निराश, हतबल, वृद्ध कृष्ण

यादवीनंतर निराश झालेला कृष्ण जंगलात निघून गेला व अंगठ्याला बाण लागून मरण पावला. तिथेच त्याचे पार्थिव पडून राहिले. कृष्णाच्या वंशातील स्त्रियांना अभिर वंशातील लोकं उचलून, पळवून घेऊन गेले.

त्याआधी कित्येक लढाया जिंकलेला व त्याच्या काळातील महान योद्ध्यांवर प्रभाव गाजवणारा पण आता

स्वतःचा वंशसंहार स्वतः पाहिलेला निराश, हताश, हतबल असा म्हातारा कृष्ण कोणताच कीर्तनकार, प्रवचनकार उभा करत नाही.

खरं तर परिस्थितीवर कितीही मोठ्या माणसाचे नियंत्रण नसते, या वास्तवाचे कृष्ण हा एक चांगले उदाहरण आहे. पण पौराणिक ग्रंथ, महाकाव्ये हे जीवन समजून घेण्यासाठी वापरण्याऐवजी आपण धर्मभावना, अस्मिता जोपासण्यासाठी वापरत असतो, म्हणून असे घडते.

डॉ. राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *