भोंग्यांचा आवाज : कुणाचा किती

मी हिंदू आहे. पण मूर्ख हिंदू नाही.
चला थोडा हिशोब करू.
दिवसभरात ठरलेल्या ५ वेळेस अजान.
म्हणजे ३६५×५=१८२५ वेळेस.
एक अजान २-३ मिनिटांची. (नंतर आवाज

थांबतो.)
समजा ३मिनिटे धरली.
१८२५×३=५४७५.
५४७५÷६० (मिनिटे)=९१.२५ तास (वर्षभरात)
त्यात पुन्हा घरांना धडशा मारणारा, हृदयाचे ठोके वाढविणारा DJ नाही. (पण जिथे आवाज वाढत असेल तिथे मुस्लिम बांधवांनीदेखील विचार करायला हवा व आवाजावर नियंत्रण ठेवायला हवे.)

आपल्याकडचा हिशोब करायचा का?

● गणेशोत्सव १० दिवस
प्रत्येक दिवस किमान ३ तास – एकूण ३० तास.
(शेवटच्या दिवशी मिरवणूक. म्हणून जास्त वेळ. पण ते जाऊ द्या.)
पुन्हा मुर्त्या पाण्यात बुडविल्यावर अब्जावधी जीवांचा संहार वेगळा.

● नवरात्र – ९ दिवस –
प्रत्येक दिवस किमान ३ तास – एकूण २७ तास.
(शेवटच्या दिवशी जास्त वेळ. पण ते जाऊ द्या.)
पुन्हा मुर्त्या पाण्यात बुडविल्यावर अब्जावधी जीवांचा संहार वेगळा.

● गावोगावी सात दिवसांचे सप्ताह.
इथे तर पहाटेपासून टेपरेकॉर्डरवर गाणी सुरू होतात. संध्याकाळी व रात्री उशिरापर्यंत वेगळा आवाज.

● दिवाळी – वेळीअवेळी वेगवेगळ्या प्रकारचे फटाके फोडणे, हवेचे प्रदूषण, प्रचंड आवाज, अनेक ठिकाणी लागणाऱ्या आगी, ते प्रदूषण वेगळे.

● होळी- लाखो टन लाकूड, गोवऱ्या जाळून निसर्गाचा ऱ्हास.

● वटपौर्णिमा – वडांच्या झाडांच्या फांद्या तोडणे. निसर्गाचा ऱ्हास.

● रामनवमी – दिवसभर आवाज

● कृष्णाष्टमी – दिवसभर आवाज

● लाखो लग्ने- रात्रभर डीजे व डान्स

● लहानमोठे अनेक सण व आवाज.

● अनेक गावांमध्ये मंदिरांवर वर्षभर दररोज न चुकता टेपरेकॉर्डरवर न चुकता पहाटेच तास दोन तास भक्तिगीते लावली जातात.

या सर्वांचे मिळून किती तास होतील?

मोठ्या आवाजाचा
म्हातारी माणसं,
बाळंतीण बायका,
लहान मुलं,
वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त रुग्ण,
विद्यार्थी (आता वर्षभर कोणत्या ना कोणत्या परीक्षा होत असतात.)
प्रवासी,
पक्षी,
आजूबाजूचे प्राणी
अशा अनेक जणांना त्रास होतात.

माझे एकच म्हणणे आहे. सर्व धर्म शहाणपणा शिकवतात ना? मग थोडा विचार करा. सर्वांनी मिळून एकत्र बसा. चढाओढ, स्पर्धा करू नका. थांबवा हे प्रकार.

यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. देवाच्याच नावाने देवानेच निर्माण केलेल्या (असे तुम्हीच समजतात ना?) जीवसृष्टीला त्रास देवाचेच भक्त देत आहेत.

धर्म ही त्रास देण्याची गोष्ट नाहीये. म्हणून जरा शहाणे व्हा. सर्वांनीच बिनडोकपणा थांबवा. लोकांना जरा शांतपणे जगू द्या.

© डॉ. राहूल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *