना गाभण करण्यासाठी एखादागोर्हा शेतकामासाठी वापरला न जाता, त्याला न ठेचता तसेच ठेवले जाते, त्यांला ‘सांड’ असे म्हणतात. त्यांच्यापासून शेतकर्यांच्या घरी गायींपासून नवीन वासरू व गोर्हे जन्माला येणारे असतात. ते ताकदीचे Read More
ग्रामीण भागामध्ये राजकीय पक्ष, विविध देवदेवतांचे भक्त यामुळे गटतट निर्माण झालेले असतात. यांच्यात अनेकदा संघर्ष, मारामार्या, वादविवाद निर्माण होतात. त्याचा फटका गावातील इतर सामान्य लोकांनाही बसत असतो. ‘धर्म’ ही कथा एका गावातील दोन गटांमध्ये धार्मिक वादातून जो संघर्ष निर्माण होतो व त्यात तुकाराम लोहार नावाच्या व्यक्तीची लहान मुलगी बळी Read More
मी सुरू केलेल्या ग्रुपमधील (मराठी व्याकरण व साहित्य (सर्व स्पर्धा परीक्षा, नेट/सेट)/ माझ्या संपर्कातील खालील विद्यार्थी १९/०२/२०२२ रोजी घोषित झालेल्या नेट परीक्षेत उत्तीर्ण झाले. ४ जण JRFसह
गंगाधर बाळकृष्ण सरदार (०२ ऑक्टो. १९०८ – ०१ डिसें.१९८८)
महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक व विचारवंत म्हणून सर्वपरिचित. शिक्षण- एम.ए., पीएच.डी. (मराठी). जन्म व प्राथमिक शिक्षण जव्हार, जि. पालघर. स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग व तुरुंगवास. एसएनडीटी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्य. १९८० सालच्या बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
गं. बा. सरदार यांनी लिहिलेले ग्रंथ :
मी सुरू केलेल्या ‘मराठी व्याकरण व साहित्य (सर्व स्पर्धा परीक्षा व नेट/ सेट)’ या ग्रुपमध्ये असलेल्या व सराव परीक्षा देणाऱ्यांपैकी खालील विद्यार्थी/ विद्यार्थिनी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. (अजून काही जणांनी निकाल बघितलेला नाही. संख्या वाढू शकते.)
आपल्या ग्रुपमधील आतापर्यंत १९ जण सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा निरोप आलेला आहे. अजून या ग्रुपमधील कुणी निकाल बघितला नसेल तर बघावा व तसे कळवावे.
१) प्रमोदिनी देशमुख (मुंबई)
२) तनुजा ढेरे (मुंबई)
३) गितल बच्छाव (सटाणा)
४) राजेंद्र घाटाळ (जव्हार)
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०१८-१९
सुस्वागतम! सुस्वागतम! सुस्वागतम!
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत. आजच्या या समारंभात गेल्या वर्षभरात
छत्तीसगड व इतर काही राज्यांमध्ये त्या त्या राज्याच्या लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक प्राध्यापकांची सर्वच्या सर्व पदे भरली जातात. म्हणून तिथे
विद्यार्थी मित्रांनो,
तुम्हाला शिकवणे, एखादा मुद्दा, घटक, संकल्पना समजत नसेल तर समजावून सांगणे, गृहपाठ देणे,
(२६ जुलै, २०१९ रोजी लिहिले आहे.)
माझ्या एकूणच विचारांशी सहमत असलेल्या किंवा नसलेल्या सर्वांसाठी-
भारत सरकार नुकतेच जे नवीन शैक्षणिक धोरण आणू पाहत आहे, ते देशातील पुढच्या पिढ्यांचे प्रचंड नुकसान करणारे आहे. तुम्हाला या संदर्भात जिथे वाचायला मिळेल तिथे त्याविषयी जरूर
Read Moreसमकालीन मराठी साहित्यप्रवाह : संकल्पना
समकालीन हा कालवाचक शब्द आहे. ‘सम’ म्हणजे समान, समांतर, सोबत. जे साहित्य आपल्या काळाबरोबर, काळासोबत असते, त्या काळाच्या समांतर असते. ज्या काळात ते निर्माण होत असते, त्या काळातील समाजाचे
मराठीतील स्त्रीवादी साहित्य/ स्त्रियांचे साहित्य
मराठीमध्ये स्त्रियांनी तसे विपुल प्रमाणात साहित्यलेखन केलेले असले तरी ते सर्व स्त्रीवादी साहित्यात मोडत नाही. त्यापैकी बरेचसे साहित्य हे पुरुषप्रधान संस्कृतीचा स्त्रियांवर देखील प्रभाव असल्यामुळे किंवा त्यांची एकूणच जडणघडण पुरुषप्रधान संस्कृतीतच झालेली असल्यामुळे पती किंवा प्रियकराविषयी प्रेम, पुरुषशरणता, स्वत:कडे
जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. असे असले तरी संपूर्ण जगात व सर्व मानवसमुहांमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिले गेलेले आहे. धर्म, संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांचे हक्क
खालील व्हाट्सअप चर्चा पूर्ण वाचा.
[25/06, 1:06 PM] +91 93701 57488: सर नेट पास झाल्यावर एकनाथ सारखी आम्हालाही डोनेशन द्यावे लागेल का?
[25/06, 1:07 PM] डॉ. राहुल पाटील: आधी फोकस नेट सेटवर करा. ते पास झाल्यावर बोलू. अनेक संधी असतात.
[25/06, 1:13 PM] डॉ. राहुल पाटील: एकनाथने अनेक शक्यतांचा शोध घ्यायला हवा होता. नंतर तो तसे काही शोधताना दिसत नाही.
ह्या सूचना मी नेट/ सेटच्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी दिलेल्या आहेत. त्यांचे संकलन इथे केलेले आहे. ज्या कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशाच आहेत. म्हणून काळजीपूर्वक वाचा. त्यावर चिंतन, मनन करा व अंमलात आणा.
१) फार वेळ सोशल मीडियावर राहिल्यानेही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्यात अडचणी येतात.
२) परीक्षेतील यशाचे पहिले सूत्र- त्या-त्या परीक्षेचा
मित्रांनो, पदवी व पदव्युत्तर स्तरावर मराठी विषय घेऊन भाषा, साहित्य यांचा अभ्यास करून लेखन, भाषण, श्रवण व इतर कौशल्ये आत्मसात करून खरे तर करियरच्या असंख्य संधी आहेत. त्यापैकी काहींची माहिती मी या ब्लॉगमधून आपल्याला देणार आहे.
१) स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी विषय –
पीएसआय, एसटीआय या पदांसाठीच्या मुख्य परीक्षेत एकूण २५ टक्के अभ्यासक्रम हा मराठी व्याकरणाचा असतो. ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, क्लार्क, मंत्रालय सहाय्यक या व इतर अनेक पदांसाठी जी परीक्षा होते, त्या प्रत्येक परीक्षेत मराठी विषय असतो. एमपीएससी, यूपीएससी या परीक्षांमध्ये मराठी विषय असतो. यूपीएससीला तुम्ही मराठी विषय निवडून त्याचे २ पेपर देऊ शकतात. त्याला बीए, एमए या स्तरावरचा अभ्यास असतो. म्हणून मराठी विषय हा अतिशय उपयुक्त आहे.
२) भाषांतरकार म्हणून संधी – Read More
जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. असे असले तरी संपूर्ण जगात व सर्व मानवसमुहांमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिले गेलेले आहे. धर्म, संस्कृती, परंपरा यांच्या नावाखाली पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांचे हक्क
स्त्रियांच्या मुक्तीसाठीचे प्रयत्न
स्त्रियांचे शोषण करणार्या, त्यांना दुय्यम लेखणार्या, त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या असंख्य प्रथा आपल्या भारतात अस्तित्वात होत्या. मात्र एकोणिसाव्या शतकात इंग्रजांच्या प्रभावामुळे भारतीयांमध्ये काही प्रमाणात जागृती निर्माण होऊ लागली. पाश्चात्य शिक्षण, प्रबोधन यामुळे भारतातील
नामदेव ढसाळ हे मराठी साहित्यातील एक मोठे नाव आहे. त्यांनी मराठी कवितेमध्ये मोलाची भर घातलेली आहे. अस्पृश्यांचे दारिद्र्य, दैन्य, शोषण, त्यांच्यातील जाणीव-जागृती, विद्रोह, नवसमाजाच्या निर्मितीसाठीचे तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या सर्वच कवितांमधून मांडलेले दिसून येते.
नामदेव ढसाळ यांची ‘आत्ता’ ही कविता मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला मराठी अनिवार्य या विषयाच्या अभ्यासक्रमासाठी लावलेल्या ‘काव्यबंध’ या कसितासंग्रहात समाविष्ट आहे. ती अशी-
‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.’ खरं तर मी आदिवासी नाही. पण आदिवासी भागात काम करत आहे. आदिवासींची दुःखे, त्यांचे जगणे, त्यांच्या समस्या आदिवासी समाजाइतकी मला माहीत नाहीत. पण माझ्या निरीक्षणातून, संपर्कातून, अनुभवातून, चर्चांमधून मला जे ज्ञात आहे, ते मांडण्याचा नम्रपणे मी प्रयत्न करीत आहे. काही चुकलं तर आपल्या थोर अशा क्षमाशील संस्कृतीप्रमाणे मला माफ करणार, अशी अपेक्षा आहे.
इतिहास- पार्श्वभूमी-
आजच्या घडीला संपूर्ण जगात जवळपास ५००० आदिवासी समूह आहेत. ज्यांची लोकसंख्या ३७ कोटींच्या आसपास आहे. तसेच संपूर्ण जगात आदिवासींच्या जवळपास ७००० भाषा आहेत.
भारतात आदिवासी समाजाची लोकसंख्या ही जवळपास १० कोटी असून ती भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ८.६% आहे. याचाच अर्थ असा की, भारतात आदिवासींची खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असून हा समाज अगदी प्राचीन कालखंडापासून Read More
मित्रांनो, एकाग्रता म्हणजे काय? ती कशी वाढवावी? याबद्दल मला अनेक जण विचारतात. त्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे.
मित्रांनो, एकाच विषयावर, वस्तूवर किंवा कामावर आपले मन, चित्त, लक्ष किंवा अंतःकरण केंद्रित करण्याची किंवा स्थिर करण्याची जी क्षमता/ शक्ती असते, तिला एकाग्रता असे म्हणतात.
ही जी क्षमता असते ती काहींची अतिशय कमी असते, तर काहींची जास्त. काही जण तासनतास एकाच विषयावर, कामावर मन एकाग्र करू शकतात. तर बरेच जण काही मिनिटही करू शकत नाहीत. आपल्यापैकी प्रत्येकाचे चित्रपट, क्रिकेट यावर लक्ष केंद्रित होते, पण अभ्यासावर होत नाही.
तुम्हाला जर एखाद्या विषयावर लक्ष केंद्रित करता येत नसेल तर त्यामुळे आयुष्यात खूप नुकसान होते. वाचलेले, ऐकलेले समजत नाही. समजले तर लक्षात राहत नाही किंवा नंतर आठवत नाही. अभ्यासात, प्रगतीत अडथळे निर्माण होतात. योजलेली कामे वेळेत पूर्ण होत नाहीत.
तेव्हा ही एकाग्रता कशी वाढवायची? याचे काही उपाय किंवा मी केलेले काही प्रयोग तुमच्यासमोर मांडत आहे. याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.
मित्रांनो, मी वर्गात अनेकदा विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारतो असतो की, तुम्ही किती वेळ अभ्यास करतात? विद्यार्थी बऱ्याचदा स्वतःहून काहीच उत्तर देत नाहीत. मग मी स्वतःहून विचारतो की, दररोज न चुकता दिवसातून ३ तास किती जण अभ्यास करतात? कोणीच हात वर करत नाही. मग मी २ तास, १ तास, अर्धा तास, १५ मिनिटे, एक मिनिट असं मुलांना विचारत जातो. माझ्या अनेकदा असे लक्षात आलेले आहे की, अनेक मुलं दिवसात एक मिनिटही अभ्यास करत नाहीत. अशी मुलं PSI/ STI यासारख्या परीक्षांमध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. PSI/ STI कशाला परंतु साधे पोलीस, तलाठीही होऊ शकत नाहीत. कारण आज प्रत्येक परीक्षांमध्ये स्पर्धां एवढी वाढलेली आहे की, आपल्याला दररोज न चुकता किमान ५-६ तास अभ्यास Read More
भाषा हे ज्ञान मिळविण्याचे, आत्मसात करण्याचे एक महत्वाचे साधन आहे. त्यामुळे लहान मुलांच्या भाषाविकासाकडे अतिशय गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे.
एखाद्या भाषेवर प्रभुत्व असणे, म्हणजे ती भाषा तिच्या सर्व अंगभूत सामर्थ्यासह बोलता, लिहिता व वाचता येणे होय.
मित्रांनो, आपले शिक्षण संपल्यानंतर आपण आपल्या उद्योग-व्यवसायाला सुरुवात करत असतो. आपल्यापैकी काही लगेच तर काही अनेक वर्ष संघर्ष करून का असेना पण नोकरी मिळवतात व इमाने-इतबारे (!) आपली नोकरी करत राहतात. आपापले काम करत असताना आपल्या सहकाऱ्यांकडून, मित्रांकडून गाव, शहर व परिसरातील लोकांकडून अनेक गोष्टी आपण कळत-नकळतपणे शिकत असतो. अनेक खाजगी व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही कार्यशाळा, चर्चासत्रे, गट संमेलने, सभा, परिषदा या अनिवार्य केलेल्या असतात. अनिवार्य असल्यामुळे नाईलाजाने आपण त्या करून घेत असतो. आयोजकही कामकाजाचा भाग म्हणून सोपस्कार पार पाडत असतात. वैयक्तिक व्यवसाय, उद्योगधंदे करणाऱ्यांना तर आपल्या इथे अशा कार्यशाळा व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होतेच असे नाही. आपणही पुढे-पुढे या गोष्टींकडे दुर्लक्ष करत जातो. जे रूटीन आहे ते चालू ठेवतो.
शिक्षण घेत असतानाही अनेक विद्यार्थी अशा कार्यशाळा अथवा शिबिरांमध्ये सहभागी होत नाहीत. त्यांच्या आयोजनामध्ये Read More
बरेच जण म्हणतात की, वाचन करणे चांगले असते. वाचनाचे अमुक-तमुक फायदे असतात. बरोबरच आहे. वाचनाचे खरंच खूप फायदे आहेत. परंतु, त्याच्यासोबत काय वाचायचे, कोणती पुस्तके वाचायची हेही कळायला पाहिजे. आमच्या ‘साहित्य आणि समाज’ या TYBA च्या विषयाच्या एका पुस्तकात ‘हजारो वर्षे समाजाचे मन एकाच ठिकाणी थांबवून ठेवण्याचे सामर्थ्य साहित्यात असते’, असे एक वाक्य आहे. अगदी खरं आहे ते. कारण बहुतांश
Read Moreमाझ्या एकूणच विचारांशी सहमत असलेल्या किंवा नसलेल्या सर्वांसाठी-
भारत सरकार नुकतेच जे नवीन शैक्षणिक धोरण आणू पाहत आहे, ते देशातील पुढच्या पिढ्यांचे प्रचंड नुकसान करणारे आहे. तुम्हाला या संदर्भात जिथे वाचायला मिळेल तिथे त्याविषयी जरूर वाचा, ऐका. कारण हे तुमच्या व तुमच्या पुढील पिढ्यांच्या तसेच देशाच्या भवितव्याशी निगडित आहे. सरकार हे धोरण इतक्या घाईत आणण्याचा प्रयत्न करत आहे की,
Read More