Adventure camp report

साहसी शिबिर अहवाल

(मुंबई विद्यापीठाला सादर केलेला अहवाल)

(Adventure camp report)

        दि. ०५ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०१६ दरम्यान Atal Bihari Vajpayee Institute of mountaineering and Allied Sports, Regional Mountaineering Centre, धर्मशाला, हिमाचल प्रदेश येथे साहसी शिबिर (Adventure camp) घेण्यात आले. या शिबिरात मुंबई विद्यापीठाच्या १० स्वयंसेवकांचा (५ मुले व ५ मुली) संघ पाठविण्यात आला होता. या संघाचे नेतृत्व प्रा. राहूल पाटील (कार्यक्रम अधिकारी, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जि. पालघर) यांनी केले.

Read More

चित्रपट कार्यशाळा

         दि. १२ ते १८ नोव्हेंबर, २०१८ या दरम्यान मुर्टी,  ता. बारामती येथे चित्रपट निर्मिती कार्यशाळेत (निवासी) सहभागी झालो होतो. अक्षर मानव या संघटनेनेnही कार्यशाळा आयोजित केली होती. ७ दिवसांच्या कार्यशाळेसाठी सहभागी व्यक्तींकडून १०,०००/- रु. शुल्क घेण्यात आले होते. तर अक्षर मानव संघटनेच्या आजीव सदस्यांना ३०००/- सूट देण्यात आली होती. 

          चित्रपट या माध्यमाविषयी समज निर्माण व्हावी, पटकथा, चित्रिकरण, संपादन, दिग्दर्शन, गीतरचना इ. इ. गोष्टींची, विविध तंत्रांची माहिती व्हावी व माझ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात काही संधी मिळू शकते का? याचा शोध घ्यावा, या उद्देशाने मी या कार्यशाळेत सहभागी झालो होतो. या कार्यशाळेत Read More

देशद्रोही?

देश हा फक्त भौगोलिक सीमांनी मिळून बनलेला नसतो. तर भौगोलिक प्रदेश व त्या भुप्रदेशातील माणसांनी मिळून देश तयार होत असतो. जसे घर हे फक्त भिंतींनी बनलेले नसते, तसेच देशाचे आहे. Read More

ग्रामीण साहित्य : संकल्पना व मराठीतील परंपरा

ग्रामीण साहित्य : संकल्पना व मराठीतील परंपरा

              १९६० नंतर मराठी साहित्यात जे अनेक प्रवाह निर्माण झाले. त्यात ग्रामीण साहित्य हा एक महत्त्वाचा प्रवाह मानला जातो. ग्रामीण साहित्याने मराठी साहित्यात संख्यात्मक व गुणात्मक दृष्ट्या अतिशय मोलाची भर घातलेली आहे. एक नवा आशय, जीवनाचे नवे क्षेत्र मराठी वाचकांसाठी ग्रामीण साहित्याने खुले करून दिले. या अर्थाने मराठी साहित्याला समृद्ध करण्याचे कार्य ग्रामीण साहित्याने केले आहे.

मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा, विविध  फेलोशिप इ.  विषयांवरील दर्जेदार व्हिडिओ बघण्यासाठी कृपया माझ्या youtube channel ला Subscribe करा. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw

  • ‘ग्रामीण साहित्य’ संकल्पना- 

           ‘ग्रामीण साहित्य’ ही संकल्पना समजून घेत असताना आधी ‘ग्रामीण’ ही संकल्पना समजून घ्यावी लागते. ‘ग्रामीण’ या शब्दातून ग्राम-गाव-खेडे इत्यादी गोष्टी लक्षात येतात. ग्राम-गाव किंवा खेडे याची रचना, त्याचे स्वरूप-वैशिष्ट्ये समजून घेतल्यास ‘ग्रामीण साहित्य’ ही संकल्पना स्पष्ट होऊ शकते.

        अलीकडे ग्रामीण जीवनात अनेक परिवर्तने घडून आलेली आहेत. त्याआधी गाव हे गावगाड्यावर आधारलेले होते. या गावगाड्यात शेतकरी, अलुतेदार, बलुतेदार, दलित, फिरस्ते इत्यादींचा समावेश होता. हे सर्व घटक गावपातळीवर एकमेकांशी निगडित व परस्परांवर अवलंबून होते. शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय, उत्पन्नाचे मुख्य साधन. शेती करणारा शेतकरी. त्याला शेती व गृहोपयोगी वस्तू व अवजारे करून देणारे सुतार, लोहार, चांभार, कुंभार, तेली, सोनार इ. जाती किंवा व्यावसायिक; सेवा पुरवणारे न्हावी, रामोशी, धोबी, कोळी; ग्रामपातळीवर मनोरंजनाचे काम करणारे जोशी, पिंगळा इत्यादी जाती. या सर्वांना ग्रामजीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान होते. शेतकर्‍याकडे शेतीतून उत्पन्न आल्यावर तो त्यातून विशिष्ट हिस्सा किंवा वाटा या सर्व घटकांना द्यायचा, त्याला ‘बलुते’ असे म्हणायचे. ते त्यांच्या कामाचा व श्रमाचा मोबदला म्हणून दिले जायचे. या बलुत्यावर या जाती-व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालायचा. याचा अर्थ शेती ही केंद्रस्थानी होती व इतर घटक त्याभोवती असायचे. अशी ग्रामरचना परिवर्तनपूर्व काळात अस्तित्वात होती.

Read More