गणितज्ज्ञ रामानुजन

प्रसिद्ध गणिततज्ज्ञ रामानुजन (१८८७-१९२०) यांच्यावर धर्माचा प्रचंड पगडा होता. ते युरोपात असताना त्यांना क्षयरोग संबंधित आजार झाला. तेथील थंडीमध्ये टिकून राहण्यासाठी व बरे होण्यासाठी डॉक्टरांनी मांसाहार करायला सांगितले. त्यांनी नाही केला. शेवटी त्याच

आजाराने त्यांचे वयाच्या ३३व्या वर्षी निधन झाले. ते तिथे स्वतःच्या हातांनी स्वयंपाक करायचे व युरोपियन लोकांनी स्पर्श केला तरी आंघोळ करायचे असे मी वाचलंय. एवढा मोठा जगविख्यात गणिततज्ज्ञ पण धार्मिक वेडगळ गोष्टींना बळी पडला. त्यांच्या निधनाने भारताची व गणित या विषयाची खूप मोठी हानी झाली होती. त्यांच्या जीवनावर ‘दुर्दैवी प्रतिभावंत’ हे पुस्तक आहे.

गणिततज्ज्ञ रामानुजन यांच्या चारित्रावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, विज्ञान, गणित या क्षेत्रातील प्रचंड बुद्धिमान व्यक्ती, शास्त्रज्ञदेखील वैचारिक, सामाजिक, धार्मिक बाबतीत प्रचंड मागासलेले, कट्टर, अंधश्रद्धाळू व विषमतावादी असू शकतात.

© डॉ. राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *